PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

0

PM Mudra Yojana: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने आता अनेकांना नोकरी मिळणे फार अवघड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सहाजिकच त्यामुळे आता अनेक जण नोकरी ऐवजी आपला छोटासा व्यवसाय करण्याकडे वळल्याचे दिसून येतं. तुम्ही देखील नोकरीला कंटाळला असाल, किंवा नोकरी मिळत नसेल आणि या सगळ्यांना कंटाळून व्यवसायिक करू इच्छित असाल, मात्र व्यवसाय करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. तर अजिबात चिंता करू नका, नवीन व्यवसाय करण्यासाठी आता केंद्र सरकार पीएम मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Yojana) 50 हजारांपासून तब्बल दहा लाखांपर्यंत कुठल्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

देशातील छोटे मोठे उद्योग करणाऱ्या उद्योजकांना हातभार लागावा, यासाठी केंद्र सरकाने पीएम मुद्रा कर्ज (PMMY) ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना केंद्र सरकार पन्नास हजार, पाच लाख आणि दहा लाखांपर्यंत कर्ज वाटप करते. यामध्ये पहिले ‘शिशू कर्ज’ म्हणून 50 हजार रुपये, तर दुसरे ‘किशोर कर्ज’ म्हणून 5 लाख रुपये, आणि तिसरे ‘तरुण कर्ज’ म्हणून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटप करतं. विशेष म्हणजे, कुठल्याही हमीशिवाय हे कर्ज वाटप करत असल्याने, अनेकजन या योजनेचा लाभ घेताना दिसून येतात. आता आपण या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत, तुम्हाला कोणते कर्ज पाहिजे असेल, त्यानुसार तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, आता याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.

जवळपास 35 कोटी लोकांनी घेतला लाभ

आतापर्यंत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देशातील तब्बल 34 कोटी 42 लाख लाभार्थ्यांना जवळपास 19 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. प्रधान नरेंद्र मोदी आणि ८ एप्रिल २०१५ ला या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांसाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वाटप करण्याची तरतूद आहे. हे कर्ज बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांकरिता देण्यात येते. या योजनेमध्ये व्यवसायिकांना लघुउद्योग सुरू करण्याकरिता या योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेचा उद्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 ला सुरू केलेल्या या योजनेचा मूळ उद्देश हा, नागरिकांना आर्थिक मदत करून छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणे हा आहे. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करून इतरांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, हा योजनेचा मूळ उद्देश आहे. मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या पाहिली तर तब्बल 68 टक्के खाती महिलांसाठी आणि उर्वरित 22 टक्के खाती ही नवीन उद्योजकांसाठी उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या लोकांनी घेतला सर्वाधिक लाभ

सरकारी संस्था NITI आयोगाच्या अहवालानुसार, आतापर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविषयी सांगायचं झाल्यास, एससी, एसटी, ओबीसी वर्गातील व्यवसायिकांनी तब्बल 51 टक्के कर्ज घेतलं आहे, किंवा त्यांना दिलं गेलं आहे. एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लघु आणि मध्यम व्यवसायाकरिता विनाविलंब कर्ज देण्यात आल्याचंही आयोगाकडून सांगण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुद्रा योजनेची सर्वात जास्त आवश्यकता आहे, अशा भागातील अर्जदारांना या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

 या बॅकात मिळणार कर्ज

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वाटप दिले जाते. हे कर्ज वाटप कुठल्याही हमीशिवाय बँकांना देणे बंधनकारक असल्याचं सरकारने नमूद केले आहे. त्यासाठी व्यवसायिकांना कुठल्याही सरकारी बँकेत, तसेच खाजगी बँकेमध्ये, लघु वित्त बँकांमध्ये, बिगर वित्तीय संस्था, प्रादेशिक बँकेत, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँका इत्यादी बँकांअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकणार आहे. नवीन व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणारे हे कर्ज फक्त व्यापार तसेच सेवा क्षेत्र व कृषीशी संबंध असणाऱ्या व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते.

 ही कागदपत्रे असणं आवश्यक 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरावा लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा विचार करायचा झाल्यास, तुमच्याकडे, आधार कार्ड पॅन कार्ड, असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचा कायमचा पत्ता, महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही करणार असलेल्या व्यवसायाच्या जागेचा पत्ता देणे बंधनकारक असणार आहे. सोबतच तीन वर्षांचा ताळेबंद, आयकर रिटर्न तसेच सेल्फ-टॅक्स रिटर्नची प्रत आणि पासपोर्ट आकाराचे फोटोही तुम्हाला द्यावे लागणार आहेत.

आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहू

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन https://www.mudra.org.in/ असं सर्च करायचं आहे. कॉम वर जाऊन तुम्ही हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री मुद्रा योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन होईल.

ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला मुखपृष्ठावरच शिशु, किशोर तसेच तरुण, हे तीन पर्याय दिसतील. आता तुम्हाला ज्या श्रेणीमध्ये कर्ज पाहिजे त्या श्रेणीवर क्लिक करायचं आहे. तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेज वरून तुम्हाला अर्ज डाऊनलोड करायचा आहे. डाऊनलोड अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायची आहे.

प्रिंट काढल्यानंतर, तुम्ही अर्ज व्यवस्थित वाचून घ्या. आणि अर्जावर विचारलेली अचूक माहिती भरा. डाऊनलोड केलेला अर्ज वरून तुम्हाला या अर्जासोबत जोडावयाची असणारी कागदपत्रं विषयी देखील माहिती दिलेली असेल. ही कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत जोडून तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या जवळच्या बँकेत जमा करायचा आहे. आता संबंधित बँक तुम्ही दिलेल्या अर्जाची पडताळणी करून एका महिन्याच्या आत तुमचे कर्ज मंजूर करेल.

हे देखील वाचा Police Recruitment 2022: बारावी पास उमेदवारांनो राज्यात पोलीस दलात निघाली मेगा भरती! अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

IPL 2022: ‘आयपीएल’ला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.