Lifestyle: महिलांमध्ये ‘हे’ पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

0

Lifestyle: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. घरातील अनेक वडीलधाऱ्या मंडळींचे मुलाचं लग्न किंवा मुलीचे लग्न वेळेत व्हावं, अशी इच्छा असते. वेळेबरोबरच मुलगा किंवा मुलगी चांगले गुण असणारी असावी, अशी देखील प्रत्येकाची इच्छा असते. सुखी संसार व्हावा किंवा संसारात काही अडचणी येऊ नयेत, असं नेहमी वाटतं असतं. त्यासाठी अनेक जण ज्योतिषांकडून गुणदोष पाहत असतात. आणि मगच लग्न ठरवत असतात. आता ज्यांना ज्योतिशास्त्रावर विश्वास आहे, ते यावर विश्वास ठेवतील. मात्र समाजात असे अनेक लोक आहेत. जे आजही ज्योतीशास्त्रावर विश्वास ठेवत नाही. आणि लग्न करतात. तरी देखील त्यांचा संसार सुखाचा चालतो. याचा अर्थ गुणदोष पाहून लग्न केले किंवा नाही, याला काही फरक पडत नाही. फरक पडतो, तो मुलगा आणि मुलीच्या वागण्यातील गुणांचा. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लग्नानंतर संसार सुखी करायचा असेल, किंवा चालावा यासाठी आपण नेहमी म्हणतो, संस्कारी मुलगा किंवा मुलगी करणं आवश्यक आहे. संस्कारी मुलगा-मुलगी म्हणजे नक्की असतं तरी काय? आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. मुलगा किंवा मुलींमध्ये अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत? ज्यामुळे तुमच्या संसारात काही अडचणी येणार नाहीत. किंवा तुमचा संसार सुखाचा चालेल. या गोष्टीला नीतिशास्त्रामध्ये देखील महत्त्व देण्यात आलं आहे. अलीकडच्या काळात अनेक नवविवाहीत जोडप्यांमध्ये काही महिन्यानंतरच छोट्या-छोट्या गोष्टींवरून खटकायला सुरुवात होते. हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र असं का होतं, याला देखील कारणे आहेत. आता आपण नीतिशास्त्रमध्ये सांगितल्याप्रमाणे असे कोणते चार गुण आहेत, जे असल्यावर लग्नानंतर तुमच्या संसारात काहीच अडचण येणार नाही.

धर्मग्रथांची माहीती

नीतीशास्त्रानुसार, लग्न होऊन तुमच्या घरी आलेल्या महिलेला जर धर्मग्रंथाविषयी माहिती असेल, तर संसार कसा करायचा, या विषयी तिला अनेक गोष्टींची उकल झालेली असते. अनेक धर्मग्रंथांमध्ये जीवनात कसं जगलं पाहिजे, याविषयी अनेक गोष्टीं सांगितलेल्या आहेत. अर्थातच ज्यांनी धर्मग्रंथ वाचला आहे, अशा माणसांना आनंदी आयुष्य जगण्यासाठी काय आवश्यक आहे, या गोष्टी माहीत पडतात. सहाजिकच त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात देखील या गोष्टी उतरतात. सुखी संसारासाठी हे फार आवश्यक आहे.

कर्तव्यदक्षता

ज्या महिलांमध्ये कर्तव्यदक्षता असते, त्या महिला कोणत्याही संकटावर सहज मात करू शकतात. सहाजिकच त्यामुळे त्यांच्या जोडीदाराला देखील आयुष्यात कितीही मोठं पाऊल उचलताना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. आपल्या कुटुंबावर कितीही मोठं संकट आलं तरी देखील, आपली अर्धांगिनी आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे वाचवू शकते. ही भावना नवऱ्यामध्ये देखील जाणवते. आणि मग कुटुंबातील इतर सदस्य देखील मोठ्या धीराने आयुष्य जगताना दिसून येतात. त्यामुळे लग्न करताना महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये देखील कर्तव्यदक्षता असणे फार आवश्यक आहे. या गोष्टीं पाहूनच लग्न देखील करणे आवश्यक आहे.

बचत

आयुष्य जगत असताना माणसाला नेहमी तडजोड करावी लागते. ज्या माणसाकडे तडजोड हा ऑप्शन आहे, तो माणूस जगात कुठेही गेला तरी आनंदी राहील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. याबरोबरच माणसांमध्ये आणखी एक महत्त्वाचा गुण आवश्यक आहे, तो म्हणजे बचत. तुमचा इन्कम कमी असला तरी देखील, तुम्ही उत्तमरित्या आयुष्य जणू शकता, संसार करू शकता, जर तुमच्याकडे बचत करण्याची कला असेल. बचत केल्याने नेहमी आपल्या उत्पन्नात वाढ होत असते. याकडे आपण कधीही लक्ष देत नाही. मात्र सुखी संसार करण्यासाठी ही गोष्ट फार आवश्यक आहे. आपल्या पत्नीमध्ये जर बचत करण्याचा गुण असेल, तर आपण आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित हाकू शकतो.

नातेसंबंध

आयुष्य जगत असताना नातेसंबंध जोपासणे फार आवश्यक असतं. माणूस हा समाजशील प्राणी आहे. कधी कोणत्या अडचणीचा सामना करावा लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून, प्रत्येकाशी नाते संबंध जपले तर, आपल्याला अडचणींवर सहज मात करता येऊ शकते. महिलांच्या बाबतीत देखील हाच नियम आहे. महिला जर नातेसंबंधाला महत्व देत असतील, तर याचा अर्थ ते कुटुंबातील सदस्यांबरोबरचे देखील आपले नातेसंबंध खराब होऊ नये, यासाठी प्रयत्न करेल. अर्थात घरातील सर्व सदस्य आनंदी असतील, तर संसारात आपल्याला काही अडचण येऊ शकत नाहीत. किंवा आलेल्या अडचणींवर आपण सहज मात करू शकतो.

धैर्यशाली

धैर्यशाली असल्यानंतर तुम्ही कितीही मोठी संकटे आली, तरी त्यावर सहज मात करू शकता. जर तुमची पत्नी धैर्यशाली असेल, तर तुम्हाला देखील अनेक अडचणींवर मात करताना अधिक ताकद येईल. शिवाय तुमच्या पत्नीमध्ये धैर्यशीलता असेल, तर आलेल्या संकटांपासून पत्नी देखील लांब पळून न जाता तुम्हाला आधार देऊन या संकटातून बाहेर काढू शकते. आणि म्हणून तुमच्या पत्नीमध्ये धैर्यशीलता असणे फार आवश्यक आहे. जर तुमच्या पत्नीमध्ये धैर्यशीलपणा असेल, तर तुम्ही भाग्यवान समजले जाता. शिवाय तुमच्या संसाराचा गाडा देखील व्यवस्थित चालतो.

हे देखील वाचा. Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Lifestyle: दररोज से x केल्याने काय होतं माहिती आहे? *से* *क्स* विषयी जाणून घ्या सविस्तर.

Viral video: रानडुकराला वाघाने पकडलं जबड्यात, तेवढयात मगरीनेही केला वाघावर हल्ला; पहा हा थरारक व्हिडीओ.. 

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.