Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

Airtel vs Jio: ईंटरनेटवरच (internet) आपलं अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ईंटरनेशिवाय दिवस काढणे कठिण आहे. कारण आपल्या मोबाईलवर (mobile) मनोरंजन करायचे असो किंवा ऑफीससंबंद्धीत काही महत्वाची कामे करायची असोत, किंवा गुगलवर काही शोधायचो असोत, नोकरीच्या संधी बघायच्या असोत या सर्वांसाठी ईंटरनेट हे फार महत्वाचे होऊन गेले आहे. मात्र ईंटरनेट चालवणे म्हणजे आता हळुहळु खर्चिक होते आहे. नेटच्या रिचार्जवर पुष्कळ पैसा खर्च होतोय. अनेकांना आता हे जड जात आहे. त्यामुळं नेटच्या रिचार्जवर (recharge) पुष्कळ पैसा खर्च होत असल्यास जिओ आणि एयरटेल तुमच्यासाठी काही खास प्लॅन घेऊन आले आहेत. त्यामुळे या रिचार्ज प्लॅनबाबत तुम्ही जाणुन घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. यासोबतच तुम्हाला या दोन्ही टेलिफोन कंपनीपैकी एक निवडायची झाल्यास, तुमच्या फायद्याची कोणती आहे, हे देखील जाणून घेऊ. (Airtel vs Jio who is the best)

जिओ टेलीफोन कंपनी (jio telecom company) काही वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आली मात्र अनेकांचा या कंपनीने बाजार उठवण्याचं पाहायला मिळतं. सुरुवातीचे एक वर्ष ग्राहकांना मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा दिल्यानंतर जीवनी देखील आपले कॉल तर आणि इंटरनेटचा दर देखील वाढवल्याने आता ग्राहक संतप्त असल्याचे पाहायला मिळतं. जीवनी आपले इंटरनेट प्लॅन (internet plan) तर वाढवण्याची शिवाय जिओ नेटवर्क देखील व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत असतात. मात्र तरीदेखील जिओ टेलिकॉम कंपनीचा ग्राहक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते.

जिओ टेलिकॉम कंपनीने सुरुवातीला ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवण्यासाठी कंपनीने आपले प्लॅन देखील स्वस्त केले. मात्र नंतर हळूहळू रिचार्ज प्लॅन देखील महाग केले, शिवाय जिओ इंटरनेट सेवा देखील व्यवस्थित देत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत असतात. दुसरीकडे मात्र एअरटेलने जिओ पेक्षा काही स्वस्त प्लॅन देखील मार्केटमध्ये उतरवले असल्याने एअरटेल टेलिकॉम कंपनीकडे (Airtel telecom company) ग्राहक आता आकर्षित होताना दिसत आहेत. याशिवाय एअरटेलचा नेटवर्क देखील उत्तम असल्याचा रिव्ह्यू ग्राहकांनी दिल्याचं पाहायला मिळते. आज आपण या दोन टेलिकॉम कंपन्यांपैकी तुम्हाला परवडणारी कोणती आहे, सोबतच्या दोन्हींचे रिचार्ज प्लॅन काय आहेत? त्याची देखील माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः उत्तम टेलिकॉम कंपनीची निवड करून आपली बचत करू शकता.

जिओचा हा आहे धमाकेदार प्लॅन

इंटरनेटचा महत्व दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने आता अनेकांना एक किंवा दीड जीबी दररोज पुरेसं नसल्याचे पाहायला मिळते. साहजिकच यामुळे अनेकजण दररोज दोन जीबी डाटा असणारा प्लॅन परचेस करताना पहिला मिळतात. मनोरंजन आणि वेब सिरीजच्या या दुनियेत साहजीकच अतिरिक्त डाटा खर्च होतो. जर तुम्हाला देखील रोज दीड जीबी पेक्षा जास्त डाटा लागत असेल, तर जिओचा दोन जीबी डाटा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टेलिकॉम कंपनी प्रति दिवस दोन जीबी डाटा बरोबरच 100 एसएमएस देखील देते. जिओचा हा प्लान खरेदी करण्यासाठी तुम्हाला 299 रुपये मोजावे लागतात. या रिचार्ज प्लॅनच्या वैधतेचा विचार करायचा झाल्यास 28 दिवसांकरीता आहे.

