Shikhar Dhawan: पोलिसांसमोर वडिलांनीच शिखर धवनला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडिओ व्हायरल.. 

0

Shikhar Dhawan: भारताचा सलामिवीर आणि स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर (social media) कमालीचा ऍक्टिव्ह असतो. शिखर धवन आपल्या खेळाबरोबरच कमालीचा मजेशीर खेळाडू देखील आहे. मात्र सध्या त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या पत्नीशी देखील घटस्फोट झाल्यानंतर, शिखर धवन एकटा-एकटा पडला असल्याचं पाहायला मिळत आहे. शिखर धवन सारखाच त्याचा मुलगा देखील प्रचंड मजेशीर आहे. मात्र सध्या शिखर ‘झोरावर’सोबत शिखर रहात नाही. काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झोरावर सोबत संभाषण केलेला व्हिडिओ देखील शिखर धवनने पोस्ट केला होता.

शिखर धवन सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. तसं पाहायला गेलं, तर या आयपीएलमध्ये शिखर धवनची ठिकठाक कामगिरी झाली. मात्र तरीदेखील भारतीय संघात त्याची निवड केली गेली नाही. अनेकांनी शिखर धवनची भारतीय संघात निवड व्हायला हवी होती, असं म्हटलं गेलं. रोहित शर्मा, विराट कोहली सारखा खेळाडूंना विश्रांती देऊन देखील शिखर धवनची निवड न करणे म्हणजे शिखर धवनला एक प्रकार नाकारल्याचा प्रकार असल्याचं अनेकांनी म्हटलं. स्वतः सुरेश रैना यांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली.

या सगळ्यांची एकच चर्चा होत असतानाच आता सोशल मिडीयावर शिखर धवनचा एक धक्कादायक व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शिखर धवनला स्वतः त्याच्या घरच्यांनीच नाकारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत शिखर धवनला त्याच्या वडीलांनी लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे, त्याला मारहाण करत असताना आसपास अनेक मंडळी हा सगळा प्रकार पाहत आहेत.

शिखर धवनच्या अनेक नातेवाईकांनी वडिलांना मारू नये, म्हणून पकडून देखील शिखर धवनचे वडील ऐकायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, हे करत असताना त्या ठिकाणी पोलिस देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पोलीस देखील काहीही बोलताना दिसत नाहीत. घाबरून जाऊ नका, हा सगळा प्रकार ‘रियल’ लाईफमध्ये नाही तर ‘रिल’ लाइफमध्ये घडला आहे. जसं की, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, शिखर धवन सोशल मीडियावर किती ॲक्टिव आहे. शिखर धवन सोशल मीडियावर काही ना काही, क्रिएटिव्हिटी आपल्या फॅन्सना दाखवत असतो.

शिखर धवनच्या वडिलांनी त्याला मारहाण केलेला हा व्हिडीओ शिखर धवनने स्वतः इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शिखर धवनने आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी बनवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांना खरा असल्याचा वाटत आहे, मात्र शिखर धवन अॅक्टीग करत असल्याचं आपण पाहू शकतो. या व्हिडीओत शिखर धवनने प्रचंड क्रिएटिव्हिटी केली असून, त्याने आपल्या वडिलांना देखील एक्टिंगचे धडे दिले असल्याचं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे.

या कारणांमुळे झाली पिटाई

शिखर धवनने आपला इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्याचे वडील सुरुवातीला कानाखाली लगावतात, आणि नंतर लाथा आणि बुक्यांनी चांगलीच मारहाण करतात. शिखर धवनला मारहाण करण्याचे कारण देखील फारच मजेशीर आहे. पंजाब किंग्स संघाला शिखर ‘प्ले ऑफ’ मध्ये पोहचवू शकला नाही. आणि म्हणून, याचा राग मनात धरून त्याच्या वडिलांनी शिखराला चांगलीच मारहाण केली. हा व्हिडिओ आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

काय म्हणाला हरभजन सिंग? 

हा व्हिडिओ लाईक करताना अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील हा व्हिडिओ लाईक केला आहे. कमेंट करताना हरभजन म्हणाला,तुझे वडील तुझ्यापेक्षाही जबर ॲक्टर निघाले. यावर शिखर धवन म्हणाला, वडिलांपासूच माझ्याकडे टॅलेंट आले आहे.

हे देखील वाचा Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,;पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला हा मोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार

government job: ३४ विभागात एकूण १लाख रिक्त पदांची मेगा भरती होणार या तारखेला; राज्य सरकारने दिला हिरवा कंदील..

ITBP Recruitment 2022: ITBP मध्ये निघाली बंपर भरती; 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनो लवकर करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.