IOCL Recruitment 2022: Indian oil मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मेगा भरती! पगार ५० हजार; ‘असा’ करा अर्ज..

0

IOCL Recruitment 2022: इंडियन ऑइल (indian oil) कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर (GAE) पदाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला, iocl.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातली सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा? या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत.

महागाई बरोबरच बेरोजगारीचा दर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगाराची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र रोजगाराच्या संधी मात्र तेवढ्या प्रमाणत उपलब्ध नाहीत. आणि म्हणून अनेकांना रोजगाराची आवश्यकता असल्याचे पाहायला मिळते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही नोकरी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग जाणून घेऊया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये निघालेल्या भरती विषयी.

केमिकल इंजिनीअरिंग,कॉम्प्युटर एससी तसेच इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, यासह अनेक विषयांसाठी पदांची भरती केली जाणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग, या विषयांच्या विद्यार्थ्यांना देखील या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी काही पदवीधर उमेदवारांची शिकवू अभियंता म्हणून देखील निवड करण्यात येणार आहे. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या 1961 नुसार शिकाऊ कायद्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून निवड करण्यात येणार आहे.

आता पण या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ..

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना २२मे दोन २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. संदर्भातले रिक्त जागांचा तपशील देखील आपण सविस्तर जाणून घेउया,

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ग्रेजुएट अपरेंटिस इंजिनीअरसाठी, विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असैनिक अभियंत्रण कंप्यूटर, केमिकल इंजिनीअरिंग, विज्ञान इंजिनिअरिंग, विद्युत अभियन्त्रण इंस्ट्रुमेंटेशन, मॅकेनिकल इंजिनीअरिंग यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) मध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वेतनासंदर्भात जाणून घेऊया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) मध्ये अभियंता म्हणून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांला महिन्याला 50 हजार वेतन मिळणार याच कंपनीने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. आता आपण या भरतीच्या पात्रतेविषयी जाणून घेऊ..

काय आहेत पात्रतेचे निकष?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारने B.Tech./BE/संबंधित विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 65 टक्क्यासह पदवी संपादन करणे आवश्यक आहे. एससी एसटी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी तसेच पीडब्ल्यूडीच्या उमेदवारांसाठी 55 टक्के मर्यादा ठेवण्यात आली आहे.

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेच्या निवडीविषयी विचार करायचा झाल्यास उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखत, तसेच ग्रुप कन्वर्सेशन (GD) ग्रुप टास्क (GT) याद्वारे करण्यात येणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अर्ज ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याविषयी जाणून घेऊया..

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://iocl.com/या अधिकृत वेबसाईटवर जाणे आवशक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जावून https://iocl.com/ असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर इंडियन ऑइलची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल.

इंडियन ऑइल ची अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही या पोर्टल वर खाली स्क्रोल केल्यानंतर या भरती संदर्भातली अधिसूचना वाचून, तुम्ही दिलेली माहिती सविस्तर अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. भरलेला अर्ज तुम्ही PDF स्वरूपात जतन करू ठेवा.

आणि मोबाइल नंबर वापरून ऑनलाइन पोर्टलवर आपली नोंदणी करा.ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन ऑनलाइन अर्ज भरा.अर्ज भरल्यानंतर, ऑनलाइन अर्जाचे पीडीएफ फॉरमॅट भविष्यातील संदर्भासाठी, काही असल्यास त्यांच्या सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवा

यावर क्लिक करून तुम्ही या भरती प्रक्रियेबाबत ऑनलाईन अर्ज करू शकता.

हे देखील वाचा Pani Foundation: आता या शेतकऱ्यांना मिळणार २५ लाख रुपये; ही आहे अमीर खानची फार्मर कप योजना..

Aadhar card update: लग्नानंतर बदललेलं नाव आधारकार्डवर अपडेट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Hero Motocorp Requirement: Hero कंपनीमध्ये इंजीनियरिंग तसेच या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! असा करा अर्ज..

MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळात मेगा भरती; असा करा ऑनलाइन अर्ज..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.