Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

Bank of india recruitment: बेरोजगारीच्या (unemployment) या दुनियेत नोकरी (job) मिळवणे अलीकडच्या काळात खूप मोठं आव्हान आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडात तर अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी देखील गमावली लागली. साहजिकच यामुळे बेरोजगाराच्या संख्येत आणखीन वाढ झाल्याचे चित्र आहे. एकीकडे हे वास्तव असलं तरी, दुसरीकडे आता हळूहळू अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आठवी ते पदवीधर विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर.

बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, ‘कार्यालयीन सहाय्यक’ तसेच ‘परिचय वाचमेन’ या पदांसाठी काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख एक ऑगस्ट म्हणजेच आजच्या तारखेपर्यंत मर्यादित असणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवाराचे वय १८ ते ६५ ठेवण्यात आले आहे. हे वय “कार्यालयीन सहाय्यक” या पदासाठी लागू असणार आहे. तर ”परिचर वॉचमन” या पदांसाठी वयाची मर्यादा ही 18 ते 45 असणार आहे. आता या भरती संदर्भात आपण सर्व डिटेल्स जाणून घेऊया.

रिक्त जागा आणि पात्रता

बँक ऑफ इंडियाने भरती संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा “कार्यालयीन सहाय्यक” तसेच ‘परिचर वाचमेन” या पदांसाठी भरण्यात येतील. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना एक ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांची आठवी, तसेच कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन झालेले असणे आवश्यक आहे.

उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, “परिसर वाचमेन” या पदासाठी उमेदवारांची आठवीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांच्या वयाच्या अटीचा विचार करायचा झाल्यास, या पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 45 या दरम्यान असणे आवश्यक आहे. “कार्यालयीन सहाय्यक” या पदाच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे कोणत्याही विषयातून शिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधूनच हे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदाच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय 18 ते 65 ठेवण्यात आले आहे.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या संदर्भात देखील आम्ही सविस्तर माहिती देत आहोत. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने देखील उमेदवारांना जमा करणे आवश्यक आहे. या संदर्भातला देखील पत्ता आम्ही देत आहोत. सर्वप्रथम आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी जाणून घेऊ. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.bankofindia.co.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ‘बँक ऑफ इंडिया’ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटच्या उजव्या बाजूला तुम्हाला या भरती संदर्भातला पर्याय पाहायला मिळेल. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, या भरती प्रक्रिये संदर्भातील सविस्तर माहिती भरू शकता. या भरती संदर्भातली अधिसूचना पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.तुम्ही यावर क्लिक करा.

आता आपण ऑनलाइन भरलेला अर्ज ऑफलाईन कुठे आणि कसा जमा करायचा? याविषयी जाणून घेऊ. गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन भरलेला अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग. बँक ऑफ इंडिया, चौथा मजला. नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल रस्ता, नागपूर महाराष्ट्र – 440001 या पत्त्यावर तुम्हाला अर्ज प्थावयचा आहे. तुम्ही अर्ज प्रत्यक्ष जाऊन देखील जमा करू शकता.

हे देखील वाचा WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Flipkart Big Bachat Dhamaal: फ्लिपकार्टचा धमाका! Smartphone तसेच electronic वस्तूंवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या अधिक..

MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.