Tamannaah Bhatia Vijay Varma: त्याने फक्त एन्जॉय केला; तमन्ना भाटिया विजय वर्माच्या ब्रेकअपचं धक्कादायक कारण आले समोर..

0

Tamannaah Bhatia Vijay Varma: तमन्ना भाटिया विजय वर्मा एकांसोबत लग्न करणार असल्याचे चर्चा रंगत असतानाच अचानक दोघांचा ब्रेकअप (Tamannaah BhatiaVijay Varma breakup) झाल्याचा बातम्या प्रसारित झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये (bollywood) खळबळ उडाली आहे. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हे सुंदर कपल अचानक वेगळं का होत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. आता या दोघांचे वेगळे होण्याचे कारणही समोर आले आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अफेअर (bollywood industry couple) आणि ब्रेकअप हे काही नवीन नाही. अनेकांचे अनेकांसोबत अफेर आणि त्यानंतर ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आपण अनेकदा ऐकत असतो. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टार सेलिब्रिटींच्या लवस्टोरीज अपूर्ण राहिल्याचं आपल्याला माहितीही आहे. आता यामध्ये आणखी एका जोडप्याची भर पाडली आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघे वेगळे झाले असून, यापुढे दोघे चांजले मित्र म्हणून राहणार असल्याचं निश्चित झाले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, 2024 मध्ये तम्मना भाटिया आणि विजय वर्मा एकमेकांसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. दोघेही मुंबईमध्ये घर खरेदी करणार आहेत. घर खरेदी केल्यानंतर, हा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र आता या दोघांचे लग्न करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील चांगलीच पसंती दिली होती.

अचानक ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. साहजिकच त्यामुळे हा ब्रेकअप नक्की कशामुळे झाला याविषयी चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले. तमन्ना भाटिया सध्या तीस वर्षाची आहे. तमन्नाला यापुढे डेट करायचं नव्हते, तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या दोघांमध्ये लग्नाविषयी चर्चा होत होती. लग्नाच्या विषयामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले होते. विजय वर्माला आपल्या करिअरवर फोकस करायचा होतं. इतक्यात तो लग्नासाठी तयार नव्हता. तमन्ना भाटीयाला ही गोष्ट बिलकुल आवडली नाही. लग्नानंतर देखील करिअर उत्तमरीत्या करता येऊ शकतं. असं तिचं म्हणणं होतं, मात्र विजय वर्मा आपल्या निर्णयावर ठाम होता. आणि याच कारणामुळे अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आता सोशल मीडियावर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील जोरदार रंगल्या आहेत. विजय वर्माला केवळ तमन्ना भाटियाचा वापर करायचा होता. तमन्ना भाटियाच्या सौंदर्यावर विजय वर्मा फिदा होता. आणि म्हणून त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं. तमन्नाने लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा, तो जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. आता या सगळ्यांमुळे त्याला फक्त एन्जॉय करायचा होता, असा निष्कर्ष तमन्नाच्या चाहत्यांनी काढल्याचे पाहायला मिळत असून, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही सुरू आहे.

हे देखील वाचा Tamannaah Bhatia Virat kohli: विराट कोहलीच्या अफेअर विषयी तमन्नाने ते सगळंच सांगून टाकले..

CT 2025 final: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हे दोन खेळाडू घेणार निवृत्ती; असा आहे BCCI चा रोड मॅप..

Virat kohli anant ambani : ..अखेर तो विकला गेलाच; अनंत अंबानीच्या षढयंत्रात असा अडकला विराट कोहली..

CT 2025 Final IND vs NZ: न्युझीलंड साकारणार एकतर्फी विजय; पहा ते एक समीकरण ज्यामुळे भारताचा वाजणार बाजा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.