India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

0

India Post Recruitment 2022: बेरोजगारी आणि महागाईच्या या दुनियेत नोकरी मिळवणं आता फार कठीण होऊन बसलं आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याचे चित्र सगळ्याच क्षेत्रात पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे आता अनेकजण दहावी, बारावीनंतर कुठेतरी कमी पगाराची नोकरी शोधताना दिसून येतात. अनेकांची उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्यामुळे, आणि घरची परिस्थिती हालाखीची असल्याने अनेकजण दहावीनंतरच नोकरीच्या शोधात असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी भारतीय पोस्ट विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

भारतीय पोस्ट विभागाने कार ड्रायव्हर या पदांसाठी भरती आयोजित केली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीची अंतिम तारीख 20 जुलै 2022 ठेवण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रिया संदर्भातले अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. याबरोबरच ज्या उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव आहे, अशांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आता आपण या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाणून घेऊ.

भारतीय पोस्ट विभागाकडून कार ड्रायव्हर या पदासाठी करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेचा रिक्त जागांचा विचार करायचा झाल्यास, २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या बरोबरच उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै ठेवण्यात आली आहे. भारतीय पोस्ट विभागाकडून घेण्यात येणारी नोकर भरती सरकारी नोकर भरती असल्याने, दहावी पास उमेदवारांना ही मोठी सुवर्णसंधी आहे. आता आपण या भरती प्रक्रिया संदर्भातल्या पात्रतेविषयी जाणून घेऊया.

भारतीय डाक विभागाकडून कार ड्रायव्हर या पदासाठी भरण्यात येणाऱ्या 24 रिक्त जागांसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. मात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातूनच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. या बरोबरच या भरती परक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडे किमान तीन वर्ष ड्रायव्हिंगचा अनुभव असणे देखील बंधनकारक असणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हलकी आणि जड वाहने किमान तीन वर्ष चालवली असावी. असं अधिसूचनेतून जारी करण्यात आलं आहे. वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय 56 पेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवमधील क्रोमवर जावून https://www.indiapost.gov.in/ असं सर्च करायचं आहे. तुमच्याकडून हे सर्च केल्यानंतर, भारतीय डाक विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. खाली स्क्रोल केल्यानंतर, एप्लीकेशन (Application Link) लिंक हा पर्याय दिसेल. तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही एप्लीकेशन लिंक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर या भरती संदर्भातला एक फॉर्म ओपन होईल. त्यानंतर तुम्ही ओपन झालेला फॉर्म व्यवस्थित अचूक भरायचा आहे. ऑनलाइन भरलेला फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून, वरिष्ठ व्यवस्थापक मोटर सेवा क्रमांक -37, ग्रीम्स रोड, चेन्नई-600006 या पत्यावर पाठवायचा आहे. यावर क्लिक करून अधिसूचना पहा

हे देखील वाचा Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

Child Confidence: लहानपणीच मुलांना या पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर..

 या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

 यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.