Tamannaah Bhatia Virat kohli: विराट कोहलीच्या अफेअर विषयी तमन्नाने ते सगळंच सांगून टाकले..
Tamannaah Bhatia Virat kohli: बॉलीवूड आणि क्रिकेट (Bollywood and cricket) हे फार घनिष्ट नातं आहे. बॉलीवूड आणि क्रिकेटचे कनेक्शन फार जुनं आहे. लूक आणि स्टाईलच्या बाबतीत काही क्रिकेटर्सनी आता बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांना (Bollywood celebrities) देखील पाठीमागे टाकले आहे. यात सर्वात आघाडीवर असणारं नाव म्हणजे विराट कोहली. विराट कोहलीच्या (Virat kohli) लूक, स्टाईल आणि फिटनेसचे अनेक दिग्गज दिवाणे आहेत. यामध्ये आघाडीच्या अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. काही वर्षांपूर्वी तमन्ना भाटिया आणि विराट (Tamannaah Bhatia Virat Kohli) कोहली (Tamannaah Bhatia Virat Kohli dating each other) या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता तमन्नाने मौन सोडले आहे. (Tamannaah Bhatia saying Virat kohli’s affair)
तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या ती आपल्या रिलेशनशिप विषयी चर्चेत आहे. तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा (Vijay Verma) सोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचा तिने स्वतः खुलासा केलाय. सध्या दोघांची एक वेब सिरीज देखील येत आहे. यामध्ये तिचे अनेक इंटीमेट सीन्स देखील आहेत. सध्या तमन्ना भाटिया विजय वर्मा (Tamannaah Bhatia Vijay Verma relationship) सोबत रिलेशनशिपमध्ये असली तरी अधिक चर्चा तिच्या आणि विराट कोहलीच्या अफेअरची होताना दिसत आहे.
तमन्ना भाटिया हिने आपल्या रिलेशनशिप विषयी कबुली दिल्यानंतर, माध्यमाने तिला विराट कोहली सोबत असणाऱ्या रिलेशनशिप विषयी प्रश्न विचारला. एका मुलाखतीत तिला विराट कोहली बरोबर तुझ्या अफेअर होते का? याविषयी प्रश्न विचारला गेला. याविषयी ती थोडीशी बुचकळ्यात पडली. मात्र तिने या प्रश्नावर मनमोकळे उत्तर दिले.
विराट कोहली आणि मी एका जाहिरातीसाठी एकत्र आलो होतो. आमच्या दोघांचीही भेट झाली. त्यापूर्वी आम्ही दोघे कधीही एकमेकांना भेटलो नव्हतो. जाहिराती निमित्त आम्ही सेटवर आल्यानंतर, काही काळ गप्पा मारल्या. मात्र त्यावेळी आम्ही दोघेही कधीच एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये नव्हतो. तमन्नाच्या उत्तराने हा टॉपिक सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड झाला.
विराट कोहली सोबत आपण कधीही रिलेशनशिपमध्ये नसल्याचा खुलासा तमन्ना भाटिया हिने केला. मात्र अनुष्का शर्मा आणि विराट कोहली रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी तमन्ना भाटिया आणि विराट कोहली अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. विराट कोहलीचे कौतुक करताना तमन्ना भाटिया म्हणाली, मी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केलंय, विराट त्यापेक्षा चांगला अभिनेता आहे.
चार अभिनेत्री बरोबर जोडले गेले विराटचे नाव
त्यापूर्वी विराट कोहलीचे अफेअर अनेक अभिनेत्री सोबत जोडले गेले. तमन्ना भाटिया बरोबर जेनेलिया डिसूजा, संजना गालराणी, साक्षी अगरवाल या चार अभिनेत्रींबरोबर देखील विराट कोहलीच्या अखेरच्या चर्चा रंगल्या होत्या. संजना गालराणी आणि विराट कोहली आयपीएलमध्ये झालेल्या विजय माल्याच्या एका पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हापासून या दोघांच्या त्याची चर्चा रंगली होती.
हे देखील वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम