MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व ‘डिटेल्स’ आणि करा ‘असा’ अर्ज..

0

MahaGenco Recruitment: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण नोकरीच्या शोधात असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष अनेकांना घरातच बसून राहावं लागलं. या काळात पदवीधर विद्यार्थ्यांना कुठेही जॉब करता आला नाही. मात्र आता अनेक कंपन्या नवीन आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया राबवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता ‘महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने’ (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अधिसूचना जारी करून भरती प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. भरती संदर्भात आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) जारी केलेल्या अधिसूचनेनूसार या कंपनीत विविध पदांसाठी ४१ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता या पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची मुदत १७ मे २०२२ पर्यंत असणार आहे. आता आपण शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, आणि यासाठी अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे पात्रता?

मुख्य अभियंता: उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता या विविध पदांसाठी होणाऱ्या ४१ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, इच्छुक उमेवार हा इलेक्ट्रिकल मध्ये बॅचलर पदवी( Bachelor Degree in Electrical) मिळवलेला असणं आवश्यक आहे. तसेच यांत्रिक इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक दूरसंचार (Mechanical Instrumentation/ Electronics/ Electronic Telecommunication) इत्यादी पदव्या आवश्यक आहेत. महत्वाचं म्हणजे ही पदवी उमेदवारांनी मान्यता प्राप्त संस्थेतून घेणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी वरील सर्व पदवी ही मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असणे आवश्यक आहेच, सोबतच उमेदवारांना या पदांचा चौदा वर्षांचा अनुभव असणं देखील गरजेचं असणार आहे.

उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer): या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, अशा उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, Bachelors’ Degree in Electrical/ बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल, बॅचलर डिग्री इन्स्ट्रुमेंटेशन, डिग्री इन इलेक्ट्रॉनिक अॅणड टेलिकम्युनिकेशन, उमेदवारांनी या पदव्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून घेतलेल्या असाव्यात. या पदासाठी देखील 14 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer): या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान 12 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मध्ये उमेदवाराच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल, बॅचलर डिग्री इन इन्स्ट्रुमेंटेशन, बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक, चिल्लर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, या पदव्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून घेतलेल्या असाव्या. आता आपण कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, जाणून घेऊया.

किती मिळणार पगार? 

विविध पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना किती पगार मिळणार, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुख्य अभियंत्याला एक लाख वीस हजार ते दोन लाख तीस हजारपर्यंत पगार मिळणार आहे. तसेच उपमुख्य अभियंत्याला एक लाख ते दोन लाख रुपये पर्यंत तर अधीक्षक अभियंत्याला 90 हजार ते दोन लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

उमेदवारांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 

उमेदवारांना आपल्या पदवीच्या शैक्षणिक प्रमाणपत्राबरोबरच दहावी आणि बारावी मार्कशीट देखील आवश्यक आहे. या बरोबरच शाळा सोडल्याचा दाखला देखील आवश्यक आहे. तसेच जा ती चा दाखला, आधार कार्ड, आणि पासपोर्ट साईजचे फोटो इत्यादी कागदपत्रे उमेदवारांना आवश्यक असणार आहेत. या भरती प्रक्रियेसंदर्भातली अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी https://mahagenco.in/ यावर क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा सोबतच या भरती प्रक्रिया संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा यावर क्लिक करा.

या पत्यावर पाठवा अर्ज

सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती, एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Viral video: अटक कराय गेले अन् आरोपींसोबतच मटन खाऊन आले; खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना..

Viral video: स्टोअर रुममध्ये से क्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.