जिओचा हा प्लॅन देखील आहे उत्तम

२९९ रुपयांचा जिओचा रिचार्ज जर तुम्हाला महाग वाटत असेल, तर त्यापेक्षाही स्वस्त प्लॅन जिओने लॉन्च केला आहे. तुम्ही तो देखील वापरू शकता. २३९ रुपयांचा हा प्लॅन असून, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज दीड जीबी डेटा दिला जातो. यासोबतच दररोज १०० मॅसेजेस आणि अमर्यादित कॉलींगची सुद्धा सुविधा देण्यात येते. वैधतेविषयी सांगायचं झालं तर, 28 दिवसांची वैधता देण्यात येते. जिओचे 28 दिवसांचे हे दोन प्लॅन सर्वाधिक विक्री होणारे प्लॅन आहेत. आता आपण एयरटेलचे देखील प्लॅन जाणून घेऊ.

एयरटेलचा हा प्लॅन आहे उत्तम 

जिओचे तुम्ही नेटवर्क युज करत असाल, तर तुम्हाला नेटवर्कमध्ये काही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला हा अनुभव देखील आला असेल. जर तुम्ही या समस्येचा कंटाळा आला असेल, तर तुम्हाला एअरटेलचं नेटवर्क युज करणं फायदेशीर ठरू शकतं. जिओच्या तुलनेत एअरटेलला अधिक स्पीड मिळतं. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने देखील आता आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. जे तुम्हाला जिओ पेक्षा अधिक परवडणारे ठरू शकतात.

एअरटेलच्या एका महिन्याच्या प्लॅन विषयी जाणून घ्यायचं झाल्यास तुम्हाला जिओ पेक्षा हा प्लॅन स्वस्त वाटू शकतो. कारण याची व्हॅलिडीटी 28 दिवसाऐवजी 30 दिवसांची देण्यात आली आहे. एअरटेलच्या 265 रुपयाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज दीड जीबी डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला दररोज 100 एसेमेची सुविधा देखील देण्यात येते. याबरोबरच लिमिटेड कॉलिंग सुद्धा देण्यात येते. साहजिकच व्हॅलिडीटी आणि नेटवर्कचा विचार करायचा झाल्यास, जिओ पेक्षा एरटेल तुम्हाला परवडणारे नेटवर्क आहे.

एयरटेलचा हा प्लऍन देखील आहे उत्तम

जर तुम्हाला एअरटेलचा 265 रुपयांचा रिचार्ज अधिक वाटत असेल, तर तुम्ही 239 रुपयांमध्ये देखील एअरटेलचा दीड जीबी डेटा प्लॅन वापरू शकता 239 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात येते. याबरोबरच तुम्हाला दररोज दीड जीबी डेटा देखील प्रोवाइट केला जातो. याशिवाय तुम्हाला दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. शिवाय तुम्हाला इंटरनेट वापरण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. एअरटेल आणि जिओचे हे दोन्हीं रिचार्ज अधिक विक्री होणारे रिचार्ज आहेत. मात्र या चारही रिचार्ज पैकी तुम्हाला जो योग्य वाटेल, तो रिचार्ज तुम्ही करू शकता. जर तुम्हाला जिओच्या नेटवर्क वापरामध्ये काही अडचणी येत असतील, तर तुम्ही एअरटेलकडे डोळे झाकून जाऊ शकता.

हे देखील वाचा Asia Cup final: पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने फायनलही जिंकला आणि रोहित शर्माचं तोंडही बंद केलं..

How to Attract Men: पुरुषांच्या या सवयींकडे स्त्रिया होतात आकर्षित; फक्त आकर्षितच नाही, आपलं सर्वस्व देण्यासही असतात तयार..

Parenting Tips: मुलं मोठी झाल्यावर पालकांनी त्यांच्या सोबत झोपणे पडू शकते महागात, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

Google Search: हे व्हिडिओ पाहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून..

Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.