Viral video: मगरीच्या पाठीवर बसून, डान्स करु लागला वयोवृद्ध व्यक्ती पण पुढे जे घडलं ते पाहून….,” तुम्हीच पहा हा व्हिडीओ..

0

Viral video: सोशलमीडियावर प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंना अनेकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडीओचं जणूकाही व्यासपीठच बनलं आहे. अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. खास करून प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, या व्हिडिओंना नेटकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करण्यात येतं. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता कायम असते.

नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आणखी एक भयानक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. मगर ही किती हिंस्र प्राणी आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. मगरीच्या जवळ जाण्याचं कोणीही धाडस करणार नाही. मगरीच्या तोंडात एखादा प्राणी सापडला, तर तो संपलाच म्हणून समजा. मग तो कितीही मोठा असू द्या, मगरीच्या तावडीतून सुटेल तर नवलच. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक वयोवृद्ध व्यक्ती चक्क मगरीच्या पाठीवर बसून डान्स करत असतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

एका समुद्राच्या कडेला अनेक पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. या समुद्राच्या कडेला एक भली मोठी मगर आपल्या भक्ष्याच्या शोधात असल्याचे दिसत आहे. या समुद्राच्या कडेला अनेक लोक कॅमेरा घेऊन हे दृश्य टिपत असताना देखील पाहायला मिळत आहे. मात्र यात एक व्यक्ती भल्यामोठ्या मगरीच्या जवळ येतो. या व्यक्तीच्या हातात मांसासारखा पदार्थ असल्याचे दिसत आहे. हा व्यक्ती मगरीला किंचितही घाबरत नसल्याचे दिसत आहे. हा वयोवृद्ध व्यक्ती मगरीच्या खूप जवळ गेल्यानंतर, मगर यावर हल्ला करते. मात्र आपल्या हातात असणारा मांसाचा तुकडा हा व्यक्ती मगरीच्या तोंडात देतो, आणि पुढे जे काही करतो, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसतो.

काय घडलं नक्की? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ wildlife_stories_ या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. एका समुद्राच्या कडेला एक मगर भक्ष्याच्या शोधात असल्याचं दिसत आहे. या समुद्राच्या कडेला अनेक पर्यटक देखील फोटोग्राफी करताना पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यात अचानक एक वयोवृद्ध व्यक्ती या मगरीच्या जवळ येते. आणि मग मगर देखील या व्यक्तीवर हल्ला करते.

या व्यक्तीला खाण्यासाठी मगर आपलं भलं मोठं तोंड उघडते, मात्र हा व्यक्ती मोठ्या चपळाईने आपल्या हातात असणारा मांसासारखा प्रकार या मगरीच्या तोंडात देतो, आणि स्वतःला वाचवतो. मात्र हे दृश्य पाहताना आसपास असणारे अनेक लोकं प्रंचंड घाबरतात, मात्र या व्यक्तीच्या चेहर्‍यावर किंचितही भिंती जाणवत नाही. पुढे हा वयोवृद्ध व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसताना दिसत आहे. मगर या व्यक्तीने दिलेलं मांस खाण्यात मग्न आहे. आणि हा व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसून डान्स करताना पाहायला मिळत आहे.

या व्यक्तीने केलेली करामत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसून डान्स करत असतानाचे दृश्य कॅमेर्‍यात कैद करताना पाहायला मिळत आहेत. पाठीवर बसून डान्स केल्यानंतर हा व्यक्ती उठून मगरीच्या तोंडाजवळ बसताना देखील पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील मगर या व्यक्तीला काहीच करत नसल्याचे दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे, तर अनेकांनी भीती देखील व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एक व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसून डान्स करतो आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नसल्याचं दिसत आहे. तर अनेकांना मगरी समोर जाऊन हा व्यक्ती बसला आहे, तरीदेखील मगर काहीच करत नाही, यावर आश्चर्य वाटत आहे. एका युजर्सने म्हटलं आहे, या माणसाचा कॉन्फिडन्स लाजवाब आहे. दुसर्‍या एका युजर्सने म्हटलं आहे, मगर हळूहळू तोंड उघडत आहे. मगरीने जर याच्यावर हल्ला केला असता तर काय झालं असतं.

हे देखील वाचा व्हिडिओ: शिवसैनिकांनी शिंपडले गोमूत्र; सोमय्या म्हणाले पुण्यापेक्षा हे केव्हाही चांगलंच, मला इथं मारलं तर नाही

नालायक पणाचा कळस..! आरोग्य विभागाने आपल्या ट्विटरवर शेअर केली पॉ र्न हबची लिंक..

Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या या प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य..

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.