Hardik pandya: Munbai Indians नंतर BCCI ने देखील हार्दिक पांड्याला गाठले खिंडीत..

0

Hardik pandya: Munbai Indians नंतर BCCI ने देखील हार्दिक पांड्याला गाठले खिंडीत..

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (hardik pandya) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येतो, तर कधी त्यांने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देखील जोरदार चर्चा होते. आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या चर्चेत आला असून, त्याच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोललं जात आहे.

https://x.com/i/status/2051164963981660405

सध्या आयपीएल स्पर्धा (ipl 2026) सुरू आहे. अनेक संघानी दमदार कामगिरी केली आहे. मात्र आयपीएल इतिहासात सर्वाधिक यशस्वी झालेल्या संघांना मात्र चमक दाखवता आलेली नाही. यामध्ये मुंबई इंडियन्स (mumbai Indians) हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. जेव्हापासून रोहित शर्मालाला (rohit sharma) कर्णधार पदावरून हटवलं आहे, तेव्हापासून मुंबई इंडियन्स संघाची ब्रँड व्हॅल्यू सातत्यानं घसरत चालल्याचे पाहायला मिळते. रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पांड्याला मुंबईची धुरा देण्याचा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी नुकसानकारक ठरला. हा केवळ मुंबईसाठीच नाही, तर हार्दिक पांड्यासाठी देखील नुकसानदायक ठरला.

या हंगामात देखील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई संघ जवळपास या स्पर्धेतून बाहेर झालाय. सलग तीन सीजन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई संघाला दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यातच आता हार्दिक पांड्याच्या आयुष्यात आणखी एक वाईट बातमी आल्याचं पाहायला मिळत आहे.

हार्दिक पांड्या सध्या आपली गर्लफ्रेंड माहिमा शर्मा (maheka sharma) हिच्या सोबत ट्रॅव्हल करतो. मात्र आता त्याला यापुढे आपली गर्लफ्रेंड शर्मा (Hardik Pandya girlfriend maheka sharma) सोबत ट्रॅव्हल करता येणार नाही. बीसीसीआय याविषयी नवीन नियम करण्याच्या तयारीत असून, भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला आपल्या गर्लफ्रेंडला संघासोबत तसेच विदेशी दौऱ्यावर ट्रॅव्हल करता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

खेळाडूंच्या अनेक गर्लफ्रेंड इन्फ्लुएन्सर आहेत. अनेक जण गेमिंग अँप प्रमोट करताना दिसून येतात, अनेकांनी पूर्वी केलेल्याही आहेत. याशिवाय पैशाची मोठी देवाण घेवाण देखील झाल्याच्या घटना आहेत. त्यामुळे अँटीकरप्शन विभागाशी याचा संबंध येऊ शकतो. अशावेळी खेळाडूची बदनामी होऊ नये, हा यामाचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे खेळाडूंना आपल्या गर्लफ्रेंडसोबत ट्रॅव्हल करता येणार नाही. हा नियम 2027 पासून लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा MI captain Rohit Sharma : मुंबई इंडियन्स कडून हार्दिक पांड्याला गेट आउट; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.