Mahendra Singh Dhoni: 19 वर्षाच्या IPL कारकिर्दीचा अखेर होणारा अंत; या दिवशी धोनी खेळणार शेवटचा सामना..
Mahendra Singh Dhoni: पाच आयपीएल ट्रॉफी (five IPL trophy) सगळ्यात जास्त फायनल आणि प्लेऑफ खेळणारा संघ म्हणून, (most finals and playoffs) चेन्नई सुपर किंग संघाने नावलौकिक मिळवला. चेन्नई सुपर किंग ( Chennai super kings) म्हणजे महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि महेंद्रसिंग धोनी म्हणजेच चेन्नई सुपर किंग हे अतूट नातं अखेर संपुष्टात येणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची तारीखही ठरली असून, चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2026 (IPL 2026) च्या हंगामात दुखापतीमुळे एकही सामना अद्यापपर्यंत खेळू शकला नाही. सुरुवातीला काही सामन्यात सुमार कामगिरी झाल्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पाहायला मिळत होती. चेन्नई सुपर किंग संघाला सुरुवातीच्या काही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या प्रतिक्षेचे कुतूहल आणखी वाढत गेले.
शेवटच्या काही सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंगने दमदार कामगिरी केल्यामुळे संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. अशातच आता महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांना तो खेळताना पाहायला मिळणार असून, हा त्याचा शेवटचा सामना असल्याचंही बोललं जात आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची अधिकृत माहिती नसली तरी दुखापतीमुळे तो अस्वस्थ आहे. अंतिम अकरामध्ये खेळायची त्याची इच्छा असली तरी देखील शरीर साथ देत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्याला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे.
माझ्या कारकिर्दीतला शेवटचा आयपीएल सामना मी घरच्या मैदानावर प्रेक्षकांसमोर खेळणार असल्याचं त्याने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. 18 मेला चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSKvsSRH) सामना Chepauk स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. हा सामना महेंद्रसिंग धोनी खेळणार असल्याचं बोललं जात असून, याच सामन्यात तो निवृत्तीची घोषणाही करेल, असंही सांगितले जात आहे. मात्र याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
हे देखील वाचा Hardik pandya: Munbai Indians नंतर BCCI ने देखील हार्दिक पांड्याला गाठले खिंडीत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम