CT 2025 final: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हे दोन खेळाडू घेणार निवृत्ती; असा आहे BCCI चा रोड मॅप..

0

CT 2025 final: भारत विरुद्ध न्युझीलंड (india vs New Zealand) यांच्यामध्ये नऊ तारखेला दुबईच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. एकीकडे भारतीय संघ अंतिम सामन्याची तयारी करत असतानाच दुसरीकडे बीसीसीआयचा (BCCI) नवा प्लॅन समोर आला आहे. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. बीसीसीआयच्या नव्या प्लॅनमुळे दोन खेळाडूंना नाईलाजाने निवृत्ती घ्यावी लागणार आहे. जाणून घेऊया सविस्तर..

सध्या भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये असून, अनेकांबरोबर बीसीसीआयला देखील विजेतेपदाची अपेक्षा आहे. फायनल सामन्यात जो संघ दबावाला व्यवस्थितरित्या हाताळेल तो संघ विजय होण्याची शक्यता आहे. दबावामध्ये भारतीय संघाची कामगिरी साधारण राहिली आहे. खासकरून आयसीसी स्पर्धेच्या नॉकआऊट सामन्यात. त्यामुळे फायनल कोण जिंकेल, हे पाहणं खूप महत्वाचे ठरणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यामध्ये भारतीय संघाला अपयश आले, तर रोहित शर्माला भारतीय संघातून वगळले जाणार अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र आता आणखी एक नवीन बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जरी भारतीय संघ फायनल जिंकला तरी देखील आता यापुढे रोहित शर्मा भारतीय संघात खेळताना दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयडून पुढील दोन वर्षाचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकासाठी एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तयार करण्यात येणार आहे. रोहित शर्माचा फिटनेस, वय आणि फॉर्म पाहता तो 2027 मध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये खेळू शकणार नाही, याविषयी bcci चे ठाम मत झालेले आहे.

जर तो 2027चा विश्वास चषक खेळणार नसेल तर यापुढे एकदिवसीय संघात रोहित शर्माला संधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली नाही लतरीदेखील तो यापुढे एकदिवसीय क्रिकेटचा भाग नसणार आहे. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितली आहे. त्यामुळे रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर करणार असल्याची देखील माहिती आहे.

रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजा (ravidra jadeja) देखील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्ती घेणार आहे. अक्षर पटेल (axar Patel) आणि रविंद्र जडेजा हे एकच प्रकारचेच खेळाडू आहेत. दोघेही लेफ्टआर्म स्पिन गोलंदाज आणि डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे यापुढे दोघांना एकत्रित खेळवता येणं शक्य नसल्याचं सांगण्यात आले आहे. रविंद्र जडेजाला बीसीसीआयने टेस्ट क्रिकेटकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. त्यामुळे रोहित शर्मा बरोबर तो देखील निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा  CT 2025 Final IND vs NZ: न्युझीलंड साकारणार एकतर्फी विजय; पहा ते एक समीकरण ज्यामुळे भारताचा वाजणार बाजा..

Virat kohli anant ambani : ..अखेर तो विकला गेलाच; अनंत अंबानीच्या षढयंत्रात असा अडकला विराट कोहली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.