PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त ‘या’ नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

PM kisan: शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देखील त्यापैकीच एक. देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 11 हप्ते मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट देखील पाहत आहेत. मात्र आता इथून पुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC बंधनकारक करण्यात आली आहे. eKYC केली नसल्याने, अनेक शेतकऱ्याच्या खात्यावर अकरावा हप्ता जमा झाला नसल्याचं देखील पाहायला मिळाले आहे. तुमचा देखील अकरावा हप्ता बँकेत जमा झाला नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. अकराव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला बाराव्या हप्त्यात येऊ शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला eKYC करणे आवश्यक आहे. (PM Kisan 12th Installment Alert)

यापूर्वी ई केवायसी ही प्रक्रिया खूप किचकट असल्याने अनेक शेतकरी याच्या भानगडीत पडत नसल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मात्र आता ही प्रक्रिया खूप सोपी करण्यात आली आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही pm kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन eKYC प्रक्रिया करू शकता. याशिवाय तुम्ही नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन देखील eKYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्ही eKYC केलेली असेल, आणि तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती तपासणी असेल, तर तुम्हाला आता केवळ एक कॉल करून देखील खात्याची स्थिती तपासता येऊ शकते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अनेक शेतकऱ्यांना बारावा हप्ता आपल्या खात्यात कधी जमा होणार याविषयी उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. अनेक शेतकरी 12 हप्त्याचे पैसे आपल्या खात्यात कधी जमा होतील, याची चौकशी देखील करताना दिसून येतात. मात्र आता तुम्हाला बारावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे, हे फक्त एक कॉल करून समजणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे, एग्रीकल्चर इंडियाने (Agriculture India) एक ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे.

या दिवशी येणार पैसे

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी एक डिसेंबर 2018 पासून केंद्र सरकारने दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दर चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर 11 हप्ते जमा झाले आहेत. यामधील बारावा हप्ता आता सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे. जर तुम्हाला अजून पर्यंत बारावा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला नसेल, आणि तुमच्या खात्याची स्थिती तपासायची असेल, तर तुम्ही खालील माहिती सविस्तर वाचा.

अशी तपासा हप्त्याची स्थिती 

तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती तपासायची असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करणं आवश्यक आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर कॉर्नर’ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. ‘फार्मर कॉर्नर’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘लाभार्थी स्थिती’ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायचं आहे.

नंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. तुम्हाला त्या पेजमध्ये तुमचा ‘आधार क्रमांक’ निवडायचा आहे. त्या पर्यायामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ‘Get Data’ यावर क्लिक करायचं आहे. ‘Get Data’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्याची सर्व माहिती मिळेल. ही प्रक्रिया किचकट वाटत असेल, तर तुम्ही केंद्र सरकारने जारी केलेला एक नंबर डायल करून देखील तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता. आपण ही माहिती देखील सविस्तर पाहू.

या सोप्या पद्धतीनेही तपासू शकता खात्याची स्थिती

देशातील अनेक शेतकऱ्यांना वेबसाईटवर जाऊन आपल्या खात्याची स्थिती तपासण्यात अडचण येत आहे, ही बाब लक्षात घेऊन ‘एग्रीकल्चर इंडिया’ यांनी शेतकऱ्यांना आपल्या खात्याची स्थिती तपासण्यासाठी कोणत्याही किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागू नये, आणि क्षणांत त्यांना आपल्या खात्यात कधी पैसे येणार आहेत? याची सर्व माहिती मिळावी, यासाठी एक नंबर जारी केला आहे. तो नंबर लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून डायल करावा लागणार आहे.

या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एग्रीकल्चर इंडिया यांनी जारी केलेल्या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत मोबाईल फोनवरून कॉल करावा लागणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून कॉल केल्यानंतर, त्यांना आपल्या बाराव्या हप्त्याची सर्व अपडेट मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या खात्याची स्थिती तपासण्यासाठी एग्रीकल्चर इंडियाने 155261 हा नंबर दिला आहे. शेतकऱ्यांना आता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 155261 हा नंबर डायल करावा लागणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून हा नंबर डायल केल्यास, शेतकऱ्यांना आपल्या खात्याचे सर्व स्टेटस पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Eggs Benefits: अंडी खात असाल तर सावधान! रोज किती अंडी खावीत? अंडी खाण्याचे परिणाम जाणून जाल चक्रावून..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

ITBP Recruitment 2022: ITBP मध्ये निघाली बंपर भरती; 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनो लवकर करा अर्ज..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.