government job: ३४ विभागात एकूण १लाख रिक्त पदांची मेगा भरती होणार ‘या’ तारखेला; राज्य सरकारने दिला हिरवा कंदील..

0

government job: बेरोजगारीचा (unemployment) दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बेरोजगारी बरोबरच महागाई देखील आसमान गाठत आहे. अशात चार पैशाची नोकरी (job) मिळवणे खूप आवश्यक असतं. मात्र या परिस्थितीत प्रयत्न करून देखील अनेकांना नोकरी मिळत नाही. मात्र आता नोकर भरती संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात एकूण दोन लाख रिक्त पदांपैकी निम्म्या पदांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वित्त विभागाने नोकर भरतीचे निर्बंध हटवल्याने आता जवळपास एक लाख रिक्त पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याने, राज्यातील तरुणांना नोकरी करण्याची मोठी संधी लवकरच प्राप्त होणार आहे.

गेल्या सहा वर्षापासून राज्यात कुठलीही मोठी नोकर भरती झालेली नाही. भाजपचं सरकार असताना 60 हजार पदांची नोकर भरती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र घोषणा ही घोषणाच राहिली आणि त्याची पूर्ती केली गेली नाही. राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मात्र या सरकारने देखील अद्याप मोठी नोकर भरती केली नाही. पाठी मागची दोन वर्ष कोरोणात गेल्यामुळे मोठी नोकर भरती झाली नाही. मात्र आता वित्त विभागाने नोकर भरती वरील सगळे निर्बंध हटविले असून, राज्यात लवकरच एक लाख नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

राज्यात एकूण 34 विभागांमध्ये तब्बल दोन लाख ६ हजार ३०३ रिक्त पदे असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गृहखात्यात तब्बल 18 हजार रिक्त पदे आहेत, तसेच जलसंपदा विभागात 15000 रिक्त पदे आहेत. याबरोबरच पशुसंवर्धन, महसूल विभाग, शिक्षण विभाग, भूमि अभिलेख, कृषी विभाग, मराठी राजभाषा, अन्न नागरी पुरवठा, अशा अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये एकूण दोन लाख ६ हजार ३०३ रिक्त पदे आहेत. या पैकी निम्मी पदे भरण्याची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली गेली आहे. सहाजिकच त्यामुळे दोन लाखांपैकी एक लाख रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.

राज्य सरकार लवकरच एक लाख सरकार नोकर भरती करणार असल्याने, आता अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे. अनेक वर्षांपासून नोकर भरती बंद असल्याने तरुणांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत होते. लाखो तरूण सरकार नोकर भरतीची डोळ्यात अंजन घालून वाट पाहत असल्याची परिस्थिती आहे. मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 34 विभागांमध्ये 1लाख रिक्त पदांच्या निधीची तरतूद केली आहे. सरकारने घेतलेला या निर्णयामुळे आता अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.

ही आहे राज्यातील सरकारी पदांची स्थिती

सरकारी तिजोरीतून सरकारी कर्मचाऱ्यांवर तब्बल एक लाख ३१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतो. आता या कर्मचार्‍यांच्या संख्येत आणखी एक लाखांची भर पडल्याने, हा खर्च आणखी वाढणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात सर्व विभागात मिळून मंजूर पदांची संख्या ११लाख ५३ हजार ४२ इतकी आहे. तर त्यापैकी आठ लाख ७४ हजार ४० कर्मचारी कार्यरत आहेत. तर उर्वरित दोन लाख ६ हजार ३०३ पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. सहाजिकच त्यामुळे प्रशासनावर अधिक भार पडत आहे. या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचा विचार करायचा झाल्यास, दरवर्षी एक लाख ३१ हजार कोटी खर्च होतो. तसेच राज्यातील पेन्शनर ग्रॅज्युएट कर्मचाऱ्यांवर तब्बल ५६ हजार कोटी खर्च होत आहे.

हे देखील वाचा LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..

Today’s Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर! स्टीलच्या किंमतीत झाली मोठी घसरण, येणाऱ्या काही दिवसात तब्बल एवढ्या हजारांनी होणार घसरण

IPL playoffs: दिल्ली पराभूत होताच आरसीबीने केला जल्लोष; विराट कोहली तर वेड्यासारखा लागला नाचू, पहा व्हिडिओ..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेसलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.