Viral video: सिंहाचं डब्यात अडकलं तोंड, निघावं म्हणून धावत सुटलं सैरावैरा पण्..,” तुम्हीच पहा सिंहाची केविलवाणी अवस्था…

0

Viral video: प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राण्यांविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. प्राणी जंगलात कसे राहतात? एकमेकांची शिकार कशी करतात? यासंदर्भात अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता नेहमी असते. सिंह हा जंगलाचा राजा का असतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जंगलामध्ये सिंहाचा वेगळाच थाट असतो. सिंहाच्या कोणीही नादी लागत नाही. आणि सिंहाला कोणी मदत देखील करत नाही. यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सिंहाला जंगलामध्ये कोणालाही घाबरत नाही. अनेक जण सिंहाला पाहून धूम ठोकून पळून जातात. जंगलात सिंह कोणाचाही मित्र नसतो, हे देखील सगळ्यांनाच माहीत आहे. दुसरीकडे आपण पाहिले तर, जंगलातले अनेक प्राणी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं दिसून येतं. सिंह किंवा वाघाच्या तावडीतून हरणाला माकडांनी वाचवल्याचं तुम्ही अनेक वेळा सोशल मीडियावर पाहिलं असेल. संकटाच्याकाळी अनेक प्राणी एकमेकांना मदत करत असतात. मात्र सिंहाला मदत करायला कोणीही पुढे येत नाही. कदाचित हा त्याच्या स्वभावाचा दोष असेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एका सिंहाचं तोंड काळ्या बॅलरमध्ये अडकल्याचं पहिला मिळत असून, आपलं तोंड बाहेर निघावं म्हणून, सिंह इकडून तिकडे सैरावैरा धावताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत समोर काही प्राणीप्रेमी देखील हे दृश्य पाहत आहेत. मात्र सिंहाच्या स्वभावामुळे त्याला मदत करण्याचं धाडस कोणीही करताना दिसत नाही.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ, liontold नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत काही सिंह काहीतरी खात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या दरम्यान एका सिंहाचे तोंड एका काळ्या रंगाच्या बॅलरमध्ये अडकल्याचं दिसत आहे. या बॅलरमधून आपल्या तोंड निघावं म्हणून, सिंह आटापिटा करताना दिसत आहे.

समोर हे दृश्य प्राणी प्रेमी देखील पाहत आहेत. मात्र सिंहाच्या स्वभावामुळे त्याच्या मदतीला जाण्यास कोणीही तयार नाही. सिंहाला समोरचे काहीच दिसत नसल्याचं, या व्हिडीओत दिसत असून, तो आपलं तोंड बाहेर निघावं म्हणून, सैरावैरा धावताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत शेवटपर्यंत सिंहाला या डब्यातून आपलं तोंड बाहेर काढण्यात यश मिळत नसल्याचे, पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत तीन लाखांपर्यंत व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर देखील केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करताना संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी मजा देखील घेतली आहे. काहींनी प्राणिसंग्रहालयाचा हा निष्काळजीपणा असल्याचं म्हटले आहे. तर काहींनी सिंहाच्या स्वभावामुळे त्याला कोणी मदत करत नसल्याचं म्हटलं आहे.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Viral video: आई ती आईच..! पिल्लांना कोब्राच्या तावडीतून असं वाचवलं कोंबडीचे; अंगावर शहारे आणणारी ही झुंज एकदा पहाच..

Viral video: मगरीच्या पाठीवर बसून, डान्स करु लागला वयोवृद्ध व्यक्ती पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीच पहा हा व्हिडीओ..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.