Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Bollywood: गेल्या वर्षभरापासून बॉलीवुडमध्ये विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरीना कैफ (Katrina Kaif) या जोडीची चर्चा सर्वत्र गाजत आहे. मात्र मागील वर्षी अचानाक कोणालाही आपल्या डेटींगची किंचितही खबर न लागू देता, लग्न केले. आणि या दोघांनी ईंडस्ट्रीसह सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कॅटरीना कैफ दोन दशकापासून बॉलीवुडमध्ये काम करते आहे. ऊत्कृष्ट अभिनयासोबतच आपल्या मनमोहक अदांनी दिग्गजांना घायाळ करणारी तारका अशी कॅटची ओळख आहे.

ब्रिटीश अभिनेत्री म्हणून सुरुवातीला नावरुपास येणार्‍या कॅटरीना कैफने काही मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केले. आणि अल्पावधीत बॉलीवुड वर आपले अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. सगळ्यात जास्त फीस घेणारी अभिनेत्री म्हणून कॅटरीना आता प्रसिद्ध आहे. परंतू ऐवढ्या ऊंचीच्या शिखरावर असणार्‍या कॅटरीनाने, बॉलीवुडमध्ये नव्याने पदार्पन केलेल्या विक्की कौशलला आपले जिवनसाथी का म्हणून निवडले? हा प्रश्न चाहत्यांसह बॉलीवुडमधील दिग्गजांनासुद्धा पडला आहे. नव्याने अभिनयाला सुरुवात करणारा विकी कौशल आणि या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कॅटरीनाने विकीला आपला जीवनसाथी कसा निवडला? या मागची रंजक लवस्टोरी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

विक्की कौशलने अलिकडे बॉलीवुडमध्ये पदार्पन केले. सुरुवातीस छोट्या भूमिका निभावणारा विक्की कौशल ऊरी (Uri) चित्रपटापासून चांगलाच फेमस झाला. विक्की कौशलचा देखील एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला. विक्कीने सुद्धा आपल्या दमदार अभिनयात सातत्य ठेवत चाहत्यांना कधी नाराज केले नाही. पण काही काळाअगोदरच आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या विक्कीने थेट ऊंचीच्या शिखरावर पोहचलेल्या कॅटरीनाला कसे गाठले? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. कॅट आणि विक्कीची लव्ह स्टोरी नेमकी सुरु कशी झाली. याबद्दल अनेकदा दोघांनाही विचारना केली असता, दोघांनीही यावर बोलणे टाळले आहे.

मात्र कॅटरीनाने आता याबाबत पूर्ण खुलासा केला आहे. एकमेकांची ओळख कशी झाली? दोघांची भेट कशी झाली? आणि त्याचे रुपांतर लव्ह स्टोरीत कसे झाले? याबाबत सगळे खुलासे ‘कॅट’ने केले आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये करण जोहरच्या प्रश्नांना ऊत्तरे देतांना कॅटने विक्की आणि तिच्या लव्ह स्टोरीमागची कहानी कथन केली. कॅटरीनाचा आगामी चित्रपट “फोन भुत” काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॅटरीना करणच्या शोमध्ये आली होती. यावेळी तिच्यासोबत सिद्धार्य़ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे दोघे सुद्धा होते.

“कॉफी विथ करण” (copy with Karan) या शोमध्ये करण जोहर बॉलीवुड सेलीब्रिटींच्या अगदी खाजगी जिवनात शिरतो. आणि सेलीब्रिटीसुद्धा अगदी मनमोकळेपणाने करणला ऊत्तरे देतात. त्याचाशी चर्चा करतात. त्यामुळे कॅट आणि विक्की यांच्या विषयाला हात घालण्यास तो ऊत्सुकच होता. सरतेशेवटी कॅटरीनानेच पुढाकार घेत सर्वच खुलासा यावेळी करुन टाकला. आणि त्यांच्या लव्ह स्टोरी मागची सर्व कहानी कथन केली. खरेतर कॉफी विथ करण या ‘शो’ मधुनच कॅटरीना आणि विक्कीच्या या प्रकरणास थोडीफार सुरुवात झाली होती. एकदा विक्की कौशल या शोमध्ये आला असतांना करणने त्याला कॅटरीनाबद्दल गंमतीने काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावर विक्कीच्या प्रतिक्रिया कॅटरीनाला कळवल्या होत्या.

माझी आणि विक्कीची जोडी छान दिसेल, असे कॅटरीनाने म्हटल्याचे करण जोहरने विक्कीला सांगितले. विक्की कौशलला हे ऐकुण धक्काच बसला होता. करणने मात्र विक्कीची गंमत करण्यासाठी असे म्हटले होते. पण पुढे तेच सत्य झाले. यावेेळी कॅटरीनाने तो ऊंच आहे त्यामुळे त्याची आणि माझी जोडी छान दिसेल असे म्हटले होते. यानंतर लगेच काही दिवसांत दोघांनी लग्न केले. त्यामुळे करणला याबद्दल ऊत्सुकता होती. मात्र कॅटरीनाने यानंतरची सर्व परिस्थिती स्पष्टपणे या शोमध्ये सांगितली. खर तर त्यावेळी मी विक्कीला फारसे ओळखत सुद्धा नव्हते, असे तिने सांगितले. मी केवळ त्याचे नाव ऐकले होते.

परंतू मिडीयाने आमच्याबद्दल बातम्या चालवण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही एकमेकांना डेटसुद्धा करत नव्हतो. पण त्यानंतर अवार्ड फक्शनमध्ये आमच्या भेटी व्हायच्या. भेटीगाठी वाढत गेल्या, आणि अखेर एकमेकांना एकमेकांविषयीची फिलींग जाणवु लागली. जोया अख्तरच्या एका पार्टीत आम्ही जरा अधिक जवळ आलो. आणि त्यानंतर कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो, आम्हालासुद्धा कळले नाही. हे सगळं अनपेक्षित घडलं. मी विक्कीबद्दल कधीच असा विचारदेखील केला नव्हता. परंतू कदाचित आमच्या नशिबातच तसं लिहीलेलं असावं. विक्की हा जरी हॉट नसला तरी स्वभावाने अत्यंत चांगला आहे. त्याने पहिल्या भेटीतच माझ मन जिंकलं होतं. असे सुद्धा कॅट यावेळी म्हणाली.

हे देखील वाचा Benefits of Eating Cashew: काजू खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..

Google Search: हे व्हिडिओ पाहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून..

brain tumor: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो ब्रेन ट्युमर जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.