Viral video: अटक कराय गेले अन् आरोपींसोबतच मटन खाऊन आले; खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना..

0

Viral video: गु न्हे गा रां च्या मुसक्या आवळून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी काम करणं हे पोलिसांचे प्राथमिक काम असतं. अनेक सराईत गु न्हे गा रां ना सापळा रचून पोलीस अटक देखील करतात. शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांनी गु न्हे गा रां च्या मुसक्या आवळल्याच्या घटना आपण सोशल मीडियावर नेहमी ऐकतो. मात्र आता पोलिसां संदर्भातला (police) एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांना अटक करण्यासाठी पोलिस गेले. मात्र या बहाद्दर पोलीसांनी आरोपींना अटक न करता त्यासोबतच चक्क मटन पार्टी करून माघारी परतले. या मटन पार्टीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, खाकी वर्दीला काळीमा फासणारी ही घटना असल्याचं, बोललं जात आहे. पोलिसांनी आरोपी मध्ये सुरू असलेल्या या पार्टीचा व्हिडीओ ‘पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर’ यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका पोलिस अधिकाऱ्याने मटन खात बोलताना मोठा खुलासा समोर आला आहे. तुमचा हा विषय खूप किरकोळ आहे. ‘तुमसर’ पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असताना आम्ही अनेक आरोपींची नावे उडवली असल्याचं हा कर्मचारी सांगत आहे‌. विशेष म्हणजे, यामध्ये या पोलिस कर्मचाऱ्याने आईजी यांचा देखील उल्लेख केला असल्याने, एकच खळबळ माजली आहे.

पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra bhondekar) यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, या प्रकरणाची चौकशी करणं आवश्यक आहे. पोलीस गुन्हेगारांनाच जर पोसत असतील तर, हे खूप धोकादायक असल्याचा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

गुन्हेगारांना शोधणं पोलिसांसाठी मोठं आव्हान असतं. सराईत गुन्हेगार नेहमी चकमा देऊन फरार होतात. मात्र या ठिकाणी पोलिसांनी गुन्हेगारांना शोधलं खरं, पण त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी चक्क त्यांच्यासोबतच मटन खाऊन आले. फक्त मटणासाठी पोलीस सराईत गुन्हेगारांना माप करू लागले तर, गुन्हेगारीला कधीही आळा बसणार नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

२७ तारखेला पहाटे भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीवर तब्बल पंधराते वीस वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या. एवढंच नाही तर या अधिकाऱ्याला मारहाण देखील करण्यात आली. या सगळ्या प्रकाराची तक्रार या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पवई पोलिस स्टेशनला (pavai police station) केली. आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. परंतु आरोपींना अटक करायला गेलेल्या पोलिसांनी मात्र अटक करण्याऐवजी आरोपींसोबत मटण खाऊन माघारी परतले.

हे देखील वाचाViral video: स्टोअर रुममध्ये से क्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ..

Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.