सावित्रीबाई मालिका सुरू करा म्हणत प्रेक्षकांचा स्टार प्रवाहवर संताप; #BanStarPravah ट्रेडिंगला, सोशल मीडियावर कमेंटचा महापूर..

0

टीआरपीचे कारण देत स्टार प्रवाह वाहिनीने “मी सावित्रीबाई जोतीराव फुले” ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 जून पासून ही मालिका प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार नसल्याचे चॅनलने स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर #BanStarPravah नावाचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात ट्रेडिंगला असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांनी सावित्रीबाईची मालिका बंद होत असल्यामुळे सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त केला असून, ही मालिका पुन्हा सुरू करा, नाहीतर आम्ही स्टार प्रवाह चॅनल पाहणार नसल्याची भूमिका घेतल्याचं सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा मालिकेतील कलाकारांशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये चॅनलने 50% रक्कम कपात करण्याची मागणी केल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. सहाजिकच त्यामुळे प्रेक्षक आणखीनच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. सासु-सुनांची भांडणे दाखवणाऱ्या मालिका वर्षांवर चालवून तुम्ही समाजाची वैचारिकता दिवाळखोरीत काढता. मात्र महिलांना सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि अभिमानाने जगायला शिकवणाऱ्या ऐतिहासिक मालिका बंद करण्याचा निर्णय घेता. तुमचा हा निर्णय महाराष्ट्र कधीही कापून घेणार नाही. अशा प्रकारचा रोष व्यक्त होत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी स्टार प्रवाह प्रचंड माजलेली वाहिनी आहे. या वाहिनीवर आता आम्ही यापुढे कोणतेही कार्यक्रम पाहणार नाही. सावित्रीबाईंची मालिका आता झी मराठीने दाखवावी, अशी देखील मागणी जोर धरत असून, झी मराठी वाहिनी देखील प्रेक्षकांचा रोष लक्षात घेऊन संधीचं सोनं करण्याच्या विचारत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

अमोल कोल्हे यांनी देखील मालिका बंद झाली तरी ही गोष्ट पूर्ण होणार असल्याचा निर्धार केला आहे. एक संधी बंद होत असली तरी दुसरीकडे संधी निर्माण होत असते. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष स्टार प्रवाह वाहिनीला एकप्रकारे इशारा दिल्याचे बोलत जात आहे. सोबतच झी मराठी यांनी देखील प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेतल्याने आता यापुढे सावित्रीबाईची मालिका झी मराठीवर या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. असं देखील सोशल मीडियावर बोलणं जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.