weight loss without exercise: या 6 भाज्यांचा आहारात करा समावेश; व्यायाम न करता महिन्यांत उतरेल तब्बल इतके किलो वजन..
weight loss without exercise: प्रमाणाच्या बाहेर वजन असणे हे रोगी शरीराचे लक्षण आहे. त्यामुळे शरीरावरचे वजन नियंत्रीत ठेवण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. शरीरावरील अतिरिक्त वजन वे (weight loss) अनेक आजारांना निमंत्रण देते. बर्याचदा हे आजार गंभीर स्वरुप धारण करतात जे तुमच्या जिवावर सुद्धा बेतु शकते. शरीरावर जास्त चरबी असणार्यांना हृदयासंबंधीत विकार लवकर जडतात. अतिरिक्त वजन असणार्यांचे कॉलेस्ट्रॉल (cholestrol) वाढण्याची शक्यता जास्त असते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यास हार्ट अटॅक (heart attack) येण्याच्या शक्यता अधिक वाढुन जातात. ज्यामुळे तुमचा जिव सुद्धा जाऊ शकतो. (without exercise more than many kg weight loss in one month)
वजन नियंत्रित असणार्या व्यक्तीचे शरीर आणि प्रमाणाबाहेर वजन वाढलेल्यांच्या शरीरात मोठे बदल तुम्हाला बघायला मिळतात. वजन नियंत्रित असणारे शरीर निरोगी असते. याउलट वजन वाढलेल्यांच्या शरीरास काही ना काही आजार असल्याचे जाणवतेच जसे की बीपी, शुगरसारखे काही ना काही आजार त्यांना सहसा असतातच. यासोबतच वजन वाढलेल्यांना वारंवार थकवा येतो. त्यामुळेच वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी लोकांकडून प्रयत्न केले जातात. याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. व्यायाम सुद्धा केला जातो. तसेच योग्य डायट सुद्धा घेतला जातो. मात्र तरिदेखील पाहिजे त्या प्रमाणात वजन कमी होत नाही. अशावेळी आहारात काही भाज्यांचा समावेश करुन तुम्ही वजन कमी करु शकता. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम (exercise) न करता तुम्ही एका महिन्यात तब्बल दहा किलो वजन कमी करू शकता. नेमक्या कुठल्या आहेत त्या भाज्या? आणि कशा खायच्या? जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
मशरुम
घरी एखादा विशेष कार्यक्रम असल्यास किंवा घरगुती पार्टी करायची असल्यास काहीतरी वेगळे म्हणून मशरुमची भाजी करण्यात येते. पुष्कळ लोकं हॉटेलात जेवायला गेले असता, पहिली पसंती मशरुमच्या भाजीला देतात. मशरुम अनेकांचा आवडता पदार्थ आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी मशरुम फार ऊपयोगाचे ठरते. मशरुममध्ये चरबी बर्न करण्याची क्षमता असते. त्यामुळे वजन कमी करतांना विविध ऊपायांसोबत आहारात मशरुमचा समावेश करावा. याशिवाय मशरूमच्या नियमित सेवनाने बुद्धीला देखील चालना मिळते.
फुलकोबी आणि ब्रोकोली
फुलकोबी आणि ब्रोकोली सुद्धा वजन कमी करण्यात प्रचंड ऊपयुक्त आहे. या भाज्या सामान्यत: आपल्या जेवनात असतातच. परंतू अनेकांना फुलकोबी किंवा ब्रोकोली आवडत नाही. वजन वाढलेल्यांनी मात्र फुलकोबीचे सेवन केलेच पाहिजे. फुलकोबीमध्ये अनेक महत्वाचे जिवनसत्वे असतात. याशिवाय खनिजांचे सुद्धा मुबलक प्रमाण फुलकोबीमध्ये असते. फुलकोबीमधले काही घटक वेगाने वजन कमी करण्यास मदत करतात. मात्र या भाज्या बनवताना तेलाचा खूप कमी वापर कारणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास तुम्ही या भाज्या शिजवून खाल्ल्यास अतिशय फायदेशीर ठरतात.
मिरची
मिरची जरी तिखट असली, तरिदेखील जेवनात किंवा विविध पदार्थांमध्ये मिरचीचे महत्व पुष्कळ आहेत. अनेक पदार्थांमध्ये मिरची नसल्यास त्या पदार्थांची रौनकच निघुन जाते. मिरची एखाद्या पदार्थाला चरफर बनविण्यासोबतच वजन कमी करण्यात सुद्धा महत्वाची भूमिका निभावते. मिरची शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारण्याचे प्रयत्न करते. तसेच काही अभ्यासकांच्या मते मिरचीने भुक कमी लागते. ज्यामुळे तुमच्या खाण्यावर बंधने येतात. जे वजन कमी करण्यास ऊपयुक्त आहेत. विशेष म्हणजे सर्व सामान्यांना मिरची खरेदी करणे परवडत नाही असं फारसं होत नाही. मिरचीची एक दोन झाडे तुम्ही अंगणात देखील लावू शकता.
पालक आणि ईतर पालेभाज्या
आपल्या जेवनात पालेभाज्यांचा समावेश असलाच पाहिजे. पालेभाज्याचे मुबलक सेवन करण्याचा डॉक्टरांचा नियमीत सल्ला असतो. पालेभाज्याचे महत्त्व तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पालेभाज्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शरीरास उपयुक्त असणारी जीवनसत्वे असतात. पालेभाज्या आणि पालकामुळे शरीरातील लोहाची कमी भरुन निघते. यासोबतच पालक चरबीला आळा घालण्यास व चरबी घटवण्यात सुद्धा महत्वाची भूमिका बजावते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पालक आणि पालेभाज्यांमुळे शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होतो.
गाजर आणि काकडी
गाजर आणि काकडीचा ऊपयोग सहसा आपण सलादमध्ये करतो. गाजर आणि काकडी शरीरासाठी पौष्टीक असते. डोळ्यांसाठी तर गाजराचे व काकडीचे विशेष महत्व आहे. गाजरामध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा मुबलक प्रमाणात असते. तर काकडीने पोट भरल्यासारखे वाटते जे भुक लागण्यावर परिणाम करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जेवनात सलादचा समावेश करण्यासोबतच त्यात गाजर व काकडीची मात्रा सर्वाधिक ठेवायला हवी.
भोपळा
भोपळ्यामध्ये सुद्धा शरीरास आवश्यक अनेक पौष्टीक घटक असतात. रक्तप्रवाह सुरळीत करण्यात भोपळा महत्वाची भूमिका निभावतो. यासह भोपळ्यात फायबरचे प्रमाण सुद्धा पुष्कळ असते. भोपळ्यातील काही घटक शरीरावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भोपळ्याचा सुद्धा आहाराम समावेश असायला हवा.
हे देखील वाचा Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..
Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार लाभ
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम