First love also remember: या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास..

0

First love also remember: प्रेम (love) म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. प्रेम म्हणलं की एक वेगळाच रोमांच शरीरावर येतो. प्रेम म्हणलं की कधीही कविता न करणारे सुद्धा कवी होतात. कितीही तापट आणि रागीट स्वभावाचे असले तरि त्यांचा स्वभाव एकदम एखाद्या कळीसारखा कोमल होउन जातो. कारण प्रेम हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातल्यात्यात पहिलं प्रेम म्हटलं की मग तर विचारुच नका. पहिलं प्रेम म्हणलं की आपण लगेच आठवणीत रमुन जातो. पहिल्या प्रेमादरम्यान केलेल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवु लागतात. मन अगदी शांत होऊन जातं आणि एका वेगळ्याच दुनियेत आपल्याला घेऊन जातं. (Why You never forget your first love)

प्रेम हे जिवनात अनेकदा होऊ शकतं, वेगवेगळ्या व्यक्तींवर होऊ शकतं. पण पहिलं प्रेम म्हणजे प्रत्येकासाठी आपुलकीचा विषय असतो. कारण पहिलं प्रेम विसरणे कठिण असते. पहिल्या प्रेमादरम्यान केलेली प्रत्येक गोष्ट आपल्या हृदयावर खोलवर जाऊन बसलेली असते. कितीही विसरण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तरीही ते शक्य होत नाही. ज्यामुळे आपल्या आयुष्यातल् पहिलं प्रेम आपण कधीच विसरु शकत नाही. प्रेम करणारा किंवा प्रेमात पडणारा प्रत्येकजण याबाबत सांगु शकतो. पहिल्या प्रेमाच्या आठवणी आयुष्यभर आपल्या सोबतच राहतात. मात्र असे नेमके काय होते की, पहिलं प्रेम विसरण्याचा प्रयत्न करुन सुद्धा विसरता येत नाही. तर याबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

प्रेमाचा पहिला अनुभव असतो

आयुष्यात पहिल्यांदा केलेली कुठलिही गोष्ट माणुस कधीच विसरत नाही. पहिल्यांदा केलेल्या गोष्टीच्या आठवणी माणसाच्या मनात कायम राहतात. अनेक मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, आयुष्यात कुठलिही गोष्ट असो पहिल्यांदा केलेल्या त्या गोष्टीचे विशेष महत्व राहते. पहिल्यांदा आलेला अनुभव आपण कधीच विसरु शकत नाही. याउलट दुसर्‍यांदा केलेल्या गोष्टीला तेवढे महत्व राहत नाही. त्यामुळे प्रेमाचा तो पहिला अनुभव असतो. याअगोदर प्रेमाबद्दल केवळ ऐकलेले असते. विविध गोष्टी आपल्या कानावर आलेल्या असतात. मात्र आपण स्वत: प्रेमात असतांना ती प्रत्येक गोष्ट आपण अनुभवत असतो. यावेळी दुसर्‍याचे ऐकण्याऐवजी आपण स्वत: त्याचे साक्षीदार होत असतो. त्यामुळे आपल्याला ते विसरणे कठिण होऊन जाते. विसरण्याची ईच्छा असून सुद्धा आपण त्या गोष्टी विसरु शकत नाही.

भावनात्मक बंध जुळतो

प्रेम म्हणजे त्याठिकाणी समर्पन हे आलेच. प्रेमात समर्पन असल्यास त्यातील भावनिक धागा अधिक घट्ट होत जातो. पहिल्या प्रेमात आपण आपलं संपूर्ण समर्पन देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक भावनात्मक बंध जुळतो. प्रेम होण्याअगोदर आपण प्रेमांबाबत बर्‍याच गोष्टी ऐकत असतो. प्रेमात अमुक होते ढमुक होते. प्रेम झाल्यानंतर या गोष्टी अनुभवण्याचा आपला वेळ असतो. यादरम्यान एक घट्ट भावनिक नाते निर्माण होते. एकमेकांच्या भावना जुळल्यामुळे एकमेकांची प्रत्येक गोष्ट स्वत:ची वाटु लागते. एकमेकांचा आनंद, दु:ख यामध्ये आपण समरस होऊन जातो. नात्यात भावनिकता आल्यामुळे त्या नात्यात ओलावा निर्माण होतो. एकमेकांप्रती आदराची, सन्मानाची आणि सहकार्याची भावना निर्माण होते. एकमेकांना एकमेकांचा आधार वाटु लागतो. पहिल्या प्रेमात आपण प्रचंड भावनिक असतो. त्यामुळे पहिले प्रेम कधीच विसरले जात नाही.

विचार न करता होते प्रेम

प्रेम म्हणजे प्रत्येकासाठीचा आवडता विषय असतो. कारण आयुष्यात एकदा तरी माणुस प्रेमात पडतोच. आपल्या प्रेमास प्रतिसाद जरी मिळाला नाही, तरीही एकतर्फी का असेना, पण एकदा तरी एखाद्यावर आपल मन येतचं आणि आपण तिथे आपलं मन गुंतवुन बसतो. आयुष्यात इतर गोष्टी करतांना, निवडतांना आपण विचार करतो. सर्व शक्यता-कुशक्यता पडताळून बघतो. एवढेच काय जिवनसाथी निवडतांना स्वभाव वगैरेंसारख्या या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र पहिल्या प्रेमाच्यावेळी असे होत नाही. कुठलाही स्वार्थ भाव मनात न ठेवता, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, आपण आपले मन एखाद्यास देऊन बसतो. प्रेम करतांना स्वभाव, आचार-विचार किंवा जात, धर्म, पंथ या गोष्टींना आपण कधीच थारा देत नाही. तर केवळ विश्वास ठेऊन कुठलाही विचार न करता आपण पहिलं प्रेम करुन बसतो. त्यामुळे सुद्धा पहिलं प्रेम विसरणे खुप कठिण होऊन जाते

प्रेमाची गरज असल्याने..

प्रेम आज या दुनियेत कुणाला नको आहे. सर्वत्र स्वार्थ, मत्सर, भेदभाव आणि द्वेषाने कलुषित झालेल्या आजच्या या काळात प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. कुणितरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करावं अशी प्रत्येकाचीच ईच्छा असते. त्यामुळे आपण बघतो की आज प्रत्येकजण प्रेमाच्या शोधात आहे. प्रेमाला वय नसते, मात्र तरिही तरुण मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त बघायला मिळते. कुणितरी आपल्या हक्काचं असावं, ज्याने आपल्यावर खुप प्रेम करावं, आपल्यावर विश्वास ठेवावा, ज्या गोष्टी आपण प्रत्येकाशी शेअर करु शकत नाही अशा गोष्टी तिच्याशी किंवा त्याच्याशी बोलता याव्यात, असे महाविद्यालयात शिकत असतांना प्रत्येकालाच वाटत असते. पहिलं प्रेम मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करतो. अशक्य गोष्टी सुद्धा आपल्याला शक्य वाटु लागतात. याऊलट दुसर्‍या प्रेमासाठी कधीही जास्त परिश्रम घेण्याचा विचार आपण करत नाही. कारण प्रेमाची गरज पहिलं प्रेम पूर्ण करतं, त्यामुळेदेखील पहिले विसरता विसरल्या जात नाही.

हे देखील वाचा Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

Bacchu Kadu: बच्चु कडूंना या कारणामुळे खावी लागणार १४ दिवस जेलची हवा; या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांनीच केला करेक्ट कार्यक्रम..

Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

women notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Tea side effect: चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..

Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.