healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

0

healthy food: धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अनेकांना कामाच्या व्यापात शरीराकडे वेळ देता येत नाही. तदुरुस्त शरीर आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते, असं आपण नेहमी ऐकत आलोय. मात्र व्यायाम करण्यासाठी अनेकांना पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यांना धावपळीच्या जीवनात व्यायामाकरिता वेळ मिळतं नाही. परंतु निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य जगायचं आहे, अशा लोकानी उठल्या उठल्या सकाळी भिजवलेले चार ते पाच बदाम नियमित खाल्ले तरी देखील उत्तम आणि निरोगी आरोग्य जगता येऊ शकते. भिजलेले बदाम खाण्याचे नऊ आश्चर्यकारक फायद्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

स्मरणशक्ती वाढण्यास मदत

दररोज नियमित तुम्ही चार किंवा पाच बदाम खाणे आवश्यक आहे. तुम्ही दररोज रात्री झोपताना चार बदाम पाण्यात भिजायला घाला. सकाळी उठल्यानंतर रात्री भिजायला घातलेले बदाम खा. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. भिजलेल्या बदामात व्हिटॅमिन-ई हा घटक आढळतो. व्हिटॅमिन-ई हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे आपल्या पैकी अनेकांना माहीती असेल. साहजिकच भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने तुमचा मेंदू दिखील आधिक गतीने वाढतो, आणि तुमची शिकण्याची क्षमता देखील विकसित होण्यास मदत होते. यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

चमकदार त्वचेसाठी उत्तम

भिजलेल्या बदामामध्ये विटामिन-ई त्याचबरोबरच अँटीऑक्सीडंन्ट हा घटक असतो. कोरड्या तसेच निर्जीव चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यास हे दोन घटक मदत करतात. साहजिकच सकाळी उठल्या-उठल्या भिजलेले बदाम नियमीत खाल्ल्याने त्वचा देखील हळूहळू चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे तंदुरुस्त आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील बदामामुळे मिळू शकते. तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थात वापरतात कपडे धुण्याची पावडर, होतात असे परीणाम..

वजन कमी करण्यास मदत. 

अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल मात्र नियमित भिजलेले बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. भिजलेल्या बदामांमध्ये प्रथिने आणि फायबर मोठया प्रमाणात आढळते. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही चार-पाच बदाम खाल्ल्यानंतर, तुमचे पोट दिवसभर भरल्यासारखे तुम्हाला वाटू शकते. बदामांमध्ये जबरदस्त प्रोटीन असल्याने तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवणार नाही. अनेकांना पोटाचे आजार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळेवर जेवण करण्यास मिळत नसल्याने, पचनक्रिया देखील खराब होते. मात्र बदाम ही समस्या दूर करण्यास मदत करते.

मधुमेह यावर चांगला उपाय. 

भिजलेल्या बदामांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असल्याने आपली इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता नियंत्रणात राहते. साहजिकच यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. एवढंच नाही तर ज्यांना मधुमेह आहे, अशा लोकांसाठी भिजवलेले बदाम खूप उपयुक्त ठरतात.

पचनक्रिया सुधारते

भिजवलेल्या बदामामध्ये जास्त फायबर असल्याने बुधिकोष्ठतेमध्ये आराम मिळण्यास मदत होते. अपचन ही अनेकांची समस्या आहे. धावपळीमुळे अनेकांना वेळेवर जेवण करता येत नाही. साहजिकच यामुळे अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. मात्र नियमीत भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते.

गरोदर महिलांसाठी खूप उपयुक्त

भिजवलेल्या बदामानांमध्ये भरपूर प्रथिने आणि प्रोटीन मिळते. भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने गरोदर महिलांना मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते‌. सहाजिकच याचे परिणाम पोटात असणाऱ्या बाळावर देखील होतात. आणि दोघांचेही आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. भिजवलेल्या बदामामध्ये प्रथिने आणि अनेक पोषण घटक असल्याने शरीराला ऊर्जा देखील मिळण्यास मदत होते. आणि यामुळे तुमच्या शरीराचा थकवा नाहीसा होतो. आणि तुम्ही नेहमी सकारात्मक राहता.

हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत

भिजवलेल्या बदामांमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस अधिक प्रमाणात असल्याने हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. आपल्या आहारावर आपले आरोग्य अवलंबून असते. आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत, त्याचे सेवन करणे फार आवश्यक आहे. हाडांची आणि दातांची मजबुती मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी कॅल्शियम युक्त आहार घेणे आवश्यक आहे. भिजवलेल्या बदामांमध्ये कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

हिमोग्लोबीन वाढण्यास मदत. 

भिजवलेल्या बदामध्ये तांबे लोह आणि व्हिटॅमिन यांचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. साहजिकच यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. भिजवलेले बदाम खाण्याचे असे काही आश्चर्यकारक फायदे आहेत.

हे देखील वाचा Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

Child Confidence: लहानपणीच मुलांना या पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर..

तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

Second hand bullet: दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता ya सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.