Asia Cup final: पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने फायनलही जिंकला आणि रोहित शर्माचं तोंडही बंद केलं..

Asia Cup final: श्रीलंका आणि पाकिस्तान (SLvPAK) यांच्यामध्ये अशिया कप स्पर्धेचा फायनल दुबई इंटरनॅशनल मैदानावर खेळवण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत एकूण 6 वेळा आशिया चषक स्पर्धेवर आपलं नाव कोरले. स्पर्धेतील सुरुवातीच्या पहिल्याच सामन्यात दारून पराभव झाल्यानंतर, श्रीलंकेने जबरदस्त मुसंडी मारली. आणि सलग पाच सामने जिंकत या स्पर्धेवर आपलं नाव कोरत एकूण सहा वेळा आशिया कप स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळवला.

या स्पर्धेतील पहिल्या सामना दारुण पराभव झाल्यानंतर श्रीलंकाने आशिया कप स्पर्धेत जबरदस्त मुसंडी मारत सलग चार सामने जिंकत या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी श्रीलंका संघाने भारत, पाकिस्तान बांगलादेश, अफगाणिस्तान संघाना धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला. आशिया कप स्पर्धेत भारत हा या स्पर्धेचा विनर होईल, असं अनेकांनी भाकीत केलं होतं. मात्र भारताला सुपर फोरमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेत श्रीलंका कुठेही फेवरेट नव्हती. मात्र पहिल्या सामन्याच्या पराभवानंतर श्रीलंकेने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत भारतासह अनेक संघांना चारीमुंड्या चित केले.

धावांचा पाटला करून श्रीलंकेच्या संघाने लगातार चार सामन्यात दिमागदार विजय मिळवला. धावांचा पाठलाग करून जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केल्याने, फायनलमध्ये देखील श्रीलंका टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. असं अनेकांनी म्हंटले. मात्र फायनलच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) जिंकला. आणि आशिया चषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात पाकिस्तान फेवरेट झाला असल्याचे अनेक क्रिकेट दिग्गजानी म्हटलं. मात्र श्रीलंकेने आपण ही स्पर्धा फक्त सहभाग घेण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी आलो आहोत, ते दाखवून दिले. सुरूवातीला 58 धावांत पाच विकेट गमावल्यानंतर, देखील श्रीलंकेने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी देखील पहिल्या दहा षटकात पाकिस्तानच्या कर्णधाराने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. एक वेळेस श्रीलंकेची 58 धावांत पाच बाद अशी बिकट अवस्था झाली असताना, या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या राजपक्षे याने तंत्रशुद्ध फलंदाजी करत 45 चेंडू 71 धावांची नाबाद खेळी केली. आणि संघाला 170 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. राजपक्षे याला लेगस्पिनर हसरांगा याने 21 चेंडू 36 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

171 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या पाकिस्तान संघाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. आपल्या कारकिर्दीचा दुसरा सामना खेळणाऱ्या प्रमोद मधूशन याने पहिल्याच षटकांत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि फकर जमान याला बाद करत श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. सुरुवातीच्या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ सावरू शकला नाही. सलामीवीर मोहम्मद रिजवान याने थोडाफार संघर्ष केला. मात्र त्याला देखील t20 सारखी इनिंग खेळता आली नाही.

मोहम्मद रिझवान याने 49 चेंडूत 55 धावांची खेळी केली. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. श्रीलंके संघाकडून पुन्हा एकदा लेगस्पिनर हसरंगाने महत्त्वाच्या तीन फलंदाजाला तंबूत पाठवत श्रीलंकेचा विजयाचा मार्ग मोकळा केला. हसरंगा व्यतिरिक्त प्रमोद मधुशन याने देखील 34 धावांत 4 बळी टिपले. 171 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ वीस षटकामध्ये सर्वबाद 147 धावा करू शकला. या सामन्यात टॉस खूप मोठा फॅक्टर असल्याचं अनेक कर्णधाराने म्हंटले होते. रोहित शर्माचा देखील यात सहभाग होता. मात्र श्रीलंका संघाने हा दावा खोडून काढला. आणि दुबईच्या मैदानावर धावा डिपेंड देखील करता येऊ शकतात, हे दाखवून दिलं.

हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Parenting Tips: मुलं मोठी झाल्यावर पालकांनी त्यांच्या सोबत झोपणे पडू शकते महागात, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

How to Attract Men: पुरुषांच्या या सवयींकडे स्त्रिया होतात आकर्षित; फक्त आकर्षितच नाही, आपलं सर्वस्व देण्यासही असतात तयार..

Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.