Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

0

Rechargeable LED Bulbs: कोळशाचा मोठा तुटवडा असल्याने देशरातल्या अनेक मोठ्या राज्यात देखील विजेचे मोठे संकट असल्याचे चित्र आहे. अनेक मोठ्या राज्यांनी लोड शेडींग करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. याबरोबरच सध्या पावसाचं वातावरण असल्याने वादळ वारा आल्याने देखील वीज पुरवठा खंडित केला जातो. अशा अनेक समस्यांनी व्यतीत असाल, आणि यावर तोडगा काढू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

लोड शेडिंग सारख्या अनेक त्रासाला कंटाळून अनेक जण घरात इन्व्हर्टरवरचा वापर करतात. मात्र यासाठी आपल्याला हजारो रुपये मोहजावे लागतात. आता तुम्हाला हजारो रुपये खर्च करून इन्व्हर्टरवरचा वापर कण्याची गरज नाही. ज्यासाठी तुम्ही हजारो रुपये खर्च करून वीज मिळवत होता, त्यासाठी आता तुम्हाला केवळ शंभर रुपये खर्च करायचे आहेत. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर Rechargeable LED Bulbs जबरदस्त ऑफरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Rechargeable LED Bulbs च्या वैशिष्ट्याविषयी बोलायचं झाल्यास, हे Rechargeable LED Bulbs घरातली लाईट गेली तरी देखील, तब्बल आठ ते दहा तास लागून राहतात. त्यामुळे तुमच्या घरातील लाईट अनेक कारणाने अचानक गेली तरी देखील तुमच्या घरामध्ये प्रकाश असेल. विशेष म्हणजे हे रिचार्जेबल एलईडी बल्ब लाईट सुरु असतानाच आटोमॅटिक चार्ज होतात, आणि लाईट गेल्यानंतर आपला प्रकाश संपूर्ण घरामध्ये पसरवतात.

ई कॉमर्स वेबसाईटवर काही नामांकित कंपन्याचे हे बल्ब विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यापैकी आम्ही तुम्हाला महत्वाच्या काही आकर्षक असणाऱ्या एलईडी बल्ब विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. ज्यांची किंमत केवळ आणि केवळ शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच आपण जे सामान्य बल्ब घेतो, त्याच किंमतीत आता Rechargeable LED Bulbs खरेदी करता येणार आहेत.

PHILIPS ९W मानक E२७ LED बल्ब 

फिलिप्स कंपनीचा 9W चा एलईडी बल्ब तुम्हाला फ्लिपकार्ड (Flipkart) ई-कॉमर्स वेबसाईटवर ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवर या बल्बची किंमत केवळ 139 रुपये ठेवण्यात आली असून, सोबतच या बल्बला एका वर्षाची गॅरंटी देखील देण्यात आली आहे. याबरोबरच तुम्हाला जर आणखी मोठा प्रकाश देणारा बल्ब खरेदी करायचा असेल, तरीदेखील या कंपनीचा एलईडी रिचार्जेबल पण तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

Syska Led Lights 9 W Standard B22 LED Bulb

Syska या नामांकित कंपनीचा रिचार्जेबल एलईडी बल देखील तुम्हाला फ्लिपकार्टवर ऑफरमधे खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, फ्लिपकार्टवर असणाऱ्या या बल्बला ग्राहकांकडून साडेचार स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. कंपनीने हा बल तब्बल पाच ते सहा तास लाईट गेल्यानंतर प्रकाश देऊ शकतो, असा दावा केला आहे. या ब्लबची किंमत flipkart वर 198 रुपये ठेवण्यात आली असून, एका बल्ब वर एक बल फ्री मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक बल्ब केवळ शंभर रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Wipro 9W B22 LED इमर्जन्सी बल्ब, (NE9001)

अलीकडच्या काळातील विप्रो कंपनीचे एलईडी बल्ब ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळतात. या कंपनीचे रिचार्जेबल एलईडी बल ॲमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर ग्राहकांना भन्नाट ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहे. या कंपनीचे एलईडी बल्ब लाईट गेल्यानंतर तब्बल चार तास सूर्यप्रकाश देऊ शकणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. ॲमेझॉन इंडियावर विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेला बल्ब ९w चा असून, विप्रो या कंपनीने या बल्बची वारंटी सहा महिन्याची दिली आहे.

Osram Ledvance LED 9 वॅट रिचार्जेबल इन्व्हर्टर बल्ब B22D 6500K 

अनेकांना या कंपनीचे नाव पहिल्यांदा वाचण्यात आले असेल. मात्र या कंपनीचे एलईडी बल देखील सर्वोत्तम असल्याचे समोर आलं आहे‌. ॲमेझॉन इंडियावर या कंपनीचे बल ऑफरमध्ये विक्री केले जात आहेत. ९w असणाऱ्या बलची किंमत amazon वर 520 रुपये ठेवण्यात आली आहे. हा बल देखील चार ते पाच तास सूर्यप्रकाश देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. इतर रिचार्जेबल एलईडी बल पेक्षा याची किंमत जास्त वाटत असली तरी, या बल्बचा प्रकाश हा खूप नैसर्गिक आणि डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

हे देखील वाचा Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

या चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Flipkart Electronics Sale: हेडफोन, स्मार्टवॉच, पावरबँकसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल ८० टक्के डिस्काउंट..

Palmistry: या तीन प्रकारे जाणून घेता येते, आपण किती वर्ष जगणार आहोत..

India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Healthy lifestyle: वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा..

Police Bharti Update: पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल? शिंदे सरकारचा पोलीस भरती करणाऱ्या पोरांना दणका..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.