Hardik natasha divorce : नताशा-हार्दिक वेगळं होण्याचं कारण धक्कादायक; हार्दिक घेणार मोठा निर्णय..

0

Hardik natasha divorce : नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केला. या विश्वचषकामध्ये प्रत्येक सामन्यात वेगवेगळा स्टार खेळाडू म्हणून समोर आला. साहजिकच सांघिक खेळामुळे भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यास अधिक मदत झाली. हार्दिक पांड्याने (hardik Pandya) देखील भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं वाटा उचलला.

गेल्या सहा महिन्यांपासून हार्दिक पांड्यासाठीचा काळ सोपा राहिला नव्हता. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची जबाबदारी दिल्यानंतर, हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्याचा परिणाम संघावर देखील झाल्याचे पाहायला मिळालं. कर्णधार आणि खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या सपशेल अपयशी ठरला.

एकीकडे हार्दिक पांद्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. तर दुसरीकडे पत्नी नताशा स्तांकोविक (Natasa Stankovic) सोबत घटस्फोट झाल्याचा बातम्या देखील प्रसारित झाल्या. साहजिकच सहा महिन्याचा काळ पांड्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होता. विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने याविषयी मनातली खंत बोलून देखील दाखवली. अशातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा या दोघांनीही अद्याप अधिकृतरित्या घटस्फोट झाल्याचा खुलासा केलेला नाही. मात्र दोघांमधील पती-पत्नी हे नातं संपल्याचं स्पष्ट झालं आहे. दोघांमध्ये दुरावा निर्माण होण्याचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदी हार्दिक पांड्याची वर्णी लागल्यानंतर, हार्दिकला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, तेव्हापासून नताशा आणि हार्दिकच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती समोर आली आहे.

काही मीडिया रिपोर्ट नुसार नताशा स्वतःचे करिअर सुरू करू इच्छित होते. हार्दिकचा मात्र या गोष्टीला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिकने विरोध केल्यानंतर नताशाने देखील जुन्या मित्रांना भेटायला सुरुवात केली. अलेक्झांडर इलिक (Alexander Ilic) आणि दिशा पटानी हे दोघे रेशनशिपमध्ये असल्याचं बोललं गेलं. मात्र नताशा सोबत त्याला पब्लिकली पाहिले गेले. इतकचं नाही, तर हार्दिक आणि तुझा घटस्फोट झाला आहे का? असं देखील नताशाला विचारण्यात आले होते. यावर देखील नताशाने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

T20 World Cup 2024 : 24 तासात पाच खेळाडूंनी केली निवृत्तीची घोषणा; तिघांना समजावण्याचा प्रयत्न..

तेव्हापासूनच दोघेही एकमेकांपासून वेगळं झालं असल्याच स्पष्ट झालं होतं. नुकताच टी-ट्वेंटी विश्वचषक पार पडला. विश्वचषक जिंकून देण्यात हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा होता. मात्र नताशाने कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा दिल्या नसल्याने, घटस्फोटाच्या बातमीला अधिक दुजोरा मिळाला. या प्रकरणावर आता हार्दिक पांड्या देखील मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्या लवकरच घटस्पोट घेणार असून, नवीन लग्न देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अटीत तीन मोठे बदल; आता असा करता येणार अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.