Pitru Paksha 2022: कावळ्या व्यतिरिक्त पितृपंधरवड्यात आपले पूर्वज या तीन रूपात देतात आशीर्वाद; त्यांना उपाशी पाठवणं असतं अशुभ..

Pitru Paksha 2022: यावर्षी 10 सप्टेंबर पासून पितृपंधरवड्याला सुरुवात होत आहे. यावर्षी तब्बल सोळा दिवसांचा पितृपंधरवडा असणार आहे. 25 सप्टेंबर पर्यंत चालणारा हा पितृपंधरवडा तब्बल बारा वर्षानंतर आला आहे. या काळात आपल्या पूर्वजांची अपुरी राहिलेली इच्छा किंवा पूर्वजांना या काळात श्राद्ध रूपात भोजन घातलं जातं. आपले पूर्वज या काळात प्रत्यक्ष येऊन भोजन करू शकत नसले, तरी त्यांच्या रूपात कावळ्याचा मान खूप मोठा मानला जातो. असं असलं तरी पिंडदान करण्यासाठी फक्त कावळाच महत्त्वाचा नसतो, तर आणखी देखील काही प्राण्यांच्या रूपात आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात.

अनेकांना या पितृ पंधरवड्याचे महत्त्व माहित देखील असेल, अनेकांना आपले पूर्वज कोणत्या रूपात येऊन आपण संतुष्ट असल्याचे सांगतात. किंवा आशीर्वाद देतात, हे माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत. पितृशास्त्रामध्ये कावळ्याला विशेष मान दिला गेला असला तरी, कावळ्या व्यतिरिक्त देखील आणखी काही प्राण्यांच्या माध्यमातून आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्याचे काम करतात. पूर्वजांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या काही इच्छा किंवा मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी व्यवस्थित झाला नसेल, तर त्यांचा आत्मा पृथ्वीवर भटकत असतो. त्यांचा आत्मा संतुष्ट आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या पंधरवड्याला खूप महत्त्व आहे.

पितृपंधरवड्यामध्ये पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना रिकाम्या आधी पाठवणे शुभ मानले जात नाही.त्यामुळे अनेक जण या पंधरवड्यात गोरगरिबांना दान देखील करत असतात. या पंधरा दिवसांमध्ये गोरं गरीबांच्या उपयोगाच्या वस्तू दान देखील करणे शुभ मानलं जातं. जर तुमची परिस्थिती गरीब असेल, तर फार महागड्या वस्तू देण्याची गरज नसते. पाहुण्यांना गुळ देऊन पाहुणचार करणे देखील शुभ मानलं जातं. या पंधरा दिवसांत तिथीनुसार प्रत्येक जण कावळ्याला जेवू घालत असतो. मात्र कावळ्या व्यतिरिक्त देखील आपले पूर्वज आणखी काही प्राण्यांच्या माध्यमातून आशीर्वाद देतात. जाणून घेऊया सविस्तर.

कावळे

पितृपंधरवड्यामध्ये जर तुमच्या दारात किंवा घरावर कावळे आले, तर त्यांना तुम्ही हाकलून लावणं हे अशुभ मानलं जातं. कावळ्याच्या रुपात तुमचे पूर्वज तुमच्या भेटीसाठी आलेले असतात, असा समज पितृशास्त्रात देण्यात आला आहे. माणूसाला उजेडात पाहण्याची दृष्टी असते. तर काही प्राण्यांना अंधारामध्ये पाहण्याची दृष्टी प्राप्त असते. उदाहरण द्यायचं झालं तर वटवाघुळ व, घुबड इड्यादी. त्याचप्रमाणे कावळ्याला देखील विशेष दृष्टी प्राप्त असते. कावळ्याला जीवात्मा पाहण्याचं वरदान देण्यात आले आहे, असे बोलले जाते. म्हणून कावळा दारात आल्यानंतर ते खूप शुभ मानलं जाते.

गरजू आणि गरीब

या पंधरा दिवसांमध्ये जर तुमच्या घरी कोणी भिकारी किंवा भीक मागण्यासाठी एखादा गरीब व्यक्ती आला असेल, तर त्याला हाकलून देणे देखील या काळात खूप अशुभ मानले जाते. तुमच्या ऐपतीप्रमाणे अशा व्यक्ती जर तुमच्या घरी काही मागण्यासाठी आल्आ तर त्यांना मोकळ्या हाताने परत पाठवणं अशुभ असतं. त्यांना काही ना काहीच देणं हे शुभ मानले जाते. आपल्याकडे देण्यासाठी काही नसेल, तर तुम्ही तुमच्या ताटातली भाकरी दिली तरी देखील ते शुभ असते. खास करून या दिवसांमध्ये कपड्यांचं दान शुभ मानलं जातं. तुमच्या पूर्वजांना जी कोणती गोष्ट आवडत होती, अशा गोष्टींचे या दिवसांमध्ये दान केल्यास हे खूप उपयुक्त मानलं जातं.

कुत्रा

कुत्र्याची ओळख ही प्रामाणिक प्राण्यांमध्ये होते‌. हे तुम्हाला माहिती असेल‌. मात्र कुत्रा हा यमाचा दूत देखील असल्याचं बोललं जातं. आणि म्हणून या काळात तुमच्या घरी कुठूनही कुत्रा आला, तर तुम्ही त्याची पूजा करणं आणि त्याला काहीतरी खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं. अनेकांना सवयी असते, रात्रीचं शिळं असलेलं अन्न कुत्र्यांना टाकतात. मात्र असं करणं योग्य नाही. कारण या तुमच्या कृत्यामुळे पूर्वज नाराज होतात. असं देखील बोललं जातं. पितृपक्षातच नाही, इतर वेळी देखील प्राण्यांवर प्रेम आणि प्राण्यांना खाऊ घालणं, खूप पुण्याचा काम असतं.

गाय

हिंदू धर्मामध्ये गाईला किती महत्त्व देण्यात आलं आहे, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव राहतात. हे वाक्य देखील तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. हिंदू धर्मात गाईची पूजा केली जाते. तुम्ही पाहिलं असेल, अनेकदा देव दर्शन करून आल्यानंतर, गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. पंधरा दिवसांमध्ये देखील गाईची रोज पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. श्राद्धकार्य करत असताना या दिवशी गायला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानलं जातं.

हे देखील वाचा Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

 Indian Army NCC Recruitment 2022: या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत..

PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..

Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Lata Koli News: बिबट्या झडप टाकणार इतक्यात वयोवृद्ध महिलेने टाकली पुर आलेल्या तापी नदीत ऊडी; पुढे पुरात जे घडले ते पाहून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.