Hair Problems: डोक्यातील पांढरे केस तोडल्यानंतर केस आणखी पांढरे का होतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण..

0

Hair Problems: डोक्यावरचे पांढरे केस ही समस्या white Hair problem) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उद्भवताना पाहायला मिळते. अगदी लहान मुलांच्या डोक्याचे केस देखील पांढरे होताना पाहायला मिळतात. दाट आणि काळेभोर केस माणसाचे सौंदर्य आणखी खुलवते. माणूस आपल्या दाट आणि काळ्याभोर केसांच्या माध्यमातून अनेकांना भुरळ पाडू शकतो. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. साहजीकच या गोष्टींमुळे केसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी केस पांढरे झाले की, तुम्ही म्हतारे झाले असे म्हंटले जायचे. मात्र आता पांढर केस ही मोठी समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते तीस वर्षापर्यंतच्या पोरांचे देखील केस पांढरे होताना मोठ्या प्रमाणात दिसतात. साहजिकच यामुळे अनेकजण त्रस्त असल्याचे जाणवते. एवढंच नाही, तर अनेकांमध्ये डोक्याच्या पांढऱ्या केसांमुळे आत्मविश्वास देखील कमी होताना दिसतो.

पांढऱ्या केसांच्या या समस्यांना कंटाळून अनेकजण विविध उपाययोजना करत असतात. डोक्यावरचे केस काळे करण्याचे अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध देखील आहेत. ही उत्पादने डोक्याला लावून केस काळे करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळते. काहीजण डोक्याची पांढरे केस मुळासकट उपटून देखील टाकताना पाहायला मिळतात. मात्र ही एक वाईट सवय असून, याचे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम देखील होतात. तुम्ही देखील तुमच्या पूर्वजांकडून अनेकदा डोक्याचे पांढरे केस मुळासकट उपटून टाकू नये, असे ऐकले असेल.

डोक्याचे पांढरे केस मुळासकट उपटून टाकू नये, याचे कारण सांगताना ते असेही म्हणतात, मुळासकट पांढरे केस उपटल्याने, डोक्याची असणारे इतर काळे केस देखील पांढरे होतात. पण खरंच असे केल्याने डोक्याची इतर काळे केस पांढरे होतात? खरंच याला शास्त्रीय कारण काय आहे का? हे देखील आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण डोक्याचे केस लवकर पांढरे का होतात हे जाणून घेऊ

का होतात डोक्याचे केस पांढरे

कोणालाही आपल्या डोक्याचे केस पांढरे झालेले आवडत नाहीत. अनेकजण तर याला प्रचंड गांभीर्याने घेतात. एवढंच नाही, तर काहीजण या समस्येमुळे डिप्रेशनमध्ये देखील गेल्याचे पाहायला मिळते. मात्र आपण डोक्याचे केस कशामुळे पांढरे होतात, याचा कधी विचार केला आहे का? किंवा याचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर डोक्याचे केस पांढरे होण्यापाठीमागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी आपण महत्वाची आणि शास्त्रीय कारणे जाणून घेऊ. धुम्रपान, तणाव, अशा अनेक कारणांमुळे डोक्याचे केस पांढरे होण्यास मदत होते. आपल्या शरिरामध्ये ‘मेलानिन’ हा एक रंगद्रव्य महत्वाची भूमिका बजावत असतो. ‘मेलानिन’ याचे काम आपल्या केसाचा रंग काळा करणे हे असते. मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करून आपल्या डोक्याचे केस काळे करत असते. मात्र जेव्हा हे ‘मेलानिन’ नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवते, तेव्हा आपले केस पांढरे होतात.

आता हे ‘मेलानिन’ नवीन पेशींची निर्मिती करणे का थांबवते? असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर याला देखील कारण आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, आपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक ‘व्हिटॅमिनची’ आवश्यकता असते. ‘मेलानिन’ नवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी आपल्या शरीरात व्हिटॅमिन ‘बी’ ची आवश्यकता असते. आणि म्हणू जर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ‘बी’ हे जीवनसत्व कमी झाले, तर आपल्या डोक्याचे केस पांढरे होतात.

 हे केल्यास केस लवकर पांढरे होणार नाहीत

लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला कारणही तसेच आहे आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन ‘बी’ हे जीवनसत्व आपल्याला मिळत आहे की नाही याचा आपण कधी विचार करत नाही. आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला अनेक व्हिटॅमिनची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व आपल्या केसांसाठी पोषक घटक प्रदान करत असतं. आपल्या शरीराला जर या जीवनसत्त्वाची कमतरता नसेल, तर आपले केस लवकर पांढरे होणार नाहीत. आणि म्हणून आपल्या रोजच्या आहारात आपल्याला व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाचे सेवन करणे आवश्यक आहे.

आता आपण डोक्याचे केस मुळासकट काढल्यानंतर काळे केस देखील पांढरे होतात का? हे जाणून घेऊ

डोक्यावरचे अनेक पांढरे केस मुळासकट काढल्यानंतर, डोक्यावर असणारे इतर काळे केस देखील पांढरे होतात. असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत, आपले पूर्वज देखील हेच सांगत आले आहेत. मात्र यात काहीही तथ्य नाही. हा परंतु एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपण मुळासकट केस उपटल्यामुळे आपल्या टाळूवरील जिवंत असणाऱ्या पेशी नाहीशा होण्यास मदत होते. कदाचित यामुळेच आपले पूर्वज आणि वडीलधारी मंडळी डोक्यावरील पांढरे केस मुळासकट उपटू नये, असं सांगत असतील. सहाजिकच यामुळे आपल्या डोक्याचे इतर काळे केस देखील पांढरे होतील या भीतीने अनेकजण पांढरे केस उपटणार नाहीत, आणि यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही हाच त्याचा मूळ उद्देश असणार आहे.

हे देखील वाचा Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेसलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Shikhar Dhawan: पोलिसांसमोर वडिलांनीच शिखर धवनला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडिओ व्हायरल.. 

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..

Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

Lifestyle: दररोज से & क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.