Eggs Benefits: अंडी खात असाल तर सावधान! रोज किती अंडी खावीत? अंडी खाण्याचे परिणाम जाणून जाल चक्रावून..

Eggs Benefits: अंडी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. अनेकजण सहज नाश्ता म्हणून हल्के-फुल्के काही खायचे झाल्यास अशावेळी अंड्यांना प्राधान्य देतात. अंड्याचे विविध पदार्थ सुद्धा चविष्ट असतात. ज्यामध्ये आम्लेट आणि भुर्जी सर्वात प्रसिद्ध आहे. शाकाहारी लोक देखील अंडी खातात. अंड्यांचा ऊपयोग विविध पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. अंड्यांचे पदार्थ खाण्यास चविष्ट असण्याबरोबरच ते पोष्टीक सुद्धा असतात. अंडी हे आरोग्यासाठी प्रचंड लाभकारी आहे. त्यामुळे अंड्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र अंडी किती खावीत आणि त्याचे काय परिणाम आहेत हे देखील सविस्तर जाणून घेऊ.

अंड्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे शरीरात ऊर्जा निर्माण करतात. अंड्यांमुळे शारीरीक कमजोरी देखील कमी होऊन शरीरास शक्ती देखील मिळते. जिम ट्रेनर, डॉक्टर देखील नेहमी अंडी खाण्याचा सल्ला देतात. कुस्तीपटु असोत की बॉडीबिल्डर अंडी त्यांचा आहाराचा एक महत्वाचा भाग असतो. अंड्यांचे महत्व डॉक्टर सुद्धा जाणतात. बर्‍याचदा मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. जखम भरुन काढण्यासह रक्तप्रवाह सुरळीत करणे, शरीरातील कॅल्शीयमची मात्रा भरुन काढणे, हाडे मजबुत करणे, यासह अंड्यांचे अनेक विविध फायदे आहेत. या लेखात अंडी शरीरासाठी किती ऊपयोगाचे आहे, तसेच दिवसातून किती अंडी खाल्ली पाहिजेत याबद्दल सविस्तर जाणुन घेऊ या.

वजनावर नियंत्रण

बर्‍याचदा जेवणाऐवजी आपण नाश्त्यामध्ये काही चटपटीत पदार्थांना किंवा फास्ट फुडला प्राधान्य देतो. मात्र अशावेळी अंडे खाणे योग्य ठरु शकते. नाश्त्यामध्ये तेलकट पदार्थ किंवा फास्ट फुड खाल्ल्यास तुम्हाला काही वेळातच भूक लागल्यासारखे जाणवते, त्यामुळे पुन्हा काही ना काही खाण्यात येते. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. परंतू अशावेळी अंडी खाणे तुम्हाला फायदेशीर ठरते. अंड्यांमुळे पुष्कळ वेळ पोटाला आधार राहतो. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. अंडी पोषक असल्यामुळे तुमच्या शरीरावर ते अपाय सुद्धा करत नाही.

मोती बिंदुवर आहे प्रभावी.

वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमी-कमी होत जाते. डोळ्यांच्या पेशींची झीज होत असल्यामुळे असे घडते. डोळ्या संबंधीत ईतरही आजार म्हातारपणात ऊद्भवतात. त्यापैकीच एक मोतीबिंदु आहे. आजकाल मोतीबिंदुचे प्रमाण तरुणांमध्ये सुद्धा वाढते आहे. परंतू रोज एक अंडं खाल्ल्यास तुमच्या मोतीबिंदुचा प्रभाव कमी होउ शकतो. अंड्यात कॅरीटोनो ईड्स नावाचा घटक असतो. डोळ्यांच्या पेशींची झीज रोखण्यासाठी हा घटक प्रभावी आहे. त्यामुळे दिवसभर स्क्रीनसमोर बसत असाल, किंवा मोबाईल वापराचे प्रमाण तुमचे जास्त असेल तर रोज एक अंड तुम्ही खाल्लच पाहिजे. जेणेकरुन भविष्यात डोळ्यासंबंधीत ऊद्भवणार्‍या आजारास तुम्ही आजच प्रतिबंध घालु शकता.

रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ऊपयोगी

रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास अंडे ऊपयोगी आहेत. काहीजणांचे रक्तच मुळात घट्ट असते. अशांना रक्त गोठण्यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच काही व्हिटॅमीनची शरीरात कमी असली, की वारंवार रक्त गोठते. मात्र अंडी यावर प्रभावी आहे. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालु ठेवण्यासाठी अंडी ऊपयोगाची आहे. याशिवाय अंड्यांचे सेवन केल्याने रक्त गोठण्यावर प्रतिबंध येते.

रक्त पातळ करण्यासाठी वेगळी औषधे सुद्धा काहींना घ्यावी लागतात. अशा रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंडी ऊपयोगाची ठरु शकतात. अंड्यामधील केओलीन हा घटक शरीरातील व्हिटॅमीनची कमी भरुन काढतो, जेणेकरुन रक्त गोठण्याची समस्या काहीशी कमी होते. हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करण्यासाठीदेखील अंडी फायदेशीर आहेत.

ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव

बहुतांश महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची समस्या ऊद्भवते. ब्रेस्ट कॅन्सरचे वेळीच निदान होऊन ऊपचार पद्धती सुरु न केल्यास मृत्यु सुद्धा होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासीत होणार्‍या महिलांची संख्या पुष्कळ आहे. मात्र काही संशोधनांच्यामते अंडी ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार आठवड्यातून सहा अंडी खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ४४ टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे महिलांनी आहारात अंड्यांना समाविष्ट करणे फायद्याचे ठरु शकते. बहुतांश डॉक्टर ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांमधील पोषक तत्वे ब्रेस्ट कॅन्सर व्यतिरीक्त सुद्धा महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.

हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचे

वाढत्या वयानुसार, हाडे ठिसुळ होत जातात. गुडगेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्यांनी रोजचे जगणे कठिण होऊन जाते. हाडांची झीज होत असल्यामुळे या समस्या ऊद्भवतात. अंडी हाडांची झीज होण्यापासून रोखते. याशिवाय अंड्यांमध्ये कॅल्शीयम आणि व्हिटॅमीन “डी” चे मुबलक प्रमाण असल्यामुळे हाडांसाठी ते फायदेशीर आहे. हाडे मजबुत करण्यासाठी रोज आहारात अंड्यांचे सेवन असणे आवश्यक आहे.

याशिवाय अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अंडी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. फॉस्फरस, फोलेट या जिवनसत्वांचा देखील अंड्यांमध्ये समावेश असतो. अंड्याच्या पिवळ्या बल्कमध्ये फायबरची मात्रा अधिक असते. जे शरीराला शक्तीवर्धक ठरते. अंड्यांचे आरोग्याच्या दृष्टीने पुष्कळ फायदे आहेत. त्यामुळे रोजच्या आहारातही अंड्यांचा समावेश असल्यास हरकत नाही. मात्र अंडी गरम असल्यामुळे ऊन्हाळ्यात अंडी खाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

हे देखील वाचा NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Lampi Virus: लम्पी रोगाचा महाराष्ट्रातही कहर; आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच करा हे काम अन्यथा..

Pitru Paksha 2022: कावळ्या व्यतिरिक्त पितृपंधरवड्यात आपले पूर्वज या तीन रूपात देतात आशीर्वाद; त्यांना उपाशी पाठवणं असतं अशुभ..

Indian Army NCC Recruitment 2022: या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत..

PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..

Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.