Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

Pitru Paksh2022: पितृपंधरवडा गणपतीचे विसर्जन (Ganesh chaturthi) झाल्यानंतर सुरू होतो. यावर्षी पितृपक्ष १० सप्टेंबर पासून 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. अनेकांना पितृपंधरवड्याचे महत्व माहिती देखील असेल. भाद्रपद महिन्यामधील कृष्णपक्ष हा पक्ष पितृपक्ष समजला जातो. हिंदू धर्मामध्ये या पंधरवड्यात घरातील पूर्वजांना जेवायला घातले जाते. या पंधरा दिवसांत श्राद्ध घालून पितरं जेवायला घातली जातात. साहजिकच या प्रथेमुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते, अशी हिंदू धर्मात धारणा आहे. (Pitru Dosh)

 

पितृपक्षाच्या काळात पूर्वजांची पितरं पृथ्वीवर काही दिवसांसाठी वास्तव्यास येतात. अशी माहिती हिंदू धर्मात सांगितलेली आहे. या पंधरा दिवसांमध्ये त्यांचा पाहुणचार व्यवस्थितरित्या केला जातो. आणि त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना देखील केली जाते. आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी देखील या दिवसांत त्यांना पुरण पोळी, गोडधोड जेवण घातलं जातं. असा देखील समज आहे. जर पूर्वज कुटुंबावर नाराज असतील, तर घरात अडीअडचणी देखील निर्माण होत असतात. याबरोबरच कौटुंबिक सुख समाधान देखील लाभत नसल्याचं बोललं जातं. साहजिकच यामुळे पितृदोष असल्याचं म्हटलं जातं‌‌. आणि म्हणून पूर्वजांचे या काळात समाधान करण्याचे काम केले जाते. हेही वाचा: Google Search: हे व्हिडिओ पहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून..

 

यावर्षी तब्बल बारा वर्षानंतर पहिल्यांदा 16 दिवसांचा श्राद्ध कालावधी असणार असल्याने, यावर्षीचा पितृपंधरवडा खूप महत्त्वाचा मानला जातो. आशीर्वाद असेल, तर घरात सुख समृद्धी नांदते असं घरातील वडीलधारी मंडळी बोलताना तुम्ही अनेकदा ऐकलं देखील असेल. पूर्वजांचा आत्मा शांत करण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. मात्र जर पूर्वज नाराज असतील, मृत्यूनंतर पूर्वजांचे अंत्यविधी व्यवस्थित झाले नसतील, तर तुमच्या कुटुंबावर त्याचे परिणाम होतात. असं देखील बोललं जाते. पूर्वज नाराज असतील, तर त्याचे काही संकेत देखील असतात, आज आपण याच विषयी माहिती सांगणार आहोत. हेही वाचा:Health Tips: गरम पाणी पिण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितीही असतील; पण तोटे जाणुन तुम्हालाही बसेल धक्का..

 

कुटुंबातील सदस्यांचा जर मृत्यू झाला असेल, आणि मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी व्यवस्थित झाला नसेल किंवा त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील, तरी देखील त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो‌. आणि मग घरात वादविवाद, किरकोळ गोष्टीवरून भांडणे, देखील होतात. जर मृत्यूनंतर अंत्यविधी व्यवस्थित झाला नसेल, तर त्या सदस्याचा आत्मा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. प्रचंड मेहनत करून देखील फळ मिळत नसेल, तर आपले पूर्वज आपल्यावर नाराज असल्याचं संकेत आहे.

 

मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यविधी व्यवस्थित पार पडला नसेल, त्याच बरोबर मरणापूर्वी त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील, तर तो कुटुंबाला त्रास देतो, असं बोललं जातं. मात्र यात काही तथ्य नाही. मात्र तो आपण नाराज असल्याचे संकेत आपल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर होतो. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, प्रचंड मेहनत करून देखील फळ मिळत नसेल, तर आपले पूर्वज आपल्यावर नाराज आहेत, किंवा त्याची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिली आहे. अशी माहिती पितृशास्त्रात देण्यात आली आहे. हेही वाचा: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो ब्रेन ट्युमर जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..

 

आपले पूर्वज जर नाराज असतील किंवा त्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल, तर तुम्हाला काही संकेत मिळतात. प्रचंड मेहनत करून देखील फळ मिळत नाही, असं आपल्याला वाटत असेल, तर याचा अर्थ आपले पूर्वज नाराज आहेत असा होतो. एवढंच नाही, तर घरामध्ये नवीन पाहुणे देखील येत नसल्याचे या शास्त्रात म्हंटले आहे. याशिवाय संतती आणि सुख समाधानाचा लाभ देखील होत नाही. सकारात्मकते ऐवजी मन नेहमी नकारात्मक राहते. आयुष्य जगत असताना नेहमी तणावपूर्ण वाटत असते. एकप्रकारे आयुष्य खूप दुःखदायक झालेले असते. घरातील सदस्यांचे एकमेकांसोबत भांडण देखील होत राहते.

 

 

आपले पूर्वज जर नाराज असतील, तर घरातील सदस्यांच्या वैवाहिक जीवनात खूप सारे अडथळे देखील येत राहतात. याशिवाय घरातील सदस्यांचे लग्न झाले नसले, तर लग्न देखील जमण्यात अडथळा निर्माण होतो. आपले पूर्वज जर नाराज असतील तर, घरातील मोठ्या व्यक्तीच्या स्वप्नात देखील पूर्वज येतात. या संदर्भात काही संकेत देखील देण्याचे काम करतात. जर तुमच्या बाबतीत देखील अशा काही घटना घडत असतील, तर तुमच्याकडे पूर्वजांना खुश करण्यासाठी ही मोठी संधी आहे. या पितृपंधरवड्यात तुम्ही तिथीप्रमाने तर्पण त्याचबरोबर पिंडदान करू शकता. यामुळे पूर्वजांची नाराज दूर होऊ शकते. याशिवाय तुम्ही गरिबांना देखील दान करू शकता.

हेही वाचा: flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल.. 

Sport shoes: तब्बल 72 टक्के डिस्काउंटवर खरेदी करा Reebok, Adidas, Redtape कंपनीचे शूज; पाहा कुठे सुरू आहे ऑफर..

Farmer Scheme :या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर.. 

Google Search: हे व्हिडियो पाहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून.. 

Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.