Ration Card: आता ‘या’ लोकांचे ‘रेशन कार्ड’ होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

0

Ration card: जर तुम्ही रेशन कार्डधारक (Ration Card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पात्र नसताना देखील अनेकजण या योजनेचा लाभ घेताना पाहायला मिळतात. मात्र आता अशा रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पात्र नसतानाही रेशन घेणाऱ्यांची संख्या खेडेगावात आणि शहरात देखील मोठ्या प्रमाणात असल्याची बाब लक्षात घेऊन सरकारने या संबंधी नवीन नियम लागू केले आहेत. अपात्र रेशनकार्ड धारकांनी आपले रेशनकार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मानसी पाच किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. ही सुविधा अजूनही चालू आहे. या जे पात्र नाहीत, ते देखील या सुविधांचा लाभ घेताना दिसून येत असल्याने सरकारने यासंधी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र नसून, देखील या योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशनधारकामुळे मूळ लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, आणि म्हणून अशा स्थितीत अपात्रांना तात्काळ आपले रेशन कार्ड अधिका-यांनाकडे सरेंडर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जर अपात्र व्यक्तीने त्यांचे रेशन कार्ड जमा केले नाही, तर त्यांच्यावर चौकशीकरून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

काय आहे नवीन नियम?

ज्या रेशनकार्ड धारकांना 100 स्क्वेअर मीटरपेक्षा अधिक भूखंड आहे, फोर-व्हिलर तसेच ट्रॅक्टर, सोबतच ग्रामीण भागात दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि शहरात तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे अन्न पुवठा विभागाने म्हंटले आहे. दोन आणि तीन लाख कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या रेशनकार्ड धारकांनी आपले रेशनकार्ड तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नवीन नियमानुसार जे रेशन कार्ड धारक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी आपले रेशनकार्ड जमा केले नाही चौकशीनंतर त्यांचे कार्ड रद्द केले जाणार आहे. शिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल.

हे आहेत अपात्र

ज्या कुटुंबांकडे चारचाकी, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, 5 KV किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर, 100 चौरस मीटरचा भूखंड, पाच एकरपेक्षा जास्त जमीन, आयकर भरणारे, ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त, शहरात राहणाऱ्या लोकांचे 3 लाख आणि त्यापेक्षा जास्त. इत्यादी रेशनकार्ड धारक अपात्र आहेत.

हे देखील वाचा Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

Air India AIASL Recruitment 2022: टाटा समुहाच्या एअर इंडियात विविध पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..

Lifestyle: नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने जुन्या बॉयफ्रेंड सोबत..,;वरून म्हणतेय असं करणं योग्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.