नऱ्हेगावचे माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

0

नऱ्हेगावचे माजी उपसरपंच मा. श्री. अक्षय सुभाष इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झील कॉलेज परिसर नऱ्हेगाव याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करा, जीवन वाचवा!” हा उदात्त संदेश देत शनिवारी, २७ जून २०२६ रोजी सकाळी ०८:०० ते संध्याकाळी ०६:०० या वेळेत हे शिबिर पार पडणार असून, रक्तदात्यांना अनेक आकर्षक. भेटवस्तू आणि लकी ड्रॉ बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

झील कॉलेज चौक, नऱ्हे चौपाटी, इंगळेनगर, नऱ्हेगाव या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कुणाल इंगळे, जय गणेश मित्र मंडळ’ आणि ‘ॐ नमः शिवाय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना आकर्षण आणि भेटवस्तूबरोबर. लकी ड्रॉ च्या माध्यमातून अनेक मोठे बक्षीस देखील ठेवण्यात आली आहेत.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला . कृतज्ञता म्हणून पाणी जार, छत्री आणि झाडाचे रोपटे भेट म्हणून देण्यात येणार आहेत. सोबतच लकी ड्रॉच्या माध्यमातून जिंकलेल्या रक्तदात्यांना संध्याकाळी ६:०० वाजता एक भव्य ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्यांना इलेक्ट्रिक EV स्कूटी, वॉशिंग मशीन, कुलर, ओव्हन, मिक्सर बक्षिस म्हणून मिळणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आयोजकांनी ८६६८४२०३००, ८८०५४४१२१० आणि ८६२३०६६०६५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नऱ्हेगाव आणि परिसरातील तरुणांनी व नागरिकांनी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.