Lifestyle: पुरुषांच्या ‘या’ चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

0

Lifestyle : आपल्यावर अनेकांनी प्रेम कराव असं कोणाला वाटत नाही. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करतो. मात्र इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं, किंवा आपल्यावर प्रेम करावं, याच्या फांद्यात आपण पडतो, आणि नकळत अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे लोकं तुमच्या जवळ येण्याऐवजी लांब जाणं पसंत करतात. स्त्रियांच्या बाबतीत देखील असंच आहे. तुम्ही अनेकदा स्त्रीयांवर इम्प्रेशन पाडायला जाता, मात्र याचे परिणाम उलट होतात. आज आपण याच संदर्भात बोलणार आहोत. आम्ही तुम्हाला पुरुषांच्या कोणत्या सवयींवर महिला जास्त आकर्षित होतात, याविषयी माहिती देणार आहोत.

आपल्याला अनेक जण नेहमी सांगत असतात, माणसाने जसं आहे, तसंच राहिलं, पाहिजे. उगीच मोठेपणाचा किंवा इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी करणं काही उपयोगाचं नसतं. तुमच्या अशा वागण्यामुळे इतरांना तुम्ही काहीतरी वेगळं दिसता. आणि यामुळे तुमची मोठी पंचाईत देखील होऊ शकते. या गोष्टींचा आपण विचार करायचा झाल्यास, हे अगदी खरं आहे. एखाद्याला चांगलं वाटावं, किंवा इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण काहीतरी नवीन करायला जातो. मात्र तुमचे हे वागणं इतरांना मुळीच आवडत नाही. त्यामुळे आपल्या अशा कृत्याने इतरांना आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो, हा अनेकांचा मोठा गैरसमज आहे. आता आपण पुरुषाच्या अशा कोणत्या चार सवयी आहेत, ज्याकडे महिला आकर्षित होतात, हे सविस्तर जाणून घेऊ.

तीक्ष्ण नजरेने पाहणं आवडतं. 

अनेक पुरुष महिलांशी बोलताना नजर देखील मिळवत नसल्याचं आपण पाहतो. मात्र महिलांना पुरूषांमधला हा गुण अजिबात आवडत नाही. आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं, समोरच्याशी बोलताना, त्याच्या नजरेत पाहून बोललं पाहिजे. तर तुमच्या भावना एकमेकांना समजणार आहेत. शिवाय तुम्ही खोटे बोलताय की खरे बोलत आहात, ते देखील स्पष्ट जाणवतं. त्यामुळे संवाद साधताना नेहमी एकमेकांच्या नजरेत पाहून संवाद साधणे कधीही उचित राहतं. महिलांच्या बाबतीत देखील हाच नियम लागू पडतो. आपण अनेकदा महिलांशी बोलताना अनकम्फर्टेबल फील करतो. आणि म्हणून आपण संवाद साधत असताना नजर खाली पाडत असतो, मात्र तुमची ही सवय महिलांना अजिबात आवडत नाही.

महिलांना नेहमी खरे बोलणारे पुरुष आवडत असतात. जे पुरुष महिलांच्या नजरेत नजर घालून बोलू शकत नाही, याचा अर्थ ते तुमच्या पासून काहीतरी लपवत आहेत, किंवा तुमच्याविषयी प्रामाणिक नाहीत, असं त्यांना वाटत असतं. एकमेकांच्या नजरेत नजर घालून बोलल्याने एकमेकांच्या भावना स्पष्टपणे जाणवतात. तुमच्या या सवयीकडे महिला जास्त आकर्षित होतात. वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा दोन व्यक्तींचे डोळे एकमेकांना भेटतात, तेव्हा दोघांमध्ये प्रेम होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण दोघांनाही एकमेकांच्या भावना समजून घेण्यास सोपं जाते.

लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करणे

आपण नेहमी इतरांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करतो. इतरांचं लक्ष आपल्याकडे वळवण्यात आपल्याला कसं यश मिळेल? याचा आपण विचार करतो. मात्र हा गुण किंवा सवय महिलांना आवडत नाही. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. जे पुरुष आपल्याकडे लक्ष देत नाहीत, असे पुरुष महिलांना अधिक आवडतात. त्यामुळे इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी तुम्ही जेवढे कमी प्रयत्न कराल, तेवढे तुम्ही महिलांसाठी आकर्षण निर्माण करता. फक्त महिलाच नाही, तर आपण कुठेही गेलो तरी आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधताना आपण प्रयत्न करतो. मात्र ही सवय खूप वाईट असून, यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा वाईट परिणाम पडू शकतो.

ड्रेसिंग स्टाइल आकर्षणाचे कारण बनते

प्रत्येकाची ड्रेसिंग स्टाइल वेगवेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळी ड्रेसिंग स्टाइल करणं आवडतं देखील. तुमचे कपडे नीटनेटके असतील, तुमच्या शरीरयष्टी शोभून दिसणारे असतील, तर महिलाच काय कोणीही तुमच्याकडे आकर्षित होत असतं. पुरुषांमधील महिलांना सर्वात जास्त आवड असणारी गोष्ट म्हणजे, पुरुषांची ड्रेसिंग स्टाइल. पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाइलवर महिला सर्वात जास्त आकर्षित होतात. जर तुम्ही औपचारिक कपडे परिधान केले तर, महिलांना पुरुषांमधील गांभीर्य, शार्पनेसपणा जाणवतो. त्यामुळे पुरुषांची ड्रेसिंग स्टाइल महिलांवर छाप पाडून जाते.

सेन्स ऑफ ह्युमर

जर तुमच्यात सेन्स ऑफ ह्युमर असेल, तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसता. अनेकांमध्ये हा गुण पाहायला मिळत नाही. तुमचा हा गुण अनेकांवर खूप मोठा प्रभाव पाडून जातो. इतरांप्रमाणे महिलांना देखील ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असणारे पुरुष सर्वाधिक आवडतात. जे पुरुष मजेशीर असतात. ज्यांचा स्वभाव फार विनोदी असतो, अशा पुरुषांसोबत महिला कम्फर्टेबल फिल करतात. आणि म्हणून, पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर असणं फार आवश्यक आहे.

हे देखील वाचा Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Hair Problems: डोक्यातील पांढरे केस तोडल्यानंतर केस आणखी पांढरे का होतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण..

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Video Viral: बाबा आईला मारु नका म्हणून लेकरं ओरडत राहिली पण नराधमाने ऐक नाही ऐकलं; मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral video: स्टोअर रुममध्ये से क्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

Shikhar Dhawan: पोलिसांसमोर वडिलांनीच शिखर धवनला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडिओ व्हायरल.. 

Rajat patidar: यापेक्षा सुंदर खेळी मी माझ्या आयुष्यात अजूनही पाहिली नाही; आणखी काय म्हणाला विराट? रजतनेही दिलं झणझणीत उत्तर.. 

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेसलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.