Lata Koli News: बिबट्या झडप टाकणार इतक्यात वयोवृद्ध महिलेने टाकली पुर आलेल्या ‘तापी’ नदीत ऊडी; पुढे पुरात जे घडले ते पाहून..

0

Lata Koli News: वन्यजीव आणि मानवी संघर्ष आपल्यासाठी काही नवा नाही. आपण बर्‍याचदा अशा बातम्या ऐकत असतो. बर्‍याचदा यादरम्यानच आपल्याला मानवी शौर्याचे दर्शनसुद्धा घडते. लहाणग्या चिमुकल्याचे प्राण वाचण्यासाठी महिलेने वाघाशी केलाला संघर्ष असो किंवा अस्वलाच्या तावडीतुन सुटण्यासाठी केलेले अथक प्रयत्न असो असे प्रकार आपण ऐकत आलो आहोत. मात्र जळगाव जिल्ह्यात घडलेली ही घटना ऐकुन तुमचे भान हरवल्याशिवाय राहणार नाही. शेतातून परतत असतांना अचानक बिबट्या (leopard) समोर आला आणि त्या बिबट्यापासून प्राण वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता महिलेने तापी नदीत (Tapi River) ऊडी घेतली. बिबट्यापासून तर प्राण वाचले, पण नदीला आलेल्या पुराने मात्र एक वेगळीच लढाई लढण्यास वयोवृद्ध महिलेने भाग पाडले. परंतू या लढाईतसुद्धा त्या महिलेने विजय मिळवला. (Lata Koli News)

जळगाव (Jalgaon news) जिल्ह्यातील चोपडा (chopda) तालुक्यातील कोळमबा (kolamba) गावात लता कोळी (Lata Koli) नावाच्या ५८ वर्षीय महिला राहतात. शेतकरी कुटुंबात (Farmer family) राहत असल्यामुळे शेती हा त्यांचा जिवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे १० सप्टेंबरच्या दिवशीसुद्धा त्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतातुन परत येतांना त्यांना अचानक समोरुन जोरात धावत येणारे कुत्रे दिसले. थोड्या वेळात बघतात तर काय? समोरुन चक्क बिबट्या त्यांच्या दिशेने वेगाने येत होता. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतुन स्वत:ची सुटका करण्यासाठी या ५८ वर्षीय महिलेने क्षणाचाही विचार न करता बाजुच्या तापी नदीत ऊडी घेतली. मात्र नदीला पुर आल्याने प्रचंड वेगाने नदीतील पाणी वाहत होते.

बिबट्यापासून तर स्वत:ला वाचवले, मात्र नदीच्या पुरामुळे जिवन जगण्यासाठी एक नविन लढाई त्यांना लढावी लागणार होती. पुराच्या प्रचंड वेगाने येणार्‍या पाण्यासोबत काही कळायच्या आत तब्बल ८ ते १० किमी त्या वाहुन गेल्या. त्यानंतर थोडे पोहणे त्यांना येत असल्याने त्यांनी पाण्यातुन किनार्‍यावर येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. ऐवढ्यात त्या एका गावाजवळ पोहचल्या असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी बचावासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र कुणिही त्यांच्या मदतीला येऊ शकले नाही. ऐवढ्यात त्यांना केळीचे सुकलेले झाड त्याठिकाणाहुन वाहत जातांना दिसले. त्यांनी लगेच त्या झाडाचा आधार घेतला आणि तब्बल १३ तास त्या झुंज देत राहिल्या.

केळीच्या झाडाने लता कोळींना खुप मदत झाली. परंतू पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की नदीचा किनारा गाठण्यात त्यांना दमछाक होत होती. परंतू त्यांचे प्रयत्न अद्यापही सुरुच होते. यादरम्यानच एका गंभीर परिस्थितीतून त्यांना जावे लागले. चक्क एका धरणाच्या दरवाजातुन त्या नदीपात्राच्या दुसरीकडे फेकल्या गेल्या. यादरम्यान केळीचे झाड त्यांच्या हातून जवळपास सुटलेच होते. मात्र त्यांनी पुन्हा ते झाड आपल्या ताब्यात घेतले. धरणाच्या दरवाजातुन निघतांना त्यांची साडीसुद्धा एकाठिकाणी अडकली, त्यामुळे काही काळ त्या तिथेच अडकल्या होत्या, थोडा धीर येतो ना येतो तो लगेच मागुन आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने त्याची साडी फाटली आणि त्या तेथुन निसटल्या.

पुढे गेल्यानंतर एक गावात गणपती विसर्जन सुरु होते. काही लोक पुलावरुन गणपती विसर्जन करत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा सुरु केला. मात्र पाण्याच्या खळखळाटात त्यांचा आवाज त्या लोकांपर्यंत पोहचत नव्हता. यादरम्यानच एक गणपतीची मुर्तीसुद्धा त्यांच्या डोक्यावर आदळली, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला ईजासुद्धा झाली. कुणितरी महिला पाण्यातुन वाहत जात असल्याचे पुढे काही लोकांच्या लक्षात आले. निमगाव परिसरात पाण्याच वेग थोडाफार ओसरत आला होता. लोकांच्या लक्षात आल्यानंतर काही लोकांनी पुढाकार घेत लता कोळी यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वेळातच त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.

तब्बल १३ तास लता कोळी यांनी पुराच्या पाण्यात झुंज दिली. अखेर त्यांच्या लढतीस यश मिळाले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती ही म्हण त्यांच्याबाबत खरी ठरली. केळीचे सुके झाड त्यांच्यासाठी जिवनदान घेऊन आले होते. तब्बल १३ तास केळीच्या झाडाच्या सहाय्याने लता कोळी यांनी तग धरला. अखेर त्यांनी मरणाच्या दारातुन त्या सुखरु परत आल्या. पाण्यातुन बाहेर काढल्यानंत त्यांची शुद्ध हरवली होती. मात्र ऊपस्थितांनी त्यांना लगेच दवाखान्यात नेले. ज्या गावात त्यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. त्याच गावात त्यांचे काही नातेवाईकसुद्धा होते. त्यामुळे त्याठिकाणी त्यांना खुप मदत झाली.

शुद्धीवर आल्यावर लता कोळी यांनी सांगितलेली आपबिती ऐकुण गावकरी सुन्न झाले. संध्याकाळापासूनच त्या बेपत्ता असल्यामुळे गावकर्‍यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर त्या सुखरुप परत आल्यामुळे गावकर्‍यांमध्येसुद्धा एक वेगळेच आनंदाचे वातवारण होते. कुटुंबाने व गावकर्‍यांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. त्या सुखरुप असल्याचे कळताच कुटुंबसुद्धा निर्धास्त झाले.

हे देखील वाचा Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

Asia Cup final: पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने फायनलही जिंकला आणि रोहित शर्माचं तोंडही बंद केलं..

Pradhan Mantri Ujjwala Yojana: या योजनेअंतर्गत मिळतोय मोफत गॅस सिलिंडर; असा करा अर्ज आणि घ्या योजनेचा लाभ..

Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Parenting Tips: मुलं मोठी झाल्यावर पालकांनी त्यांच्या सोबत झोपणे पडू शकते महागात, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष.

Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे.

Google Search:he व्हिडिओ पाहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.