Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी ‘झुंज’ तुम्हीच पहा..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले अनेक नवनवीन व्हिडिओ दररोज व्हायरल होताना पाहायला मिळतात. अनेकांना प्राण्यांची जीवनशैली जाणून घ्यायला आवडतं. प्राणी नेहमी एकमेकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतात. सिंह, वाघ, चित्ता अनेक बड्या प्राण्यांना आपले भक्ष्य बनवताना आपण नेहमी पाहतो. असाच एक सिंह एका हत्तीची शिकार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हत्तीची शिकार करणं, सिंहाला महागात पडल्याचं पाहायला मिळत असून, हत्तीच्या धैर्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

तसं पाहायला गेलं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ जुनाच आहे, मात्र हा व्हिडीओ पुन्हा नव्याने शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओला कमालीचे लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हत्ती आणि सिंहिणीच्या भांडणाचा हा व्हिडिओ असून, सिंहिणी प्रौढ हत्तीची शिकार करायच्या उद्देशाने जाते, मात्र हा हत्ती जवान असल्याने, सिंहिणीला कडवी झुंज देताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हत्तीची शिकार सिंहीणी करेल असं वाटतं असताना शेवटी सगळा पासा पलटतो.

सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ @afaf66551 या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सुरुवातीला सिंहिणी हत्तीला आपले भक्ष्य बनवेल, असे चित्र पाहायला मिळत आहे. हत्ती देखील या सिंहिणीचा मोठ्या हिंमतीने सामना करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हत्तीला खाली पाडण्यासाठी सिंहिणी आपली ताकद पणाला लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी हत्तीच्या कान तर कधी हत्तीची सोंड आपल्या जबड्यात पकडताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हत्तीला जमिनीवर पाडण्यासाठी सिंहीणी कधी हत्तीच्या पाठीवर बसत आहे, तर कधी सोंडीवरही हल्ला करत आहे. मात्र हत्ती मोठ्या हिंमतीने सिंहिणीचा सामना करत असल्याचे, पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरून नव्याने व्हायरल झालेला हा व्हिडीओ 2019 मधील लेटेस्ट साइटिंग्स या यूट्यूब चॅनलने यापूर्वी शेअर केला होता.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक सिंहिणी हत्तीला आपला शिकार बनवताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ही सिंहिणी हत्तीची शिकार करेल असं वाटत आहे. सिंहिणीच्या तावडीतून हत्ती आता वाचू शकणार नाही, असं चित्र असताना हत्ती देखील मोठ्या हिंमतीने या सिंहिणीचा सामना करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हत्तीच्या कधी पाठीवर तर कधी सोंडेवर सिंहिणी हल्ला करत आहे‌‌. मात्र अनेक प्रयत्न करून देखील हत्तीला जमिनीवर पाडण्यात तिला यश मिळत नाही.

या सिंहिणीला आता आपण हत्तीचा सामना करू शकत नाही. हत्तीला जमिनीवर पाडण्यात आपण आता अपयशी ठरत आहोत, असं वाटल्यानंतर सिंहिणी पळ काढताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सिंहिणीच्या आणि हत्तीची झुंजीत हत्ती अखेरपर्यंत हार मानत नसल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत असून, अखेर हत्ती सिंहिणीला ताणून लावत असल्याचे, पाहायला मिळत आहे. सिंहिणी आपला जीव वाचवून पळताना देखील व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहायला मिळत असून, हत्ती देखील तिच्यापाठी धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडिओला अनेकांनी लाइक्स केले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करताना हत्तीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजर्सने म्हटले आहे, हे दृश्य अद्भुत आहे. शेवटपर्यंत हार मानली नाही, तर विजय तुमचा निश्चित होतो. हे हा व्हिडिओ पाहून समजलं.

हे देखील वाचा Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच हे पहा घाणेरडं कृत्य..

Viral video: रानडुकराची शिकार कराय गेली वाघीण, रानडुकरानेही केला जोरदार प्रतिकार; पण शेवटी.. 

Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आई आईच असते..

Viral video; लँडिंग होताना विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; व्हिडिओ पाहून होईल काळजाचं पाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.