Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

0

Railway job: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. अशात नोकरी मिळवणे अनेकांसाठी मोठी कसरत असते. सध्या अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत‌. यात अनेक नवीन तसेच काही अनुभवी उमेदवार देखील असल्याचं दिसतं. कोरोनाने अनेकांचा रोजगार हिरावून घेतला‌. दहावी बारावी तसेच पदवीधर उमेदवारांना तब्बल दोन वर्ष घरातच बसून राहावं लागलं. या उमेदवाराला कुठेही नोकरीसाठी अर्ज करता आला नाही. मात्र आता कोरोनानंतर नोकरीची संधी उपलब्ध होताना दिसत आहे. अनेक विभागात सरकारी तसेच खाजगी कंपन्या देखील आता भरती करत आहेत. आता दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेने १०३३ पदांची भरती काढली आहे.

दहावी पास उमेदवारांसाठी आता भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. आपण पाहतो, अनेक जण लहान वयातच नोकरी करतात. घरची परिस्थिती नसल्याने दहावीनंतर पुढे शिक्षण घेणे अनेकांना परवडणार नसतं. त्यामुळे अनेक जण दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात. आता अशा विद्यार्थ्यांसाठी भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ज्या उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरी करायची आहे, अशा उमेदवारांचे अर्ज भारतीय रेल्वेने मागवले असून, उमेदवारांना हे अर्ज २४ मे पर्यंत करता येणार आहे.

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,एक हजार ३३ पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये वेल्डर, टर्नर फिटर, इलेक्ट्रिशन, स्टेनोग्राफर, मशीनिस्ट, यासह अनेक पदांवर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला अधिकृत अधिसूचना पाहायची असेल, तर यावर क्लिक करुन पाहू शकता. आता आपण या भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाणार हे पाहूया..

अशी केली जाणार उमेदवारांची निवड

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड ही दहावीच्या मार्कशीटच्या गुणवत्तेनूसार केली जाणार आहे. उमेदवारांनी या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीची एक यादी प्रसारीत करण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना दहावीमध्ये सर्वाधिक टक्केवारी आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारांची रेल्वे भरती प्रक्रियेत निवड केली जाणार आहे. रेल्वे अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी कुठल्याही उमेदवाराची लेखी किंवा मुलाखत होणार नाही.

आता आपण कोण-कोणत्या विभागात किती जागा आहेत, हे देखील पाहूया..

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी एकूण 1033 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये डीआरएम डिव्हिजन रायपूरमध्ये एकूण ६९६अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वेगन रिपेअर शॉप रायपूर या ठिकाणी एकूण 337 अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. विविध विभागाची अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी,यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

कसा कराल अर्ज? 

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला भारतीय ॲप्रेंटिसशिपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन https://www.apprenticeshipindia.gov.in/ असं सर्च करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या क्रोमवर जाऊन असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

हे देखील वाचा Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Amazon Summer Sale: Amazon वर सर्वच किराणा मालावर 50 टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या सविस्तर..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून असा दिला मोबाइल नंबर..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.