Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; ‘या’ पदांसाठी ‘असा’ करा अर्ज..

0

Bank of India Recruitment 2022: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. कोविडमुळे अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची देखील दोन वर्ष कोविडमुळे अशीच गेली. आता अनेकांना नोकरीच्या आवश्यकता असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पदवीधर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही बँकेत नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये आता विविध पदांसाठी भरती निघाली असून, तब्बल ६९६ जागा बँक ऑफ इंडिया भरणार आहे.  यासंदर्भात  आदीसूचना जारी करण्यात आली असून, कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार असल्याची माहिती आहे.  ६९६ विविध जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी २७ एप्रिल २०२२ पासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे.

बँकेत नोकरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, या भरतीचा फॉर्म देखी ऑनलाईनच भरायचा आहे. एकूण 696 पदांच्या होणाऱ्या भरतीसाठी फॉर्म भरण्याची मुदत १० मे पर्यंत असणार आहे. यासंदर्भातला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला bankofindia.co.in या बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत..

या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत, पदाचे नाव, तसेच शैक्षणिक पात्रता काय आहे? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया…

शैक्षणिक पात्रता :

ऑफिसरसाठी एकूण 594 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अर्थशास्त्र, सांख्यिकी, अर्थमिती तसेच लागू सांख्यिकी यामध्ये पदवी आवश्यक आहे. सोबतच चार वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे.  CA /ICWA/CISA ही पदवी मिळवून किमान तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सोबतच MBA (फायनान्स)/ PGDM (फायनान्स)  CA / ICWA पदवी मिळवून दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.  60% गुणांसह कुठल्याही शाखेमधील पदवी MBA/PGDM/PGDBM/PGBM/ PGDBA इद्यादी शाखेतील पदवी मिळवली असेल, तर तुम्ही अर्ज करु शकणार आहे. सोबतच तीन वर्षाचा अनुभव देखील असणं आवश्यक आहे. तसेच इंजिनिअरिंग पदवी सोबतच 03 वर्षाच अनुभव असणं आवश्यक आहे.  BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT) मिळवलेल्या आणि या क्षेत्रात दोन वर्ष अनुभव असलेले विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

ऑफिसर (Contractual)  या पदांसाठी 102 जागा असणार आहेत. याची शैक्षणिक पात्रता  B.E./ B.Tech./ MCA  या शाखेत पदवी असणं आणि सात वर्षे अनुभव  आवश्यक आहे. या पदांसाठी वयाची कास्ट नुकसान अट देखील ठेवण्यात आलेली आहे. आपण या संदर्भात देखील सविस्तर पाहू या..
वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी उमेदवाराचे वय 28 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे. यात SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्ष अतिरिक्त असणार आहेत. तर ओबीसीसाठी तीन वर्ष अतिरिक्त असणार आहेत.

आपण या पदांसाठी होणारी निवड प्रक्रिया कशी असणार आहे, यासंदर्भात जाणून घेऊ..
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही ऑनलाइन चाचणी किंवा मग गट चर्चा नाहीतर, वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. एकूण अर्जदाराच्या संख्येनुसार या पद्धतीचा अवलंब केला जाईल. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फी देखील आकारण्यात येणार आहे,  ओपन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 850 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर SC, ST तसेच PWD श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी  175 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Bank of India च्या पदांसाठी उमेदवारांना २६ एप्रिल २०२२ ते १० मे २०२२ या दरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
https://bankofindia.co.in/Career  या अधिकृत वेबसाइटवर जाऊन, तुम्ही जाहिरात पाहू शकता. तसेच अर्ज देखील करू शकता.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Viral Video: या कारणामुळे वधूने भर मंडपात मारली वरच्या कानाखाली; पुढे काय झालं? पहा व्हायरल व्हिडीओ..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Viral video: स्वतःहून सिंहाच्या कळपात जाऊन शिरलं हरीण, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral video: सिंहाचं डब्यात अडकलं तोंड, निघावं म्हणून धावत सुटलं सैरावैरा पण्.. तुम्हीच पहा सिंहाची केविलवाणी अवस्था..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.