Farmer Scheme: ‘या’ तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Farmer Scheme: संकटे आणि शेतकरी हे जणू समीकरणे झालं आहे. सामाण्यांबरोबर सरकारला देखील याची जाणीव झाली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला विविध संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवताना पाहायला मिळते. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक तसेच नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवत असले तरी अनेक शेतकऱ्यांना याविषयी माहिती नसते. आणि म्हणून आम्ही ही बाब लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना सरकारच्या अशा तीन योजनांची माहिती देणार आहोत, ज्या योजनांमधून शेतकऱ्यांना लाखाहून अधिक रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. अशा कोणत्या तीन योजना आहेत जाणून घेऊया सविस्तर. Small Farmers Agri-Business Consortium (SFAC)

लघू कृषक कृषी व्यापार संघ (SFAC) या मार्फत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक योजना राबवण्यात येतात. लघु कृषक कृषी व्यापार संघ Small Farmers Agri-Business Consortium (SFAC) या संस्थेमार्फत देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना एकत्र आणून शेती पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काम करते. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी एकच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम, किंवा त्या मागचा हा एक उद्देश या संस्थेचा आहे. आता आपण योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊ.

कृषि व्यवसायासाठी भांडवल सहाय्य योजना

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 15 ते 50 लाखांपर्यंत अर्थ सहाय्य केले जाते. विशेष म्हणजे, हे अर्थसहाय्य फिटेपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारण्यात येत नाही. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतात. ज्या शेतकऱ्यांना काही कृषी सेवांशी संबंधित असणारे प्रकल्प, ज्या मधून पिकणाऱ्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध असेल, त्यासोबतच कर्ज देण्यासाठी बँकेने स्वीकारलेले प्रकल्प, केवळ असेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सोबतच शेतकरी उत्पादक गट असणे देखील आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीचा एखादा उद्योग असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी कृषी पदवीधर असणे, किंवा कृषी पदवीधारांच्या शेती गटांचा एक सदस्य असणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येते.

समभाग निधी योजना

या योजनेचा उद्देश देखील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील काही अटी आणि शर्ती शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतात. जसं की आपण सुरुवातीला ही संस्था गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काम करते त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांच्या गटातील वैयक्तिक लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 50 पेक्षा कमी नसणे, आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कंपनी किंवा गटातील भरणा केलेली रक्कम ही 30 लाखांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या गटातील एकूण ३३ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, आवश्यक आहे.

त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गटावर निवडून आलेल्या संचालक मंडळावर पाच पुरूष आणि एक महिला सदस्य असणे आवश्यक आहे. सोबतच या शेतकरी गटाने किंवा कंपनीने पुढच्या 18 महिन्यांचा महसूल आधारित आपला व्यवसाय आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत या गटातील प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा लाख इतके अर्थसहाय्य केले जाते. तीन वर्षातून दोन वेळाच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम फिटेपर्यंत कोणत्याही प्रकारचं व्यास शेतकऱ्यांना आकारण्यात येत नाही.

पत हमी निधी योजना:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांपैकी कमीत कमी ते ३३ टक्के अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. सोबतच शेतकरी गटाचा पुढील अठरा महिन्यांचा आपला व्यवसाय आराखडा आणि अंदाजपत्रक तयार असणे आवश्यक आहे. गटातील वैयक्तिक लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 500 पेक्षा कमी नसणे आवश्यक आहे. वारंवार त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याने, संस्थेने ही अट ठेवण्यात आली आहे.

शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या वैयक्तिक सोबतच शेतकरी गटाने या योजनेसंदर्भात ला प्रकल्प बँकेकडे सादर करणे आवश्यक आहे आणि त्या प्रकल्पाला मंजुरी घेतलेली देखील असणं आवश्यक आहे. शेतकरी गटाला या योजनेचा लाभ पाच वर्षातून फक्त दोन वेळाच घेता येऊ शकतो. या योजनेची रक्कम शेतकरी गटाला ८५ लाख रुपयांपर्यंत पत हमी सुरक्षा निधी दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करु शकता. यावर क्लिक करु शकता..

हे देखील वाचा Health Tips: हे पाच पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट, आतडी, डोळे, मेंदू, हृदयाच्या समस्या होतात दूर..

Health Tips: पुरुष आपल्या कमरेला कडदोरा का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

scientific reason: या वेळेस नखे, केस कापल्यास होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या या पाठीमागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण..

Relationship tips: या तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.