Air India AIASL Recruitment 2022: टाटा समुहाच्या एअर इंडियात विविध पदांसाठी मेगा भरती; ‘असा’ करा अर्ज..

0

Air India AIASL Recruitment 2022: Air india चा आणि टाटाचा खूप भावनिक आणि जवळचा संबंध आहे. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. टाटाने स्वतः १९३२ ला उभारलेली Air india कंपनी तब्बल ६८ वर्षानंतर पुन्हा १८ हजार कोटींना खरेदी केली. TATA ने Air India चे अधिग्रहण करताना बऱ्याचश्या सुधारणा करत असल्याचं पाहायला मिळते. एअर इंडियातील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ, तसेच नियमितपणे वेतन करण्यासंबंधी कठोर पाऊले या समूहाने उचलली असल्याचं बोललं जात आहे.

बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोणामुळे दोन वर्ष पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कुठेही अॅप्लिकेशन करता आले नाही. कोरोणामुळे अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. मात्र आता अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. टाटा समूह देखील Air India मध्ये ६५८ पदांसाठी भरती करत आहे. जर तुम्ही Air India मध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

टाटाच्या एअर इंडियामध्ये ६५८ पदांसाठी निघालेल्या भरतीप्रक्रियाची (Air India AIASL Recruitment 2022) अर्ज करण्याची शेवटची मुदत, पात्रतेविषयी, पदांसंदर्भात, आणि अर्ज कसा करायचा? या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया..

टाटा समूहात काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण या समूहात काम करण्यासाठी मोठी धडपड करताना पाहायला मिळतो. जर तुम्हीही या समूहात काम करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. एअर इंडियाने एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (AIASL) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये अप्रेंटिस, ग्राहक एजंट, हँडीवुमन, युटिलिटी एजंट, कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एजंट, कनिष्ठ कार्यकारी-तांत्रिक, ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-PACS या पदांचा समावेश आहे.

वरील पदांसाठी नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी http://www.aiasl.in/Recruitment या अधिकृत वेबसाईवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.आपण वरील पाहिलेल्या पदांकरिता एकूण ६५८ जागा भरल्या जाणार आहेत. आता आपण जागांसंदर्भात तसेच या पदांसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याविषयी सविस्तर घेऊया..

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 

एअर इंडिया एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड ( Air India AIASL) यानुसार होत असलेली ही भरती पूर्व विभागातील कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच उत्तर विभागातील लखनऊ आंतरराष्ट्रीय विमानतळाकरीता होत आहे. मात्र कोलकाता विमानतळाकरिता आता तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत, कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २२ एप्रिल २०२२ होती. मात्र लखनऊ विमानतळासाठी देखील तुम्हाला दोनच दीक्षांत अर्ज करावे लागणार आहेत. कारण लखनऊ विमानतळासाठी अर्ज करण्याची मुदत २७ एप्रिल २०२२ पर्यंत ठेवण्यात आली आहे.

कोलकत्ता विमानतळासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असल्याने, आता आपण लखनऊ विमानतळासाठी असणाऱ्या रिक्त जागां पाहूयात..

ग्राहक एजंटसाठी १३ जागा, रॅम्प सर्व्हिस एजंट तसेच युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर या पदांसाठी प्रत्येकी १५-१५ जागा भरण्यात येणार आहेत. अप्रेंटिस या पदासाठी देखील २५ जागा मारण्यात येणार आहेत. कनिष्ठ कार्यकारी तांत्रिक एक जागा असणार आहे.

या भरतीसाठी पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घेऊया..

कंपनीने जारी केलेल्या अधिसूचनेत उमेदवारांच्या पात्रतेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, या संबंधी उमेदवारांनी वेबसाईटवर जाऊन पाहणं आवश्यक आहे. वयोमर्यादा: वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, टर्मिनल व्यवस्थापक, ड्युटी मॅनेजर-टर्मिनल उप. टर्मिनल मॅनेजर-पॅक्स, यासाठी ५५ वर्षे वयाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर इतर पदाकरीता ओपनसाठी २८ वर्षे, ओबीसींसाठी ३१ वर्षे, आणि SC/ST अरीता ३३ वयाची अट ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना ५०० रूपये शुल्क देखील भरावे लागणार आहे. या भरतीसाठी अॉनलाईन अर्ज करणं आवश्यक असून, तुमची नीवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. http://www.aiasl.in/Recruitment या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन, तुम्ही या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊन अर्ज करू शकता.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; या पदांसाठी असा करा अर्ज..

Viral video: मुलीच्या डोक्यात साप शिरल्याने उडाला गोंधळ; मुलगीही न घाबरता सापाला काढू लागली बाहेर पण..

Viral video: शिकार करायला टपलेल्या सिंहीणीला म्हशीने शिंगावर घेऊन अनेकवेळा चेंडूसारखं फेकून दिलंय

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.