Police Recruitment 2022: बारावी पास उमेदवारांनो राज्यात पोलीस दलात निघाली मेगा भरती! अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून..

0

Police Recruitment 2022: बारावीनंतर अनेक जणांचं स्वप्न पोलीस भरती होण्याचं असतं. त्यासाठी अनेक जण दिवस-रात्र मेहनत देखील घेत असतात. खासकरून खेडेगावात बारावी पास विद्यार्थी पोलीस होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून असतात. मात्र महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या नंतर महाराष्ट्रात अद्याप मेगा भरती आयोजित करण्यात आली नसल्याने, विद्यार्थ्यांचे पोलिस होण्याचे स्वप्न हे फक्त स्वप्नच राहात असल्याचं, पाहायला मिळत आहे. मात्र आता गडचिरोली जिल्ह्यातील बारावी पास उमेदवारांना पोलीस भरती होण्याची सुवर्णसंधी आहे.

गडचिरोली पोलीस विभागात(Gadchiroli District Police Department) 136 रिक्त जागांची भरती केली जात असून, यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Gadchiroli Police Recruitment 2022) गडचिरोली पोलीस विभागात 136 जागांसाठी पोलीस शिपाई या पदांसाठी भरती होणार असून, बारावी पास उमेदवारांना 5 जून 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. मात्र या भरतीत एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, ती म्हणजे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील बारावी पास उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याची अट घालण्यात आली आहे.

जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल, आणि जर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असाल, तर तुमच्यासाठी पोलीस भरती होण्याची ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही पोलीस होण्यास इच्छुक असाल, आणि जर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असाल, तर तुम्हाला ५ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.‌ गडचिरोली पोलीस विभागात 136 पोलीस शिपाई (Police Constable) पदाचा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

उमेदवारांची पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून बारावी पास असणे आवश्यक आहे. मात्र यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे तुम्ही फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. किंवा तुम्ही न क्ष ल वा द्यां च्या ह ल्ल्या त अथवा नक्षलविरोधी कारवाईमध्ये मृ त पावलेल्यांची मुलं असणं आवश्यक आहे. किंवा तुमचे वडील या भागातील क्रा ई म रिपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे वडील पोलीस पाटील असणे आवश्यक आहे. याबरोबरच जर तुम्ही पोलिस कर्मचाऱ्यांची मुले असाल, तर तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. इत्यादी प्रकारच्या अटी आणि शर्थी जर तुमच्या पूर्ण असतील, तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

आता आपण या भरती प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारला जाणार ते पाहू..

भरती शुल्क

गडचिरोली पोलीस विभागात पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ओपन या प्रवर्गातून 450 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर तुम्ही मागासवर्ग या प्रवर्गातून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 350 रुपये शुल्क आकारला जाईल. आता आपण या भरतीसाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, हे पाहूया.

ही कागदपत्रं आवश्यक

गडचिरोली पोलीस विभागात पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे दहावी बारावी आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र असणे, आवश्यक आहे. तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला देखील असणे आवश्यक आहे. तुम्ही मागास वर्ग या प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर, तुमच्याकडे जातीचा दाखला देखील असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच पासपोर्ट साईजचे फोटो देखील असणे आवश्यक आहे. आता आपण या भरती संदर्भात अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा हे जाणून घेऊ.

या पत्त्यावर करावा लागेल अर्ज

गडचिरोली पोलीस विभागात पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामधील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयत अर्ज करता येणार आहे. तसेच पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता, याठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा IOCL Recruitment 2022: Indian oil मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मेगा भरती! पगार ५० हजार.. करा अर्ज..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना Ashi केली जाणार निवड..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेस लेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अश चेक करा यादी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.