Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

Google pay loan: भारत अतिशय वेगाने (digital India) घोडदौड करतो आहे. आता सर्वत्र digitalisation बघायला मिळते आहे. पेमेंट प्रणालीमध्ये सुद्धा आता डिजीटल व्यवहार मोठ्याप्रमाणात वाढले आहे. डिजीटल व्यवहारांचे पुष्कळ फायदे आहेत आणि लोकांच्या ते लक्षात येतायत. त्यामुळे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत बहुतांश व्यवहारासाठी डिजीटल पेमेंट (digital payment) प्रणालीचा ऊपयोग होतो. याशिवाय डिजीटल पेमेंट प्रणालीमुळे भ्रष्टाचारास सुद्धा आळा घालण्यात सरकारला यश येते आहे. अशांत गुगल पे, (Google pay, Paytm ,phone pay) या UPI माध्यमांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. डिजीटल ईंडियाच्या जडणघडणीत या डिजीटल पेमेंट सिस्टीमचे फार मोठे योगदान ठरत आहे.

Google pay UPI मुळे छोटे मोठे व्यवहार करणे अधिक सोईस्कर तर झालेच आहे. या माध्यमाच्या आधारे पेमेंट केल्यास ग्राहकांना कॅश बॅक सारख्या ऑफर्स देखील देण्यात येते. शॉपिंग, बिल पेमेंट, यासारख्या सुविधा Google pay UPI सारख्या माध्यमातून मिळतातच मात्र आता Google pay UPI वापरणाऱ्यासाठी एक खूप मोठी बातमी आहे. Google pay UPI आता तब्बल एक लाखापर्यंत लोन देखील देत आहे. होय तुम्ही बरोबरच ऐकले आहे. Google pay आता आपल्या ग्राहकांना कर्जाच्या स्वरूपात लोन देणार आहे.

Google pay आणि डीएमआय कंपनीमध्ये करार झाला असून वापरकर्त्यांसाठी कर्जाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. कुठल्याही बॅंकेतुन कर्ज घेणे म्हणजे प्रचंड दोखेदुखी असते हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. मात्र आता लोन घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. गुगल पे द्वारे थेट तुम्हाला तुमच्या खात्यावर पर्सनल कर्ज ऊपलब्ध करुन दिले जाणार. विशेष म्हणजे, एक लाखापर्यंतचे हे कर्ज असणार आहे. ज्याचा लाभ तुम्ही तुमच्या कुठल्याही वैयक्तिक कामासाठी घेऊ शकता. डीएमआय कंपनी आणि गुगल पे यांचा हा संयुक्त ऊपक्रम आहे. ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

कोणाला मिळणार लोन

गुगल पे वापरकर्त्यांसाठीच ही कर्जाची देण्यात आली असली तरी सगळ्याच वापरकर्त्यांसाठी ही सुविधा नसणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवुन देण्यात आले आहेत. जर तुमची व्यवहाराची हिस्ट्री चांगली असेल, तर तुम्ही या कर्जाचे लाभार्थी ठरु शकता. त्यामुळे गुगल पे च्या मदतीने बिलांचे पेमेंट व व्यवहार करण्यासोबतच आता लोनची सुविधा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. गुगल पे च्या या लोनसाठी सर्वात अगोदर आपली ट्रांन्झॅक्शन हिस्ट्री व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

लोन मिळण्यासाठीचे निकष

गुगल पे च्या सगळ्याच वापरकर्त्यांना हे लोन मिळणार नाहीये, ज्यांचे व्यवहार चांगले आहेत, अशांनाच या लोनमध्ये प्राधान्य देण्यात येईल. डीएमआय (DMI) कंपनीच्यावतीने प्री क्वालीफाईड एलीजीबल युजर्स तयार केले जातील. त्यानंतर त्यांच्यासाठी ही लोनची सुविधा ऊपलब्ध करुन देण्यात येईल. यानंतर लोनची गरज असणार्‍यांकडून लोनसाठी अर्ज मागविले जातील.

त्यावर पुन्हा एकदा सर्व बाबी पडताळुन बघण्यात येतील. डिजीटल व्यवस्था असल्यामुळे या सर्व प्रक्रियेला फार कमी वेळ लागेल. त्यामुळे आवश्यकता असणाऱ्याला लवकरात लवकर लोन ऊपलब्ध होणार आहे. लोनचा लाभ घेण्याअगोदर ग्राहकाचे सिव्हील स्कोर सुद्धा बघितले जाणार आहेत. ज्यावरुन ग्राहकाने या अगोदर घेतलेले लोन कशाप्रकारे फेडले, त्यासंबंद्धीत ग्राहकाचे व्यवहार कसे होते. या सर्व प्रक्रिया पार पडताच, लगेच ग्राहकाच्या खात्यात लोनचे पैसे टाकण्यात येतील.

कसे घ्यायचे लोन

डीएमआय कंपनीच्यावतीने आणि ‘गुगल पे’च्या सहाय्याने हे लोन तुम्हाला मिळणार आहे. मात्र गुगल पे वरुन हे लोन घ्यायचे कसे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याच प्रश्नाचे ऊत्तर याठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेणेकरुन ‘तुम्ही गुगल पे’ चे वापरकर्ते असल्यास या सुविधेचा लाभ मिळवु शकाल. सर्वप्रथम तुम्हाला गुगल पे ओपन करावे लागणार आहे. जर कंपनीने लोनसाठी ठरवुन दिलेले सर्व निकष तुम्ही पूर्ण केले करत असाल तर प्रमोशनच्या खाली तुम्हाला ‘money‘ नावाचे ऑप्शन तुम्हाला दिसेल.

त्यानंतर खाली आणखी एक ‘लोन’ नावाचा पर्याय पहायला मिळेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑफरचा ऑप्शन ऊघडेल. त्यानंतर DMI ऑप्शन तुम्हाला दिसेल. यानंतर ऑफर अंतर्गत तुम्ही किती रक्कम लोन स्वरुपात मिळवण्यासाठी पात्र आहात, हे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर अप्रुव्ह होऊन, लगेच लोनचे पैसे तुमच्या बॅंक खात्यात जमा होतील.

३६ महिन्यांसाठी मिळेल लोन

‘गुगल पे’ च्या सहाय्याने अगदी सहज तुम्ही हे लोन मिळवु शकता. आम्ही तुम्हाला लोन मिळवण्यासाठीची ती सर्व प्रक्रिया वर समजावुन सांगितलीच आहे. परंतू हे लोन मिळवण्यासाठी तुम्हाला काही विशेष काळजी घ्यायची आहे. जसे की तुमचा सिव्हील स्कोर चांगला असणे फार गरजेचे आहे. त्यासोबतच गुगल पे वरील तुमचे व्यवहार सुद्धा चांगले असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला लोन मिळवण्यात कुठल्याही समस्या येणार नाहीत. ग्राहकांना या लोनच्या सुविधेसाठी ३६ महिन्यांकरिता एक लाखापर्यंतचे लोन मिळणार आहेत. त्यामुळे बॅंकेतुन लोन मिळवण्याच्या डोकेदुखीपेक्षा हा पर्याय नक्कीच फायद्याचा ठरु शकतो.

 हे देखील वाचा Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Law For Women भांडण सोडा, पत्नीला फक्त हे जरी म्हणाला, तरी खावी लागेल जेलची हवा; कायदा वाचून लग्न करायलाही घाबराल..

Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Lata Koli News: बिबट्या झडप टाकणार इतक्यात वयोवृद्ध महिलेने टाकली पुर आलेल्या तापी नदीत ऊडी; पुढे पुरात जे घडले ते पाहून..

Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.