Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून ‘असा’ दिला मोबाइल नंबर..

0

Viral Video: सध्या लग्नाचा सीझन सुरू असून, नवरी नवरदेवाप्रमाणे लग्नासाठी आलेल्या दोन्हींकडील कुरवली मंडळी लग्नाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळते. नवरी नवरदेवा प्रमाणे हा सोहळा इतरांसाठी देखील आनंदाचा मानला जातो. या सोहळ्यात अनेक जण नटून-थटून येत असतात. लग्नासाठी आलेले अनेक तरुण-तरुणी लग्नसोहळ्यात एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं देखील पाहायला मिळते. अशाच एका लग्नात एक तरुण आणि तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून,या व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

लग्न सोहळा हा नवरा आणि नवरीसाठी खूप आनंदाचा सोहळा मानला जातो. फक्त नवरा आणि नवरीसाठीच हा सोहळा आनंदाचा असतो, असं नाही, तर लग्नात सहभागी होणारे अनेकजण या सोहळ्यासाठी नटून-थटून येत असतात. सहाजिकच नटणारांची सगळ्यात जास्त संख्या तरुण तरुणींमध्ये पाहायला मिळते. अनेक जण या सोहळ्यात आपल्या प्रेमाच्या शोधात देखील असल्याचं दिसून येतं. या तरूण तरुणींवर कॅमेरामनची देखील नजर असल्याचं आपण पाहतो. यासंदर्भातलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हळदी समारंभात नाचगाणं सुरू असताना, या कार्यक्रमात एक तरुणाणी आणि तरुणीची एकमेकांच्या नजरेला नजर भिडते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात.

हळदी समारंभात नाच गाणं सुरू असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा हा व्हिडीओ कॅमेरात झाला आहे. पुढे ओळख व्हावी यासाठी हा तरुण तरुणीला नाचत-नाचत हातवारे करत आपला मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं, या व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कॅमेऱ्यात कैद झालेले हे दृश्य पाहून, अनेकांनी मोबाईल नंबर देण्याच्या स्टाईलचे कौतून केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचा हसून-हसून लोटपोट झाला आहे.

काय घडलं नक्की? 

एका लग्नात हळदी समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना, एक मुलगा नाचत होता. हा मुलगा आपल्याच धुंदीत जोरदार नाचत असताना अचानक त्याची नजर एका सुंदर मुलीकडे जाते. ही मुलगी देखील त्याच्याकडे पाहत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांकडे अनेकवेळा पाहतात. आणि प्रेमात पडतात. पुढे एकमेकांशी बोलणे व्हावे, यासाठी हा मुलगा जी शक्कल लढवतो, हे पाहून अनेकांना धक्का बसेल.

हा मुलगा मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर, या मुलीला मोबाईल नंबर देण्यासाठी कमालीची शक्कल लढवतो. हळदी कार्यक्रमात नाचत नाचतच हातवारे करून आपल्या हाताची बोटे मुलीला दाखवतो. मुलगी देखील त्याने बोटांनी करून दाखवलेली आकडेवारी मोबाईलमध्ये टाइप करून घेते. नाचत-नाचत हा मुलगा आपला संपूर्ण मोबाईल नंबर हाताची बोटे दाखवून मुलीला देतो. मुलगी देखील व्यवस्थित मोबाईल नंबर टाइप करून घेते, आणि लगेच फोन करते.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून, अनेकांचा लोटपोट झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांनी भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @Rumani221 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Viral video: माणसांप्रमाणे प्राणी देखील ठेवतात संबंध; २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओत आहे तरी काय? पहा तुम्हीच..

MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज..

PAN Card Apply Online: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पॅन कार्ड कसं काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

BRO Recruitment:10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.