Child Confidence: लहानपणीच मुलांना ‘या’ पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर..

Child Confidence: प्रत्येक पालकाला आपली मुलं अव्वल असावी, असं नेहमी वाटत असतं, त्यासाठी पालक देखील प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळतात. आपला मुलगा यशस्वी व्हावा, यासाठी पालक नेहमी प्रयत्न करत असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र आपली मुलं मोठं होउन, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहावी. यासाठी पालकांनी लहानपणापासूनच मेहनत घेणे आवश्यक आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणे काही मुलं जन्मताच शार्प असतात. मात्र अनेक मुलं लहानपणापासूनच खूप लाजाळू, घाबरट देखील असतात. अशा मुलांना लहानपणापासूनच तयार करणे आवश्यक आहे. या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

प्रत्येकाचा स्वभाव आणि बुद्धी देखील वेगवेगळी असते. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र म्हणून आपण मुलांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. लहानपणापासूनच मुलांना चांगल्या सवयी आणि आव्हानांचा सामना करायला शिकवलं तर भविष्यात आपला मुलगा यशाचे शिखर गाठू शकतो. या गोष्टीचा आपल्याला विसर पडता कामा नये. हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

ही गोष्ट खरी आहे, की लहानपणापासूनच काही मुलं आत्मविश्वासाने खचून भरलेली असतात. तर काही मुलांमध्ये विश्वासाची कमी असते. मात्र अशा मुलांसाठी लहानपणापासूनच थोडीशी मेहनत घ्यावी लागते. पालक म्हणून आपली ती जबाबदारी देखील आहे. भविष्यात आपला मुलगा देखील समाजाने आदर्श आणि सर्वोत्तम म्हणून ओळखला जावा, यासाठी पालकांनी काही गोष्टी शिकवणे आवश्यक आहे. आज आपण या संदर्भातच पाच महत्त्वाच्या टिप्सविषयी माहिती घेणार आहोत. या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

चिमुकल्यांनी काहीही केलं तरी त्याची स्तुती करा

लहान मुलं नेहमी काही ना काही धडपड करत असतात. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. लहान मुलं कधीही एका जागेवर शांत बसत नाहीत. ते नेहमी काही ना काही कामात व्यस्त असतात. कधी कधी लहान मुलं चुकीच्या गोष्टी देखील करताना दिसून येतात. मात्र अशावेळी तुम्ही लहान मुलांना फटकारण्यापेक्षा त्याची स्तुती करा. यामुळे मुलाने आपण केलेल्या कोणत्याही कामाचं स्वतःलाच कौतुक वाटेल. आणि त्याला आपण करत असलेल्या कामाची सवय लागेल. महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

अनेकांना यामुळे प्रश्न पडला असेल, काही चुकीच्या गोष्टी करत असतील, तर मुलांना या सवयी लागतील. आणि भविष्यात याचे परिणाम देखील त्यांना भोगावे लागतील. मात्र असंच होईल असं नाही. याची शक्यता फार कमी आहे‌. मूलं जसजशी मोठी होतात, तसतसे त्यांना काय चांगलं आणि काही वाईट, या गोष्टीची उकल होऊ लागते. याविषयी फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जर तुमची लहान मुलं जे काही करत असतील, तर त्या गोष्टींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित करा, यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होईल. नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

समजून घेण्यासाठी वेळ आवश्यक

माणसाचं जसजसं वय वाढत जातं, तसतसा माणूस अधिक विचार करत करू लागतो. मात्र लहान मुलं या उलट असतात‌. लहान मुलं फारसा विचार करत नाहीत. लहान मुलं नेहमी आपल्या आवडीनिवडीनुसार जगत असतात. साहजिकच यामुळे अनेकदा स्वतःहून अनेक अडचणी किंवा गोष्टींची तरजोड स्वतः करत असतात. अशावेळी पालक म्हणून, तुम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. ते जे काही करत आहेत, ते त्यांना करू द्या. अडचणी कोणत्याही असू द्या. अभ्यासातल्या, किंवा खेळतील असू द्या, मुलं आपापल्या परीने त्यावर बहुतेकदा तोडगा काढतात. अशावेळी ते ज्या परिस्थितीत आहेत, त्याच परिस्थितीत तुम्ही त्यांना सोडणे आवश्यक आहे. मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

ध्येयासाठी मदत

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, माणूस हा अनुकरण करून जगत असतो. आपल्या आसपास, सभोवताली ज्या गोष्टी घडतात, आपण तसाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत असतो. मुलांच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती असते. लहान मुलं देखील आपल्या पालकांना आदर्श मानून काम करत असतात. साहजिकच यामुळे आपले कर्तृत्व आणि आपल्या सवयी आवडीनिवडी मुलांच्या मनावर देखील परिणाम करून जातात. आणि म्हणून आपण काही आदर्श ध्येय ठेवणे आवश्यक आहे. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

मुलं देखील या गोष्टींचे अनुकरण करतील. चांगल्या सवयी या नेहमी ध्येय गाठण्यासाठी कारणीभूत आणि महत्त्वाच्या ठरतात. आणि म्हणून, तुम्ही सकाळी लवकर उठणं, जेवल्यानंतर चालायला जाणं, एकमेकांशी मन मोकळापणाने गप्पा मारणे, अशा काही साधारण गोष्टी नियमित करणे देखील महत्त्वाचं ठरतं. साहजिकच या गोष्टींमुळे मुलं देखील तुमचे अनुकरण करून जगायला सुरुवात करतील. आणि यामुळे मुलं देखील नेहमी पॉझिटिव्ह राहतील.  व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असंकरत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

अपयश पचवायला शिकवणे आवश्यक

अपयश आल्यानंतर, अनेक जण मनाने खचून जाताना आपण अनेकदा पाहतो. मात्र अपयशी यशाची पहिली पायरी आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हे वाक्य आपण अनेकांच्या तोंडून किंवा अभ्यासक्रमात देखील वाचलं असेल. जर तुमच्या मुलांना अपयश आलं, तर खचून न जाता दोन पावलं मागे घेतल्याने आपण उंच उडी यशस्वीरित्या मारू शकतो, ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवा. तुम्हाला आयुष्यात जी गोष्ट हवी आहे, त्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. अपयश ही येत असतात. मात्र अपयश हे नेहमी यश कसे प्राप्त होईल, हे सांगण्याचं काम करत असतं, तुम्ही हीच गोष्ट प्रभावीपणे सांगणे आवश्यक आहे.

आनंद हा आपल्यामध्येच असतो.

लहान मुला नेहमी आपला आयुष्य आपल्या पद्धतीने जगत असतात. आपण अशावेळी आपल्या गोष्टी त्यांच्यावर लादतो. आणि मुलांचा आत्मविश्वास आणि आनंद हिरावून घेतो. माणूस आनंदी असेल, तर अनेक संकटांवर सहज मात करू शकतो. याप्रमाणेच लहान मुलांचे देखील असते. वास्तविक पाहता लहान मुलं नेहमी आनंदी असतात. मात्र आपण काही गोष्टी त्यांच्यावर लादल्याने ते आपला आनंद गमावून बसतात. आणि म्हणून लहान मुलं जे काही करतायत, त्यामध्येच तुमचा आनंद लपलेला आहे, याची मुलांना जाणीव करून देणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Second hand bullet: दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता या सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.