व्हिडिओ: शिवसैनिकांनी शिंपडले गोमूत्र; सोमय्या म्हणाले पुण्यापेक्षा हे केव्हाही चांगलंच, मला इथं मारलं तर नाही

0

काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि शिवसेनेमध्ये चांगलाच तणाव वाढला असून, रोज नवीन काहीतरी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी दोघेही एकमेकांवर झाडताना पाहायला मिळत आहेत. सोमय्या यांच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत, किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. मात्र तरीदेखील सोमय्या गप्प बसायचं नाव घेत नाहीत. आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या ठाकरे कुटुंबावर हल्ला करताना पाहिला मिळाले.

मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर ( manisha waykar) यांच्या नावावर अलिबागमधील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून, त्या ठिकाणी एक जरी बंगला मला दाखवला, तरी मी राजकारण सोडून देईन. असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना आव्हान दिलं होतं.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना आव्हान दिल्यानंतर किरीट सोमय्या आज कोर्लई गावात 19 बंगले पाहण्यासाठी पोहचले होते. मात्र आता या जागेवर 19 बंगले नसल्याची माहिती समोर आली आहे. आज किरीट सोमय्या यांनी या बाबत चौकाशी करण्यासाठी थेट कोर्लई गावची ग्रामपंचायत गाठली. मात्र ग्रामपंचायत सरपंचांनी या ठिकाणी कधीच बंगले नसल्याचे सरपंचांनी सांगितले आहे. या ठिकाणी कधीही बंगले नव्हते, असं सरपंचांनी सांगितल्याने किरीट सोमय्या चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

‘कोर्लई’ गावातील ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ‘रेवदंडा’ पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांकडे त्यांनी या जागेवरचे 19 बंगले कुठे आहेत? असा सवाल करत, या संदर्भात त्यांनी पोलिसांना एक अर्ज केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली, असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, या ठिकाणी देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आले होतेे, त्यांनी घोषणा दिल्या, मात्र पुण्यासारखं मला यांनी मारलं नाही.

एकीकडे अलिबागमधील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात एकोणीस बनले असल्याचा दावा किरीट सोमय्या करत आहेत. तर दुसरीकडे आता या गावात एकोणीस बंगले कधीही नव्हते, असं कोरले गावचे सरपंच ‘प्रशांत मिसाळ’ यांनी म्हटलं आहे. प्रशांत मिसाळ यांनी केलेल्या दाव्यामुळे किरीट सोमय्या चांगलेच तोंडावर आपटले असले तरी, दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी 19 बंगले गेले कुठे? याची चौकशी पोलिसांनी करावी, यासाठी त्यांनी पोलिसांना अर्ज देखील केला आहे. आता नक्की या प्रकरणात काय गौडबंगाल आहे. याविषयी सर्व सामान्यांच्या मनात आणखीनच उत्सुकता वाढली आहे.

कोर्लई ग्रामपंचायत शिवसेनेची असल्याने, किरीट सोमय्या यांनी या ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीमध्ये गोमूत्र शिंपडून या जागेच शुध्दीकरण केले. किरीट सोमय्या येताच शिवसैनिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. गाडीतुन खाली उतरल्या उतरल्या शिवसैनिकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. मात्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात असल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.