MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

MSRTC Recruitment 2022: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महागाई बरोबर बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, सर्वसामान्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला असला, तरी दुसरीकडे मात्र अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागाने दहावी तसे ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरतीची घोषणा केली आहे. इच्छुकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून, यासंदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

बेरोजगारी संदर्भातली लोकसभेत नुकतीच आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 2014 पासून 22 कोटी तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. त्यात केवळ ७ लाख २० हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. यावरून आपण देशात किती मोठी बेरोजगारी आहे याचा अंदाज लावू शकतो. मात्र आता कोरोणानंतर काही शेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. जर तुम्ही महाराष्ट्र राज्य महामंडळामध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागाने शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती आयोजित केली आहे.

उच्च शिक्षण घेऊन देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने, अनेक जण आता दहावी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात. दहावी झाल्यानंतर खासकरून खेडेगावात अनेकजण नोकरी शोधतात. घरची परिस्थिती उच्च शिक्षण घेण्याची नसल्याने, अनेकजण कुठेतरी कमी पागरची का होईना, नोकरी शोधतात. जर तुम्ही देखील दहावीनंतर नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. जर तुमची दहावी झाली असेल, त्याचबरोबर तुमच्या ITI झाला असेल. तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे.

महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या विभागात एकूण ६७ पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन केलेल्या अर्जाची पोच पावती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जमा करायची आहे. आता आपण या भरतीसाठी उमेदवारांची काय पात्रता आहे. त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा? या संदर्भात सविस्तर माहिती जाऊन घेऊयात. सर्वप्रथम आपण उमेदवारांची पात्रता जाणून घेऊ.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागात अर्ज करण्यासाठी उमेदवारांचा पात्रतेविषयी बोलायचं झाल्यास, अर्ज करू इच्छीत असणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. याबरोबरच या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवाराची कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय ही पदवी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. याबरोबरच उमेदवारांना आयटीआयमध्ये 50 टक्क्याहून अधिक गुण मिळाले असणे देखील आवश्यक असल्याचं अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. याबरोबरच उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ड्रायव्हिंगचा अनुभव असल्यास, नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचं देखील अधिसूचनेत म्हटलं गेलं आहे.

पद आणि जागा

महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागाकडून भरण्यात येणाऱ्या जागांच्या पदांचा विचार करायचा झाल्यास, भरण्यात येणाऱ्या एकूण ६७ जागा या शिकाऊ पदासाठी असणार आहेत. या भरतीसाठी एकूण ६७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शिकाऊ उमेदवार म्हणून उमेदवारांची निवड या भरतीअंतर्गत करण्यात येणार असून, ही भरती कंत्राटी बेसवर असणार आहे. आता आपण या भरती संदर्भात अर्ज कसा करायचा? या संदर्भात सविस्तर जाऊन घेऊ.

असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य महामंडळ उस्मानाबाद विभागात नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.apprenticeshipindia.gov.in/ असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर भारत सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, उजव्या बाजूला तुम्हाला या भरती बाबत एक पर्याय पाहायला मिळेल, तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर, तुमची सविस्तर डिटेल्स टाकायची आहे. यानंतर तुम्हाला व्यवस्थित भरलेला फॉर्म डाऊनलोड करायचा आहे.

यानंतर व्यवस्थित भरलेला फॉर्म तुम्ही डाऊनलोड करायचा आहे. डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने जमा करायचा आहे ऑफलाइन पद्धतीने जमा करण्यासाठी तुम्हाला खालील पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन जमा करावा लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राज्य परिवहन विभागीय कार्यालय, उस्मानाबाद. या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही यावर क्लिक करा. असल्यास तुम्ही यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Marriage tips: या पाच गोष्टींतून महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात या गोष्टीं..

Shravan 2022: श्रावणात या पाच कारणांमुळे मांसाहार टाळलाच पाहीजे, अन्यथा होईल सत्यानाश..

Waterproof shoes: Amazon वर हे पाच Waterproof shoes विकले जातायत तब्बल निम्म्या किंमतीत..

Mahavitaran: अजित पवारांसह अनेक बड्या मंत्र्यांची लाखो रुपयांची विज बिले थकीत; जाणून घ्या, कोणाच्या नावावर कीती थकबाकी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.