Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

Viral Video सोशल मीडिया (social media) हे वायरल व्हिडिओचे व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर दररोज नवीन व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. खासकरून प्राण्यासंदर्भातले (animals video) आणि प्रेमीयुगुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. आणि शेअर देखील केले जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. ट्रेनमध्ये (train viral video) प्रवास करत असणाऱ्या एका मुलाचा आणि मुलीचा (girl and boy) व्हिडिओ हा आहे. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना या दोघांनी जे कृत्य केलं ते पाहून, अनेकजण अचंबित झाले आहेत. नक्की या दोघांनी काय आणि का केलं जाणून घेऊया सविस्तर.

प्रेम हे कोणालाही कधीही कुठेही होऊ शकतं, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. दोन अनोळखी व्यक्तींना चालता-बोलता देखील प्रेम होऊ शकतं. प्रेमाला काहीही मर्यादा आणि बंधनं नसतात. हल्ली तर कधी कोणाला प्रेम होईल, आणि तो प्रेम कसं व्यक्त करेल, हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर प्रेमियुगलांनी एकमेकांना प्रेम व्यक्त केल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. काही दिवसांपूर्वीच एका लग्न समारंभातला एका मुलाचा आणि मुलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मुलाने डान्स करत करत मुलीला ज्या पद्धतीने आपला मोबाईल नंबर सांगितला, याची कोणीही कल्पना केली नसेल. आता असाच काहीसा व्हिडिओ ट्रेनमधून प्रवास करत असणाऱ्या मुलाचा आणि मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय घडलं नेमकं

एका ट्रेनमध्ये एक मुलगा आणि मुलगी प्रवास करत होते. हे दोघे मागच्या आणि पुढच्या बाकावर बसले होते. ट्रेनमध्ये अनेक प्रवासी त्या ठिकाणी ये-जा करत असताना पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यांच्या नजरा चुकवून हे दोघेही एकमेकांच्या नजरेला नजरा भिडवत आहेत. बऱ्याच वेळ हा खेळ चालल्यानंतर, या दोघांनी एकमेकांना आपले प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मुलीच्या मागच्या सीटवर जो मुलगा बसलेला आहे, त्याने ट्रेनमधील बाकाच्या खाली आपला हात घेऊन गेला आहे, हे मुलीला समजते.

आपल्या पाठीमागच्या बाकावर बसलेला मुलगा बाकाच्या खाली हात घेऊन गेला आहे. तो मुलगा कदाचित आपल्याकडून काहीतरी मागत असल्याचं या मुलीला समजतं. कदाचित हा मुलगा आपल्याला मोबाईल नंबर मागत असेल, हे लक्षात आल्यानंतर मुलगी देखील गुपचूप या मुलाच्या हातामध्ये चिट्ठी टेकवताना पाहायला मिळत आहे. मुलगी मुलाच्या हातात चिठ्ठी देत असताना, दोघांच्या चेहऱ्यावर आलेल्या एक्सप्रेशनने अनेकांना भुरळ पाडली आहे.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर ट्रेन मधला हा सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर, या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट केल्या आहेत. sakhtlogg या Instagram अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी, या दोघांनी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत अवलंबली आहे, ती कमालीची आहे. असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहताना एखाद्या चित्रपटात दृश्य पाहात आहे, असा भास होतो. खूप मज्जा आली. तर काहीजणांनी हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं देखील म्हटलं आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या या जमान्यात कोण कसा व्हिडिओ बनवेल, हे काही सांगता येत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, हे सगळं स्क्रिप्टेड असल्याचं जाणवतं. असं देखील काही युजर्सने म्हटले आहे.

हे देखील वाचा infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.