Parenting Tips: मुलं मोठी झाल्यावर पालकांनी त्यांच्या सोबत झोपणे पडू शकते महागात, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

Parenting Tips: आपली मुले सुदृढ आणि निरोगी असावीत, अशी प्रत्येक पालकाची ईच्छा असते. त्यामुळे जन्मापासूनच पालक मुलांची विशेष काळजी घेतात. आपल्या बाळाला सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगता यावं, यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न पालक करत असतात. शाळेत गेल्यानंतरसुद्धा आपल्या पाल्याची विशेष काळजी पालकांकडून घेतली जाते. मुलाच्या सगळ्या ईच्छा पुर्ण करण्यासाठी पालक कमालीचे परिश्रम घेत असतात. मुलाला काहीही कमी न पडू देता, त्याच्या पाठीशी ठाम ऊभे राहतात. यादरम्यान त्याच्या आरोग्याचीसुद्धा विशेष काळजी पालकांकडून घेतली जाते. मात्र काही छोट्या-छोट्या बारीक सारीक गोष्टींकडे पालकांचे दुर्लक्ष होते. पंरतू मुलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. (Parenting Tips)

पालक सहसा आपल्या मुलाला कधीच एकटे सोडत नाहीत. बरेच पालक आपल्या मुलाजवळच झोपतात. परंतू जेव्हा मुलगा लहान असतो, तेव्हा आई-वडिलांनी मुलाजवळ झोपण्यास हरकत नाही. मात्र मुलाला काही गोष्टी समजू लागल्यानंतर आई-वडिलांनी मुलाजवळ झोपणे टाळले पाहिजे. त्यास एकटे झोपू दिले पाहिजे व आपण दुसरीकडे झोपले पाहिजे. ही बाब जरी सामान्य वाटत असली तरी, त्याचे परिणाम भोगण्याची वेळ अनेक पालकांवर येते. मुलांना काय झालंय, याच निदानच ते करू शकत नाहीत. सर्व तर्‍हेची काळजी घेउन सुद्धा असे का झाले याचा विचार करत असताना आपल्या बारीक-सारीक चुकांकडे मात्र ते लक्ष देत नाहीत. हेही वाचा:मुले आणि मुली वयात आल्यानंतर त्यांच्यावर होतात हे परिणाम, जाणून तुम्हालाही धक्का बसेल..

 

मुलांचे ठराविक वय असते, ज्यानंतर पालकांनी मुलाबरोबर झोपणे टाळले पाहिजे. (Parenting Tips) तुम्हाला मुलाबरोबर झोपण्याची सवय आहे. तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी वाटते, या सर्व गोष्टी बरोबर आहेत. मात्र मुलगा किंवा मुलगी पौगांडवस्थेत येत असतांना किंवा आपल्या भाषेत वयात येत असतांना, त्यांच्यासोबत झोपणे टाळले पाहिजे. किशोरावस्थेत मुलांना एकटे झोपण्याची सवय लावली पाहिजे. या वयात अनेक मानसिक आणि शारीरीक परिणाम होत असतात. त्यांचे मन कधीकधी प्रचंड अस्वस्थ होऊन जाते. शरीरात होणार्‍या काही बदलांबाबत ते विचार करत असतात, कुणाला काही सांगणेसुद्धा त्यांना नकोसे वाटते. त्यामुळे एकटे राहून त्यांना वेळ घ्यायचा असतो. वाढत्या वयाबरोबर त्यांना सर्व गोष्टी लक्षात येऊ लागतात. त्यामुळे किशोरावस्थेत पालकांनी मुलाबरोबर झोपणे टाळले पाहिजे. हेही वाचा:Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

किशोरवयात मुलांना पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. या काळात मुलांमध्ये शारीरिक बदल घडत असतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असतो. अशा काळात पालकांनी आपल्या मुलांना आधार दिला पाहिजे. या वयात पालकांनी आपल्या मुलांचे मित्र बनायला हवे. बऱ्याच पालकांना मुलांमधील हे बदल स्वीकारताना अडचणी येतात. या वयात मुलं चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होत असतात. पालकांनी आपल्या मुलांची मित्रमंडळी कसे आहेत, याचा आढावा घेतला पाहिजे. या वयात मुलांकडून काही चुका झाल्यास त्यांना समजून घेतले पाहिजे. हेही वाचा:brain tumor: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो ब्रेन ट्युमर जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..

आपलं मुल मोठं होत आहे, हे सर्वात अगोदर पालकांनी समजून घ्यायला हवं व स्विकारायलासुद्धा हवं. कारण यादरम्यान मुलांमध्ये प्रचंड बदल होत असतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरासह मानसिक बदलांनासुद्धा ते सामोरे जात असतात. त्यामुळे त्यांना प्रचंड अस्वस्थता आलेली असते. अशावेळी पालकांनी काही बाबी त्यांना स्वतंत्रपणे करु देणे गरजेचे असते. त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी थोडी मोकळीक देणे गरजेचे असते. जेणेकरुन ते कुठलेही दडपन न घेता प्रत्येक बदलाला सामोरे जातात. पालकांनी त्यावेळी समजुतदारपणा दाखवत मुलाला दडपण येण्याअगोदर किंवा अस्वस्थ वाटण्याअगोदर, त्याची प्रायव्हसी त्याला दिली पाहिजे. हेही वाचा: गरम पाणी पिण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितीही असतील; पण तोटे जाणुन तुम्हालाही बसेल धक्का..

पालकांनी यादरम्यान योग्य निर्णय न घेतल्यास किंवा मुलांना थोडीफार का होईना पण मोकळीक न दिल्यास, मुल नैराश्यात जाऊ शकतात. किशोरावस्थेत मुलं समजूतदार होत असतात. मुलाच्या जडणघडणीतला हा महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे यादरम्यान पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. किशोरावस्थेदरम्यान मुलाला आलेलं नैराश्य त्याच्या आयुष्याचा भाग होऊ शकते. त्यामुळे पालकांनी वेळीच सजग होण्याची गरज असते. बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. प्रत्येक मुलाच्या बाबतीत असे होत असतेच, असे नाही. परंतू मुले या परिस्थितीतुन जात असतात.

हेही वाचा:Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Benefits of Eating Cashew: काजू खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष.. 

Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.