CT 2025 Final IND vs NZ: न्युझीलंड साकारणार एकतर्फी विजय; पहा ते एक समीकरण ज्यामुळे भारताचा वाजणार बाजा…

0

CT 2025 Final IND vs NZ: भारत आणि न्युझीलंड (India vs newzealand champions trophy final 2025) यांच्यामध्ये 9 तारखेला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुबईमध्ये (Dubai) होणार आहे. भारतीय संघाकडे दुबईच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव असला तरी फायनल सामन्यात न्युझीलंड संघ भारतापेक्षा खूप पुढे आहे. जाणून घेऊया, ती दोन कारणे ज्याच्यामुळे भारत आहे एकतर्फी पराभवाचा छायेत..

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत साखळीतील आपले तिन्हीं सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्युझीलंड संघाला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. साखळी सामन्यात जरी भारतीय संघाने किविला पराभवाची धूळ चालली असली तरी फायनलमध्ये भारतापेक्षा न्युझीलंड अधिक बलशाली आहे.

सेमीफायनल सामन्यात न्युझीलंडने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला एकतर्फी धूळ चारली. फायनल आणि सेमी फायनल सामन्यांमध्ये जो संघ दबावाला व्यवस्थितरित्या हाताळेल तोच संघ विजयी होत असतो. गेल्या अनेक आयसीसी स्पर्धेमध्ये भारतीय संघाला दबावाला व्यवस्थित हाताळता आले नाही.

फायनल सामन्यात न्यूझीलंड भारतापेक्षा अधिक सरस असल्याचे अनेक क्रिकेट दिग्गजांनी देखील म्हटलं आहे. खेळाचे बेसिक न्यूझीलंडचा संघ चोखपणे पार पाडतो. न्युझीलँड संघाची फिल्डिंग दमदार आहे. मुलींच्या जोरावर देखील न्यूझीलंडचा संघ सामन्याला कलाटणी देऊ शकतो. मात्र या व्यतिरिक्त दोन खूप महत्त्वाची कारणे आहेत, जी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असून, भारताचा एकतर्फी पराभव होण्याची देखील दाट शक्यता.

महत्त्वाचा सामन्यात भारतीय फलंदाजांनी अनेकदा नांग्या टाकल्या आहेत. विराट कोहली वगळता भारतीय संघाच्या फलंदाजांना महत्त्वाच्या सामन्यात अनेकदा धावा करत आल्या नाहीत. नऊ तारखेला होणाऱ्या फायनल सामन्यात जर विराट कोहली (virat kohli) लवकर बाद झाला, तर भारतीय संघ प्रचंड दवाखाली येऊन एकतर्फी पराभव होण्याची शक्यता अधिक आहे.

भारतीय संघाचे फलंदाजी दमदार फॉर्ममध्ये असले तरी संकटकालीन परिस्थितीला (crunch situation) अनेकदा फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे याही सामन्यात पुन्हा याची पुनरावृत्ती होईल, असं ठामपणे सांगता येणार नसलं तरी ही शक्यता नाकारताही येणार नाही. रोहित शर्मा सलामीला येऊन ज्या पद्धतीने रिस्क घेऊन खेळतो आहे, ही देखील भारतीय संघासाठी चिंतेची गोष्ट आहे. दुसरीकडं शुभमन गिलची महत्त्वाच्या सामन्यात अद्याप बॅट चालवलेली नाही.

साखळी सामन्यात जरी वरून चक्रवर्तीने (varun chakraborty) न्युझीलंड संघाचे पाच फलंदाज बाद केले, हे खरं असलं तरी न्युझीलंड संघ रणनीती आखण्यात मातब्बर आहे. फायनल सामन्यात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटके मारण्याची चूक न्युझीलंडचे फलंदाज पुन्हा करणार नाहीत.

नाणेफेक जिंकून न्युझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. जर न्युझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करून 250 पर्यंत धावा केला, आणि विराट कोहली लवकर बाद झाला, तर भारतीय संघाचा एकतर्फी पराभव होण्याची दाट शक्यता आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.