Viral video; लँडिंग होताना विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; व्हिडिओ पाहून होईल काळजाचं पाणी..

0

Viral video: अलिकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने, अनेक छोटे-मोठे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. कधी काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ, तर कधी मन हेलावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळतात. अनेकांना प्राण्यासंदर्भातले व्हिडिओ पाहायला आवडत असल्याने, अनेक जण प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर्स देखील करत असतात. मात्र सोशल मीडियावर आता विमान लँडिंग होतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, विमान लँडिंग होताना विमानाचे चक्क दोन तुकडे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मध्य अमेरिकेमधील कोस्टा रिका देशात गुरुवारी हा जबरदस्त विमान अपघात झाला असून, यात इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमान चक्क मध्यभागी तुटल्यामुळे पिवळ्या रंगाचा विमानाचे दोन तुकडे झाल्याचा अजब प्रकार समोर आला. सुदैवाने लेंडी करत असताना तुटलेले विमान हे प्रवासी विमान नव्हते. हे विमान मालवाहू असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्यापासून वाचले असल्याने ही दिलासादायक बाब आहे.

या मालवाहू विमानांमध्ये फक्त दोन मेंबर असल्याची माहिती आहे. या दोघांचीही प्रकृती ठीक असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा मालवाहू विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. विशेष म्हणजे, हा अपघात इतका भीषण होता, की या अपघातामुळे हे विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. मालवाहू विमानाचा झालेल्या दुर्दैवी अपघाताची माहिती, अग्निशमन दलाचे प्रमुख हेक्टर चावेस यांनी दिली आहे.

काय घडलं नेमकं?

गुरुवारी ७ एप्रिल २०२२ला सकाळी साडेदहाच्या आसपास हा भिषण अपघात झाला. बोइंग-७५७ या मालवाहतूक विमानाने सांता मारिया या विमानतून उड्डाण केले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हे विमान २० मिनिटांनंतरच परतले. आणि उतरताना हा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मालवा विमान लँडिंग करताना अचानक मध्यभागातून अचानक तुटल्याचे पाहायला मिळत आहे. काही कळायच्या आत मध्ये हा अपघात झाल्याने विमानतळा मधील अनेक संबंधित कर्मचारी स्तब्ध झाल्याचे या व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

हे मालवाहू विमान पिवळ्या रंगाचे असून अचानक मध्यमातून तुटल्याने क्षणात विमानामधून जोरदार धूर निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा अपघात झाल्यानंतर, लगेच घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी आल्याचे देखील व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या विमानात फक्त दोनच जन असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

हे देखील वाचा Viral video: रिक्षा अडवायला गेलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने हवेत उडवून लावलं; हृदयाचे ठोके चुकवणारी घटना सीसीटीव्हीत कैद..

Accelero+: या इलेक्ट्रिक दुचाकीने उठवला सगळ्याच टू-व्हीलरचा बाजार; जबरदस्त फीचर्ससह मिळतेय केवळ 50 हजारांत..

Viral video: लेकराला वाचवण्यासाठी आईने दिले बलिदान; आईचं प्रेम दर्शवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पहाच..

Viral video: माकडाच्या पिल्लाची आणि पक्षांची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..; व्हिडिओ एकदा पहाच..

Viral video: मगरीने क्षणात हरणाचे तुकडे-तुकडे केले; तुम्हीच पहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.