Relationship tips: ‘या’ तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

0

Relationship tips: कोणतंही नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी विश्वास आणि प्रेम खूप महत्त्वाचं असतं. खासकरून नवरा बायकोचं नातं हे तर निव्वळ प्रेमावर आणि विश्वासावरच टिकून असतं. एकदा का विश्वासाला तडा गेला, तर मग हे नातं कितीही प्रयत्न केले, तरी पूर्वीसारखं होत नाही. प्रेम, विश्वास, केरींग, याबरोबरच एकमेकांना स्वातंत्र्य देणे देखील खूप महत्वाचं आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आणि जोडीदाराने टाकलेला विश्वास याला तडा देखील जाता कामा नये, याची देखील काळजी बेस्ट पार्टनर म्हणून घेणं आपलं काम असतं. नातं तुटण्यासाठी जर सर्वप्रथम कोणती गोष्ट कारणीभूत ठरत असेल, तर ती म्हणजे संशय.

कोणतेही नातं तुटण्यापाठीमागे ‘संशय’ हे प्रमुख कारण असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. संशयामुळे अनेक नाती तुटत असली तरी, संशय नेमका कशामुळे वाढतो? याची देखील काही कारणे आहेत. जसं कर्मानुसार फळ मिळत असतं, तसंच आपल्या कृत्यामुळे त्याचे परिणामही भोगावे लागत असतात. असं म्हणतात, आपल्या वर्तणूकीनुसार आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ चालत असतो. आज आपण एकमेकांविषयी संशय का निर्माण होतो? याची तीन मुख्य कारणं जाणून घेणार आहोत.

मोबाईलमुळे वाढतो संशय

अलीकडच्या काळात मोबाईल ही माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक जण जेवण करताना देखील मोबाईलचा वापर करतात, हे कोणीही नाकारू शकणार नाही. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोयस्कर झाल्या असल्या तरी, हाच मोबाईल तुमच्या नात्याचा व्हिलन देखील ठरू शकतो. आनंदी आणि सुखी संसारात विष कालवायचं काम मोबाईल करू शकतो. एका सर्वेनुसार पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होण्यास, मोबाईल हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे.

एका सर्वेनुसार, पत्नी जर मोबाईलवर अधिक वेळ स्पेंड करत असेल, तर पतीच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. ऑफिस किंवा आपल्या व्यवसायाचे काम आटपून पती घरी येतो तेव्हा, पत्नीने पतीच्या कामाबद्दल विचारपूस करणे आवश्यक असतं. कामावरून पती घरी आल्यानंतर, पत्नी देखील खुश व्हावी, तिने विचारपूस करावी, अशी त्याची इच्छा असते. जर असं काही घडलं नाही, आणि पत्नी त्याच्या समोर मोबाईल वरच वेळ घालवत असेल, तर पतीच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. सेम ही परिस्थिती पतीच्या बाबतीत देखील लागू होते. अनेकदा पत्नीच्या मनात काहीही नसतं, आणि म्हणून, संशय घेण्यापेक्षा रिस्पॉन्सिबल पती म्हणून, तुम्ही या विषयावर तिच्यासोबत बोलणं योग्य होईल.

पतीला वेळ देत नसल्यास संशय येतो

महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक संशयी असतात. जर पत्नी नातेवाईकांसोबत किंवा मित्र मैत्रीणींसोबत जास्त वेळ बोलत असेल, तरीदेखील पतीच्या मनात शंका यायला सुरुवात होते. अनेकदा एखादा महत्त्वाचा कॉल सुरू असताना, बरोबर त्याचवेळी पती ऑफिस मधून घरी येतो. कधीकधी महत्त्वाचा कॉल असल्याने आपला पती कामावरून घरी आला, याकडे लक्ष देत नाही. ही छोटी गोष्ट देखील संशय निर्माण करणारी असते. जर असे प्रकार होत असतील, तर आपल्या पत्नीला आपल्याविषयी आकर्षण नाही, असा अनेकदा पतीचा समज होतो. मात्र परिस्थिती वेगळी असू शकते. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीसोबत याविषयी सविस्तर बोलणं कधीही उचित ठरेल.

इतर पुरुषांची स्तुती केल्यास वाढतो संशय

अजूनही आपल्याकडे महिलांना पुरुषां एवढं स्वातंत्र्य मिळाले नाही. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. शहरापेक्षा खेडेगावात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती अभिमानाने जपली जाते. हे देखील एक सत्य आहे. महिलांना स्वातंत्र्य मिळणं, देखील फार महत्त्वाचं आहे. अजूनही आपल्याकडे महिला किंवा पत्नी इतर पुरुषांसोबत बोलत असेल, तर ते पती म्हणून पुरुषांना अजिबात आवडत नाही. माणूस हा नेहमी अनुकरण करूनच जगत असतो. कोणी कसे कपडे घातलेत? कोणी कशी हेअर स्टाईल केली आहे? त्याच पद्धतीने आपली देखील हेअर स्टाईल असावी, कपडे असावे, असे प्रत्येकाला वाटत असतं. यात चुकीचे देखील काहीच नाही.

अनेक महिलांना देखील इतर पुरुषांची केस रचना, किंवा कपड्यांची स्टाईल आवडत असते. इतर पुरुषांची आवडलेली स्टाईल त्या अनेकदा आपल्या पतीला सांगत असतात. आपल्या पतीने देखील आपल्याला आवडणारी केस रचना किंवा कपड्यांची स्टाईल परिधान करावी, असं अनेक महिलांना वाटत असतं. यात देखील काहीच चूक नाही. मात्र अनेकदा महिलांनी इतर पुरुषांची स्तुती केली, तर पुरुषांना मोठ्या प्रमाणात संशय निर्माण होतो. अनेक पुरुषांचा असा समाज होतो, आपली पत्नी आपल्याला पसंत करत नाही‌. मात्र असं मुळीच नसतं. तुम्ही या गोष्टींना पॉझिटिव्ह घेणं आवश्यक असतं. याविषयी तुम्ही तुमच्या पत्नीशी सविस्तर बोलणं कधीही योग्य ठरेल.

हे देखील वाचा OTT Platform: Amazon prime, Netflix, Disney+hotstar आता पाहता येणार मोफत; वापरा फक्त ही स्ट्रिक..

Women and Child Development: महिला व बाल विकास विभागात मेगा भरती! बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Swastika Sign: मुख्य प्रवेशद्वार, लग्न, महत्त्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Work From home side effect: वर्क फ्रॉम होम मुळे मानसिक आरोग्यावर होतायत हे तीन गंभीर परिणाम..

Fig Benefits For Men: विवाहित पुरुषांची ताकद वाढवण्याचे काम करतो हा पदार्थ; नियमित सेवन केल्यास, होतील हे जबरदस्त फायदे..

Best partner Zodiac Sign: या तीन राशींच्या मुलांकडे मुली होतात आकर्षित; पती बनवण्यासाठी देखील असतात उत्सुक..

Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..

Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

Skin Care Tips: नियमित कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवल्यास होतात हे आश्चर्यकारक फायदे..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.